पाच वर्षाच्या वयात केलेली स्वामी सेवा आणि स्वामींनी केलेला चमत्कार वाचून आज प्रत्येकाच्या अंगावर काटा घेईल ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, प्रत्येक स्वामी भक्त हा स्वामींच्या सेवा करण्यामध्ये अगदी विलीन होऊन जातात. स्वामी देखील भक्त हा श्रीमंत आहे किंवा गरीब आहे याच्याकडे न पाहता फक्त भक्तांनी केलेली स्वामी सेवा पाहत असतात. अनेक लहान थोर व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये विलीन झालेले आपल्याला पाहायला मिळतातच. अगदी एकरूप होऊन अनेक सेवा अनेक पूजा विधी ते करीत असतात. काही जन घरच्या घरी स्वामींच्या सेवा करतात. तर बरेच जण हे स्वामींच्या मठामध्ये जाऊन देखील सेवा करीत असतात. अशक्य ही शक्य करतील स्वामी हे स्वामींचे वाक्य प्रत्येक भक्तांच्या मनामध्ये असते. तसेच स्वामी हे आपल्या भक्तांना प्रत्येक अडचणीतून मार्ग दाखवतील असा विश्वास देखील भक्तांना स्वामीवर असतोच.

तर अनेक भक्तांना स्वामींचे अनुभव देखील आलेले आहेत. तर असाच एक अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे. हा अनुभव कोल्हापूर येथील उत्तर या भागातील सीमा सावरखेड या ताईंचा आणि हा अनुभव आपल्याला रडवणारा असा आहे. तर हा अनुभव आपण त्यांच्याच शब्दांमध्ये जाणून घेऊयात.

मित्रांनो नमस्कार मी सीमा सावरखेड. मी आज अनुभव असा तुम्हाला सांगणार आहे हा माझ्या पाच वर्षाच्या मुलगीचा अनुभव आहे. आमच्या घरामध्ये मी, माझे मिस्टर, माझी मुलगी आणि सासू-सासरे असे सर्वजण राहत होतो. माझे माहेर हे वैजापूर म्हणजेच सासरपासूनच एक तास अंतरावरच माझे माहेर होते. माझ्या माहेरी स्वामींच्या कोणत्याच सेवा केल्या जात नव्हत्या. पण ज्यावेळेस मी लग्न करून सासरी आले त्यावेळेस सासू-सासरे हे स्वामींची सेवा करत होते व तेव्हापासून मी देखील स्वामी सेवा करायला चालू केली.

आमचे सर्व काही व्यवस्थित चालू होतं. म्हणजेच जेवढे आहे त्यात आम्ही सर्वजण सुखा समाधानाने राहत होतो. ज्यावेळेस मी प्रेग्नेंट होते त्यावेळेस डॉक्टरांनी माझ्या बाळाची काहीच गॅरंटी दिल नव्हती. म्हणजेच दोघींपैकी कोणाचे तरी एकाचे प्राण वाचवले जातील असे सांगितले होते. मग त्यावेळेस मात्र मी स्वामींची सेवा चालू केली स्वामी मंत्राचा जप चालू केला आणि स्वामींच्या कृपेने आमच्या दोघींचेही प्राण वाचले.

म्हणजेच माझी डिलिव्हरी व्यवस्थित झाली. नंतर माझी मुलगी लहानपण पासूनच स्वामींची भक्त झाली. कारण तिला तारक मंत्र म्हटल्याशिवाय ती शांतच राहत नव्हती. म्हणजेच जेवताना जर मी तारक मंत्र म्हटले की मग ती लगेचच जेवायची आणि ज्यावेळेस ती रडायची त्यावेळेस तिला स्वामी महाराजांची उदी लावल्यानंतर ती शांत व्हायची. शाळेत जाताना देखील ती आपल्या कपाळी अष्टगंध लावायची. म्हणजे ती अगदी स्वामींची भक्त झाली होती.

सर्व काही व्यवस्थित चालू असताना मधला जो काळ होता तो आमच्यावर एकदमच भारी पडला. कारण मी कामानिमित्त बाहेर जात असतानाच माझा खूप मोठा एक्सीडेंट झाला आणि या एक्सीडेंट मध्ये मी कोमात गेले. डॉक्टरांनी काहीच माझी गॅरंटी दिलेली नव्हती. दोन वर्षे मी कोमातच होते. आमचे घरामधील परिस्थिती खूपच हलाखीची झाली. कारण माझे औषधपानी यावर खूप सारे पैसे खर्च झाले. परंतु पैसे खर्च करून देखील माझ्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नव्हती.

त्यामुळे मग मला घरी आणले आणि माझे घरातूनच सर्व मेडिकल्स चालू झाले. माझी मुलगी त्यावेळेस पाच वर्षाची होती. मला त्यावेळेस नळीद्वारे हे सर्व काही दिले जात होते. माझी ही परिस्थिती पाहून माझ्या मुलीचे जे काही खेळण्या बागडण्याचे वय होते त्यावेळेस तिने मात्र स्वामी सेवा करण्यास सुरुवात केली आणि स्वामींच्या तारक मंत्राचा जप करण्यास तिने सुरुवात केला म्हणजे तारक मंत्राचे तिने व्रत चालू केले आणि तेही फक्त माझ्यासाठी.

असेच काही दिवस गेले आणि माझी मुलगी मला नळीद्वारे ज्यूस देत असतानाच ती तारक मंत्र देखील म्हणत होती आणि एकदमच माझी हालचाल झाली आणि माझ्या तब्येतीत मध्ये देखील सुधारणा देखील झाली आणि हे सर्व जे झाले होते हे सर्व माझ्या मुलीमुळे आणि स्वामी मुळे घडलेले होते. ही सर्व हकीकत माझ्या सासूबाईंनी मला जेव्हा माझी तब्येत व्यवस्थित झाली त्यावेळेस सांगितले.

माझ्या मुलीने स्वामी महाराजांच्या तारक मंत्राचे व्रत चालू ठेवल्यामुळे माझ्या मुलीची इच्छा होती ती स्वामींनी पूर्ण केली. म्हणजेच आज मी जिवंत आहे ते फक्त माझ्या मुलीमुळे आणि स्वामी समर्थ यांच्यामुळे. माझ्या मुलीची सेवा ही स्वामी समर्थांनी ऐकली आणि मला बरे देखील केले. म्हणजे प्रत्येक भक्तांनी जर मनोभावे श्रद्धेने स्वामींची सेवा केली तर प्रत्येक संकटातून, प्रत्येक अडचणीतून स्वामी समर्थ महाराज हे नक्कीच बाहेर काढतात. हा अनुभव त्यावेळेस आला.

हा अनुभव अगदी डोळ्यात पाणी आणणारा असा आहे आणि मी हा अनुभव कधी न विसरणारा असा आहे. तेव्हापासूनच स्वामी समर्थांवर जो काही विश्वास होता तो विश्वास आमचा आणखीनच वाढला. आम्ही सर्वजण अगदी मनोभावे स्वामींची सेवा करत आहोत आणि अशीच पुढे ही सेवा चालू ठेवणार आहोत.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.