मित्रांनो, आपले आरोग्य बिघडण्यास अनेक प्रकारची कारणे असतात. ही कारणे आपल्या लक्षात येत नाहीत. मित्रांनो अलीकडच्या काळात पुरेशी झोप न घेणे पद्धत झाली आहे. टीव्ही, मोबाईल याचा अतिवापरामुळे झोपेवर परिणाम होतो. रात्री उशिरा झोपल्याने तसेच अपुऱ्या झोपेमुळे देखील आपल्याला अनेक आजाराना सामोरे जावे लागते.तसं पाहिलं तर झोप न येण्याची अनेक कारणे आहेत. जसं की कोणताही शारीरिक किंवा मानसिक आजार, दिवसा जास्त झोपणे, रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल आणि कॉम्प्युटर यांचा जास्त प्रमाणात वापर,काही लोक झोप येण्यासाठी ॲलोपॅथी औषधांचा उपयोग करतात.
या औषधाने थोडे दिवस झोप येते. परंतु याचा वाईट परिणाम आपल्या किडनीवर मेंदूवर होतो. थोड्या दिवसांनी या गोळ्या खाऊन देखील झोप येत नाही या औषधाच्या सेवनाने डिप्रेशन सारखे आजार होऊ शकतो. म्हणून झोप येण्यासाठी नेहमी घरगुती नैसर्गिक उपाय करावेत.
मित्रांनो अपुऱ्या झोपेची दुष्परिणाम जाणून घेऊयात.
लठ्ठपणा /वजन वाढते
पुरेशी झोप झाली नाही तर शरीराला ऊर्जा कमी प्रमाणात मिळते. त्यामुळे मेंदू ही कमी पडलेली ऊर्जा भरून काढण्यासाठी जास्त अन्नाचे सेवन करण्याचे संदेश शरीराला देतो. त्यामुळे जागरण करणार्या व्यक्ती त्यांच्या नकळत जास्त प्रमाणात अन्नाचे सेवन करतात. यामुळे वजन वाढू लागते आणि वाढलेल्या वजनाचे वेगवेगळे दुष्परिणाम दिसू लागतात.
हृदयविकाराचा धोका वाढतो
रात्रीच्या वेळी आपले शरीर दिवसभरात झालेली झीज भरून काढण्याचे काम करत असते. या झोपेच्या वेळात हृदय आणि रक्तवाहिन्या आपली झीज भरून काढणे आणि शरीरात आवश्यक ठिकाणी नव्या रक्तवाहिन्यांची निर्मिती अशी कामे करत असतात. परंतु रात्रीचे जागरण किंवा अपूर्ण झोप यामुळे हृदयाला हे काम करता येत नाही. त्यामुळे उच्च रक्तदाब हृदयगती वाढणे हृदयविकार अशा आजारांचे प्रमाण वाढलेले दिसून येते.
अपचन
जागरण करणे किंवा अपुरी झोप घेणे यामुळे शरीराच्या पचनशक्तीला मोठा फटका बसतो. तसे झाल्यामुळे अन्नाचे पचन नीट न होणे ऍसिडिटी होणे असे दुष्परिणाम दिसून येतात.
विसराळूपणा
स्मरणशक्ती कमी होणे किंवा विसराळूपणा वाढणे हा अपुऱ्या झोपेचा एक मोठा दुष्परिणाम आहे. स्मरणशक्ती योग्य राहण्यासाठी तसेच वाढण्यासाठी मेंदूला पुरेशी विश्रांती मिळणे आवश्यक असते. आपण झोपलेलो असताना मेंदूतील पेशी त्यांची झीज भरून काढून नव्या जोमाने काम करू लागतात. त्यामुळेच विद्यार्थी देतील मुलांनी तसेच सर्वच वयोगटातील व्यक्तींनी आपली स्मरणशक्ती चांगली ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे.
दृष्टीवर परिणाम
पुरेशी झोप न मिळाल्यामुळे डोळ्यांवरील ताण वाढतो. त्याचा आपल्या दृष्टीवर वाईट परिणाम होतो. डोळ्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या कमकुवत होणे, जवळच्या वस्तू अक्षरे नीट स्पष्ट न दिसणे असे दुष्परिणाम जागरणामुळे होतात.
मित्रांनो हे आहेत निद्रानाश किंवा अपूर्ण झोपेमुळे आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम. आपल्या आरोग्यावर असे दुष्परिणाम होऊ नये यासाठी आपल्याला किमान सात ते आठ तासांची शांत झोप अत्यंत आवश्यक आहे.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.