कुठे भेटलीच तर नक्की घेऊन या आयुर्वेदातील लाख मोलाची वनस्पती ; फायदे इतके की लाखो रुपये देऊन पण मिळणार नाहीत असे फायदे ……!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, रस्त्याच्या कडेला जास्त प्रमाणामध्ये आपल्याला काही काटेरी वनस्पती दिसतात. त्याच्या काटेरी वनस्पतीत कोणते गुण असतात ते आपण पाहणार आहोत आणि त्याचा वापर करून आपण सांधेदुखी, अंगदुखी मिनिटात गायब करू शकतो. या वनस्पतीमध्ये आयुर्वेदिक औषधी गुण आहेत. याची माहिती देखील आज आपण या लेखातून करून घेणार आहोत. तर मित्रांनो ही वनस्पती म्हणजे लांडगा वनस्पती किंवा हिला जळमनी असे देखील म्हटले जाते. या वनस्पतीला काटेरी स्वरूपाची फळे असतात. या काटेरी स्वरूपाच्या फळे सांधेदुखी, अंगदुखी,डोकेदुखी साठी वापरू शकतो.

यासाठी या वनस्पतीची वाळलेली फळे घ्यावेत. फळे पाण्यामध्ये उकळून घ्यावीत. उकाळ्यानंतर त्याच्यावर तेल स्वरूपाचे पदार्थ जमा होतात. ते तेल आपण हळुवारपणे काढून घ्यावे आणि या तेलाने आपल्या दुखण्यावर मालिश करावे. हा उपाय करताना एक दक्षता घ्या की,लहान मुलांपासून हे तेल जपून ठेवावे. कारण यामध्ये विषारी पदार्थ असतात.

हा उपाय केल्याने तुमच्या सांधेदुखीचा त्रास कमी होईल आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण येथे तयार केलेले तेल आहे यांनी जर तुम्ही कायमस्वरूपी आपल्या हाता पायांना मालिश केले किंवा त्याचबरोबर संपूर्ण शरीराचे जर मालिश केली तर यामुळे तुमची अंगदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी यांसारखे अनेक मोठमोठ्या समस्या लगेचच दूर होण्यासाठी या वनस्पतीची नक्कीच मदत होईल.

तर मित्रांनो या वनस्पतीचा दुसरा फायदा आणि त्या संबंधित दुसरा उपाय म्हणजे या वनस्पतीच्या पानांचा वापर करून आपल्याला केस गळतीचे प्रमाण कमी करता येते. तर मित्रांनो अनेकदा सुंदर दिसण्यासाठी आपण वेगवेगळ्या रासायनिक पदार्थांचा वापर करत असतो.केसांना अनेकदा लहान वयातच पांढरेपण आलेले असते.

हे पांढरेपण लपविण्यासाठी अनेकदा आपण मेहंदी, डाय, वेगवेगळे कलर वापरत असतो. परंतु यामुळे पांढरे झालेले केस काळे होतात. पण त्याचबरोबर उरलेले काळे केस असतात ते सुद्धा पांढरे होऊ लागतात. म्हणूनच जर तुम्ही सुद्धा रासायनिक पदार्थांचा जास्त वापर करत असाल तर ते आत्ताच थांबवायला हवे अन्यथा तुमच्या केसांवर त्याचा विपरीत परिणाम सुद्धा होऊ शकतो.

म्हणूनच मित्रांनो नैसर्गिक पद्धतीने आपल्या केसांच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आपण या वनस्पतीचा वापर करू शकतो आणि याचा वापर करत असताना मित्रांनो आपल्याला सर्वात आधी या वनस्पतींची पाने घेऊन ती चेचून घ्यावे किंवा त्याची पेस्ट बनवावी. ही पेस्ट आपल्या डोक्याला लावावी.

मित्रांनो किमान आठवड्यातून दोनदा या प्रमाणे जर आपण दोन महिने हा उपाय केला. तर टक्कल पडलेल्या ठिकाणीही केस येतील. त्याबरोबरच केस काळेभोर होतील. केसातील कोंडा ही निघून जाईल व केस गळतीचे प्रमाणही पूर्णपणे थांबेल.

मित्रांनी त्वचेसंबंधित काही आजार असतील त्यामध्ये फंगल इन्फेक्शन, गचकरण, नायटा, खरुज यांपैकी जर काहीही झाले असेल तर, या वनस्पतीच्या पानांची पेस्ट करून ती त्या ठिकाणी लावावी आणि त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला तुमचे केस कायमचे काळे करायचे असेल तर अशा प्रसंगी मित्रांनो या वनस्पतीचा वापर करत असताना या वनस्पतीमध्ये नैसर्गिक काळेपण असते.

जर आपण या वनस्पतीच्या पानांचा चुरा केला तरी आपल्या हातांना काळा रंग लागतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला ह्या वनस्पतीचे जुनी पाने घ्यायचे आहे. नवीन आलेली पाने घ्यायचे नाही. त्यानंतर ही वनस्पतीचे पाने आपल्याला स्वच्छ धुऊन खलबत्त्यामध्ये किंवा आपल्याकडे जे साहित्य उपलब्ध आहेत त्याद्वारे बारीक वाटून त्याचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे चहा पावडर. आपल्या एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन एक ते दोन चमचा चहा पावडर घ्यायचे आहे. हे मिश्रण चांगल्या पद्धतीने उकळून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यांच्या सहाय्याने हे मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचे आहे. चहा पावडर मध्ये काळा रंग टिकवून ठेवण्याची क्षमता असते. म्हणून हा उपाय करण्यासाठी आपल्याला चहा पावडर वापरायची आहे.

त्यानंतर आपण जो वनस्पतीचा रस काढलेला आहे त्यामध्ये हे चहा पावडरचे पाणी आपल्याला मिक्स करायचं आहे आणि आता दोन्ही पदार्थ एकजीव केल्यानंतर आपल्या केसांना हे मिश्रण लावायचे आहे आणि केसांना लावल्यानंतर थोडा वेळ तसेच सुखू द्यायचे आहे.

त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाकायचे आहे. सातत्याने पंधरा दिवस करायचा आहे. असे केल्याने तुमचे केस आपोआप काळे होऊ लागतील आणि तुमच्या केसांना नैसर्गिक रित्या काळा रंग प्राप्त होऊ शकतो. त्याचबरोबर ज्या व्यक्तींना मूळव्याधीचा त्रास आहे. अशा व्यक्तीने या वनस्पतीचा पाल्याचा रस एक चमचा रोज जर महिना दीड महिना घेतला तर, मूळव्याधीचा त्रास पूर्णपणे कमी होईल.

मित्रांनो अशाप्रकारे काटेरी दिसणारी वनस्पती झाडाझुडुपांमध्ये उठणारी वनस्पती औषधी आहे. त्यामुळे वरील सांगितलेले आजार कमी करण्याची शक्ती असते. म्हणून तुम्ही देखील या वनस्पतीचा वापर करून बघा. नक्कीच फायदा होईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.