कुलदेवतेचा वास तुमच्या घरामध्ये आहे हे कसे समजावे? जाणून घ्या हे महत्वाचे संकेत ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असते. अनेक देवीदेवतांच्या मुर्त्या, फोटोज आपल्या देवघरांमध्ये असतात आणि आपण या मुर्त्यांची आपण मनोभावे, श्रद्धेने विधिवत पूजा अर्चना करीत असतो. प्रार्थना करीत असतो. तसेच अनेक गोड पदार्थांचा नैवेद्यही दाखवत असतो. तर मित्रांनो प्रत्येकाची आपली अशी एक कुलदेवता असते आणि ही कुलदेवता माहीत असणे देखील गरजेचे आहे. परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना आपली कुलदेवता नेमकी कोणती आहे हे माहीत नसते.

तर मित्रांनो आपण ज्यावेळेस देवपूजा करीत असतो त्यावेळेस आपल्याला असे काही संकेत मिळत असतात ज्यामुळे आपली कुलदेवता ही आपल्यावर नाराज आहे किंवा प्रसन्न आहे हे कळते. ज्यावेळेस कुलदेवता नाराज होते. त्यावेळेस आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी, संकटे, दुःखे येत असतात.

तर मित्रांनो कुलदेवता जर आपल्यावर प्रसन्न असेल म्हणजे कुलदेवतेचा जर वास आपल्या घरामध्ये असेल तर असे काही संकेत आपणाला मिळत असतात. या संकेतावरून आपण नक्कीच जाणून घेऊ शकतो की कुलदेवता आपल्या घरामध्ये वास करत आहे. तर हे संकेत नेमके कोणते आहेत ज्यामुळे आपल्याला कळेल की आपल्या घरामध्ये कुलदेवतेचा वास आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

चला तर जाणून घेऊयात हे संकेत नेमके कोणते आहेत ते. तर मित्रांनो प्रत्येक जण हा देवपूजा करीतच असतो. देवपूजा करीत असताना आपल्या देवघरामधील जी दिव्याची वात असते जी ज्योत असते ही एका सरळ रेषेमध्ये असेल तर त्यावेळेस तुम्ही समजून जा की आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवतेचा वास आहे.

तसेच जर तुम्ही देवपूजा करीत असताना किंवा देवी देवतांची पूजा करीत असताना किंवा तुम्ही एखाद्या मंत्राचा जप करत असाल आणि त्यावेळेस तुम्हाला जर एक वेगळाच सुगंध आला तर याचाही अर्थ असा होतो की, आपल्या घरामध्ये कुलदेवतेचा वास आहे. कुलदेवता आपल्यावर प्रसन्न आहे.

आपण प्रत्येकजण देवपूजा करीत असताना अगोदर अगरबत्ती, धूप लावत असतो. परंतु या अगरबत्ती धूप व्यतिरिक्त आपल्याला इतर कोणत्यातरी फुलांचा किंवा कोणताही सुगंध येत असेल तर याचा अर्थ असा होतो की, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर आहे. तसेच त्यांचा आशीर्वाद आपल्या सोबत कायम राहणार आहे.

तसेच पूजा किंवा पूजा पाठ करीत असताना एखादी सुवासिनी स्त्री किंवा एखादी महिला किंवा एखादा नातेवाईक अचानकपणे आपल्या घरामध्ये आले तर याचाही अर्थ असा होतो की आपल्यावर आपली कुलदेवता प्रसन्न झालेली आहे. त्यांची कृपादृष्टी आपल्यावर आहे.

तसेच आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या मार्गाने धनसंपत्ती येत असेल तसेच घरातील सर्व लोक हे आनंदी असतील याचबरोबर आपण बाहेरून आल्यानंतर आपल्याला घरामध्ये आल्यानंतर प्रसन्न वाटत असेल तर हे देखील आपल्यावर कुलदेवता आणि माता लक्ष्मी प्रसन्न आहे त्यांचा वास आपल्या घरामध्ये आहे हे समजायचे आहे.

तर मित्रांनो वरील हे संकेत जर तुम्हाला दररोज मिळत असतील तर त्यावेळेस तुम्ही समजून जा की, माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे. तसेच कुलदेवता देखील आपल्यावर प्रसन्न आहेत आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने आपले जीवन नक्कीच सुखा समाधानाने जाईल. तसेच कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी जीवनात येणार नाहीत. आपल्या जीवनामध्ये सर्व काही सकारात्मक घडेल. तर मित्रांनो हे संकेत तुम्हाला मिळत आहेत का याकडे नक्कीच लक्ष द्या.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.