मित्रांनो, आपण सर्वजण चागले दिसण्यासाठी विविध उपाय करत असतो. काहीजण तर आपला चेहरा चागला दिसावा म्हणून सर्जरी करून घेतात. तर काही जण त्यावर विविध प्रकारच्या केमिकल युक्त क्रीम लावून चेहेरा उजळण्यासाठी प्रयत्न करत असतात. चार चौघांमध्ये आपला चेहरा उठून दिसण्यासाठी मग आपण अनेक क्रीम लावतो. परंतु काही वेळेस त्या क्रीम्सचा साईड इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. आपल्या चेहऱ्यावरती अनेक प्रकारचे वांग, काळे डाग यामुळे आपला चेहरा विद्रूप दिसायला लागतो. मग त्यावेळेस आपण खूपच नाराज होतो.
परंतु मित्रांनो असे काही घरगुती उपाय आपण जर केले तर यामुळे आपला चेहरा हा गोरा दिसण्यासाठी मदत होईल. तसेच जे काही आपल्या चेहऱ्यावरचे वांग, काळे डाग असतील ते देखील सर्व दूर होतील आणि आपला चेहरा हा चार चौघांमध्ये उठून देखील दिसेल.
तर मित्रांनो आज मी तुम्हाला असाच घरगुती उपाय सांगणार आहे. हा खूपच कमी खर्चिक असा आहे आणि याचा साईड इफेक्ट देखील आपल्याला कोणताही होणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात हा उपाय नेमका कोणता आहे तो. तर मित्रांनो या उपायासाठी आपल्याला ज्वारीचे पीठ लागणार आहे.
मित्रांनो ज्वारीचे पीठ हे आपल्याला थंडावा देणारे असते आणि
चेहऱ्यासाठी आपणाला ज्वारीचे पीठ खूपच उपयोगी असते. ज्वारीचे पीठ दोन चमचे घ्यायचे आहे. तर मित्रांनो पुढचा घटक आपल्याला जो लागणार आहे तो आहे हळद. ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर ठरते. हळद ही आपणाला एक वरदान आहे. आपल्याला जे काही चेहऱ्यावरती मुरमाचे डाग, काळे डाग, वांगांचे डाग घालवण्यासाठी हळदीचा खूपच फायदा होणार आहे.
तर अशी ही वरदान असलेली हळद आपल्याला पाऊण चमचा घ्यायची आहे. तसेच आपल्याला तिसरा घटक जो लागणार आहे तो आहे बदाम तेल. बदाम तेलामुळे आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो आणि असे हे बदाम तेल आपल्याला दोन ते तीन थेंब घ्यायचे आहे.
यामध्ये चौथा घटक जो आपल्याला लागणार आहे तो म्हणजे लिंबूरस. आपणाला दोन थेंब लिंबूचा रस घ्यायचा आहे. लिंबूच्या रसामुळे आपल्या चेहऱ्यावरचे डाग निघून जाण्यास मदत होते. यानंतरचा जो घटक आपल्याला लागणार आहे तो आहे गुलाब जल.
मित्रांनो गुलाब जल आपला चेहरा उजळण्यासाठी म्हणजेच आपला चेहरा स्वच्छ करण्यासाठी गुलाब जल खूपच फायदेशीर ठरते. तर हे गुलाब जल आपणाला ही पेस्ट बनवता येईल इतपत हे गुलाब पाणी घ्यायचे आहे. म्हणजेच दोन चमचे ज्वारीचे पीठ, पाउन चमचा हळद, दोन ते तीन थेंब बदाम तेल, दोन थेंब लिंबूचा रस हे सर्व एकत्रित करायचे आहे आणि या सर्वांची पेस्ट होईल एवढे आपणाला गुलाब जल यामध्ये घालायचे आहे.
तर हे मिश्रण व्यवस्थितपणे एकत्रित करायचे आहे आणि याची चांगली पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर मित्रांनो ही पेस्ट चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर हळुवारपणे आपल्या पूर्ण चेहऱ्यावर आपल्याला लावून घ्यायचे आहे.
जर तुमच्या चेहऱ्यावर काळसर डाग किंवा वांग असतील तर गोलाकार आकारात आपणाला मसाज करायचा आहे. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील रक्ताभिसरण क्रिया देखील सुरळीतपणे होते. शिवाय चेहऱ्यावर तेज येते. चेहरा तेजस्वी आणि फ्रेश दिसू लागतो.
जे काही चेहऱ्यावरील वांग, काळे डाग आहेत हळूहळू निघून जाण्यास मदत होते. ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानंतर तुम्हाला थोड्यावेळाने ही पेस्ट हळुवारपणे चोळून काढून घ्यायची आहे. तुम्हाला याचा फरक नक्कीच झालेला दिसेल.
जर तुम्हाला हा उपाय चेहरा, काळी पडलेली मान, हात पाय यावर करायचा असेल तर आंघोळीपूर्वी हा उपाय तुम्ही करू शकता किंवा फक्त चेहऱ्यासाठी करायचा असेल तर हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही करू शकता.
हा उपाय केल्याने तुमची जी काही काळी पडलेली मान असेल हात पाय असतील ते एकदम तुम्हाला गोरे झालेले दिसतील. तुमचा चेहरा गोरा तसेच चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो देखील आलेला तुम्हाला नक्कीच जाणवेल. तर हा एक नैसर्गिक घरगुती उपाय आहे. हा उपाय तुम्ही अवश्य करून पहा.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.