मित्रांनो, आपण सर्वात जास्त काळजी घेतो ती आपल्या चेहऱ्याची. पण चेहऱ्याप्रमाणेच आपल्या शरीराचे इतरही भाग महत्त्वाचे आहेत आणि त्यावरदेखील काळेपणा येऊ शकतो याची कल्पना तुम्हाला आहेच. त्यापैकी महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मान. महत्त्वाचं म्हणजे मानेची त्वचा अतिशय मऊ आणि मुलायम असते त्यावर सर्वात जास्त ऊन आणि प्रदूषणाचा प्रभाव असतो. चेहरा आपण दिवसातून किमान दोन ते तीन वेळा धुतो पण मान इतक्या वेळा धुणं शक्य नसते. त्यामुळे मानेवरील काळे डाग वाढत जातात. अशा वेळी काळी मान गोरी करण्यासाठी उपाय आपण शोधतो. मानेवर काळे डाग येणे हे काही नवीन नाहीत.
परंतु मित्रांनो आज आपण घरच्या घरी उपाय करून मानेवरील काळेपणा आपण सहजपणे दूर करू शकतो. चेहरा व्यवस्थित असला आणि मान काळी दिसली तर दिसायला हे अतिशय वाईट दिसतं. परंतु मित्रांनो आज आपण जो घरगुती उपाय सांगणार आहोत उपाय जर आपण आपल्या घरामध्ये केला तर यामुळे आपल्या काळी मान, पाय यापासून काही दिवसांमध्येच सुटका होईल. तर मित्रांनो हा उपाय करताना आपल्याला कोणकोणते घटक वापरायचे आहेत आणि हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दल आता आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया.
तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला आपल्या घरामध्येच असणाऱ्या काही गोष्टी लागणार आहेत. त्या गोष्टींचाच वापर करून अगदी सोप्या पद्धतीने आपण हा उपाय आपल्या घरामध्ये करू शकतो. तर मित्रांनो आपल्या घरामध्ये असणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी या उपायासाठी लागणार आहेत तर त्यामधील सर्वात पहिली वस्तू आहे म्हणजे एक टोमॅटो. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतोच आणि त्यानंतर दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे हळद, साखर आणि लिंबू. मित्रांनो हे तिन्ही पदार्थ आपल्या घरामध्ये असतातच. यांचा वापर करून आजचा हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर मित्रांनो सर्वात आधी एक टोमॅटो तुम्ही मधून चिरून घ्यायचा आहे आणि त्याचे दोन भाग तयार करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या पहिल्या भागावर तुम्हाला एक अर्धा चमचा हळद टाकायची आहे.
त्यानंतर त्या हळद टाकलेल्या अर्ध्या टोमॅटो ने आपल्याला आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर गोलाकारपणे मालिश करायचे आहे. मित्रांनो कमीत कमी पाच ते दहा मिनिटे तुम्हाला अशा पद्धतीने चेहऱ्यावर मालिश करायचे आहे. मित्रांनो यामुळे आपले चेहऱ्यावर जे काही नको असलेली घाण आहे ही सर्व घाण यामुळे निघून जाईल आणि आपला चेहरा चमकदार होण्यास मदत होईल. तर म्हणूनच अशा पद्धतीने आपण या टोमॅटोच्या पहिल्या भागावर थोडीशी हळद घेऊन त्याने आपला संपूर्ण चेहरा स्क्रब करून घ्यायचा आहे. दहा ते पंधरा मिनिटं अशा पद्धतीने मालिश केल्यानंतर आपल्याला हे कोमट पाण्याने आपला चेहरा धुऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आता आपल्याला त्यावर दुसरा स्क्रब लावायचा आहे.
तर मित्रांनो हा दुसरा स्क्रब लावत असताना आपल्याला जो अर्धा टोमॅटो आपण शिल्लक ठेवला होता तो घ्यायचा आहे. त्यानंतर त्यावर थोडीशी साखर आपल्याला टाकायचे आहे किंवा तो अर्धा टोमॅटो आपण एका प्लेटमध्ये साखर घेऊन त्यात बुडवला म्हणजेच त्याला व्यवस्थितपणे सगळीकडे साखर लावली तरीही चालेल आणि त्यानंतर आपल्याला त्यावर अर्धा लिंबू पिळायचा आहे. लिंबू पिळल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा या दुसऱ्या टोमॅटोच्या भागाने आपल्या संपूर्ण चेहऱ्याला स्क्रब करून घ्यायचा आहे. मित्रांनो दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला याने स्क्रब करून घ्यायचा आहे. यामुळे आपल्या चेहऱ्यावर असणाऱ्या सर्व मृतपेशी निघून जातील आणि आपला चेहरा चमकदार होईल. दहा ते पंधरा मिनिटे मालिश केल्यानंतर आपल्याला थंड पाण्याने आपला चेहरा धुऊन घ्यायचा आहे.
तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जर हा एक उपाय तुमच्या घरांमध्ये आठवड्यातून दोन वेळा किंवा जर तुमच्या घरामध्ये लग्नकार्य असेल किंवा इतर कोणतेही कार्य असेल तर अशावेळी त्याच्या आदल्या दिवशी हा उपाय केला तर यामुळे तुमच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज येईल. तुमचा चेहरा गोरा होईल. तुमच्या चेहऱ्यावर असणाऱ्या मृतपेशी निघून जातील आणि तुम्ही दुसऱ्या दिवशी लग्न समारंभामध्ये उठून दिसाल.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.