मित्र मैत्रिणींनो जर तुम्ही पण दररोज जेवण झाल्यानंतर बडीशेप खात असाल तर ही माहिती तुम्हा सर्वाना माहित असणे गरजेचं आहे नाहीतर ………….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, जेवण झाल्यावर अगदी हमखास खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे बडीशेप. अनेकांना तर चहा-कॉफी घेतल्यावरही बडीशेप खाण्याची सवय असते. आता मुखवास म्हणून खाल्ली जाणारी या बडीशेपमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. हे आपल्यातील अनेकांना कदाचित माहित नसेल. शरीरासाठी आवश्यक असणारे क जीवनसत्व, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि आयर्न असे अनेक घटक बडीशेपमध्ये असतात. त्यामुळे जेवणानंतर न चुकता बडीशेप खायला हवी. असे असले तरी ती योग्य त्या प्रमाणातच खायला हवी, फायदेशीर असते. म्हणून बेसुमार खाल्ली तर ते आरोग्यासाठी हानिकारकही ठरु शकते.

बडीशेप हा मसाल्याचा एक पदार्थ असून पदार्थांना स्वाद येण्यासाठीही त्याचा उपयोग केला जातो. मित्रांनो आज आपण बडीशेप खाल्ल्यामुळे आपल्याला कोणकोणते प्रकारचे फायदे होतात याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो अनेकांना जळजळीत खाल्ले किंवा प्रवासात जेवण झाल्यावर मळमळ आणि करपट ढेकर येण्याचा त्रास होतो. काहींना अजीर्ण झाल्यासारखे होते. अशावेळी बडीशेप खाल्ल्यास हा त्रास काही प्रमाणात कमी होऊ शकतो. तसेच अशा लोकांनी नियमीतपणे जेवण झाल्यावर थोडी बडीशेप खायला हवी म्हणजे हा त्रास कालांतराने बंद होतो.

बडीशेप ही मुखवास म्हणून ज्याप्रमाणे उपयुक्त असते त्याचप्रमाणे शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण होण्यासाठीही ती फायद्याची ठरते. शरीराची क्रिया चांगली होण्यासाठी रक्तशुद्धी होणे गरजेचे असते. त्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका टळू शकतो.

रात्रभर पाण्यात बडीशेप भिजत ठेवली आणि सकाळी उठल्यावर अनोशापोटी हे पाणी प्यायले तरी रक्तशुद्धी होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील अनेक तरुणांना वेगवेगळ्या कारणांनी चेहऱ्यावर पिंपल्स येतात. तसेच पुटकुळ्याही येतात. मात्र दररोज बडीशेप खाल्ल्यास ही समस्या कमी होण्यास मदत होते.

बडीशेपमधील घटक आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने चेहऱ्यावर येणारे पिंपल्स दूर होण्यास मदत होते. शरीरातील हॉर्मोन्सची पातळी चांगली ठेवण्यासाठी तसेच त्वचा थंड ठेवण्यासाठी झिंक, कॅल्शियम आणि सेलेनियम हे बडीशेपमधील घटक परिणामकारक असतात.

मित्रांनो बडीशेपमध्ये असणारे अँटीऑक्सिडंटस चयापचयाच्या क्रियेत मदत करतात. त्यामुळे शरीरातील अतिरीक्त चरबी कमी होण्यास मदत होते आणि नकळत वजनावर नियंत्रण येण्यास मदत होते. त्यामुळे लठ्ठ व्यक्तींनी ब़डीशेप आवर्जून खायला हवी आणि बडीशेपमुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.

मित्रांनो, त्यामुळे हृदयरोगाची समस्या टळण्यास मदत होते. बडीशेपमधील पोटॅशियममुळे शरीरातील फोलेटचे प्रमाण कमी होते. उच्च रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. आणि त्याचबरोबर बडीशेप वापरुन श्वासोच्छवासाच्या समस्येवर मात करता येते. बडीशेपममध्ये कफपासून मुक्त करणारे गुणधर्म असल्याने फ्लू, सायनस, खोकला, सर्दी इत्यादी संसर्ग काढून टाकण्यात खूप उपयुक्त ठरते.

मित्रांनो बडीशेपच्या मदतीने वजन कमी केले जाऊ शकते. तिचे सेवन केल्याने भूक कमी होते आणि पोट भरते. बडीशेपला एक नैसर्गिक चरबी नष्ट करणारा पदार्थ म्हणून देखील ओळखले जाते आणि आपली पाचनशक्ती वाढविण्यास आणि चरबी वितळविण्यास ती मदत करते.

मित्रांनो जर बडीशेपद्वारे वजन कमी करायचे असेल तर बडीशेप तळून घ्या आणि बारीक करून घ्या. ती पावडर दिवसातून दोनदा गरम पाण्याने घ्या म्हणजे फायदा होईल आणि ज्या लोकांना पोटातील वात, बद्धकोष्ठता, गॅस, आंबटपणा इत्यादी समस्या आहेत. अशा लोकांना बडीशेप उपयुक्त आहे. या औषधी वनस्पतीद्वारे पचन शक्ती वाढवता येते.

मित्रांनो आपण जेवल्यानंतर बडीशेप चांगली चावून खाल्ल्यामुळे याचा आपल्याला चांगला फायदा होईल. ओटीपोटात वेदना, सूज येणे या समस्येपासून देखील मुक्त व्हाल. जर आपल्याला अपचनाचा त्रास होत असेल तर बडीशेप चहा चांगला पर्याय असू शकतो.

तर मित्रांनो अशा या बडीशेपचे योग्य प्रमाणात तुम्ही सेवन करा. जर अतिप्रमाण आपण याचे सेवन केले तर याचे वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.