मराठमोळा कलाकार स्वप्निल जोशी यांना आलेला श्री स्वामी समर्थांचा अंगावर काटा आनणारा श्री स्वामी समर्थांचा अनुभव ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आज आपण सुप्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी यांनी स्वामींबद्दल आपल्या असलेल्या भावना किंवा त्यांना स्वामींची प्रचीती तसेच ते स्वामीभक्त कसे झाले त्याबद्दल त्यांनी सांगितले आहे. स्वप्नील जोशी काहीसे असे अनुभव शेअर करतात, मी स्वप्निल जोशी, माझं भाग्य आहे की आज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या बद्दल मला बोलण्याची संधी मिळाली. आणि मला असं वाटतं की माझं आणि स्वामींचे नातं हे माझ्या जन्माच्या आधीपासूनच आहे. याचे कारण म्हणजे माझे वडील मोहन जोशी आणि आई अनुराधा जोशी हे जोशी कुटुंब निसिम स्वामींची भक्ती आजही करतात, बाबा गेली अनेक वर्ष साधारणपणे मला असं वाटतं की गेली पन्नास वर्ष स्वामींची सेवा करत आहेत.

आणि मित्रांनो आम्ही गावात राहायला होतो आणि कांदेवाडीत स्वामींचा मठ आहे आणि बाबांची ठरलेली वेळ असायची की सकाळी उठायचं आणि आंघोळ करायची, गिरगावात सकाळी पाच साडेपाच ला पाणी यायचं, सकाळी पहिला ते स्वामींच्या मठात जायचे, दर्शन घ्यायचे आणि मग घरी येऊन ते आपल्या दिनचर्येची सुरुवात करायचे. मी सकाळी उठल्यावर आईला विचारणार, कि बाबा कुठे आहेत? तेव्हा आई सांगायची की बाबा मठात केले गेले आहेत, लहानपणापासूनच कानावर पडले आहे स्वामींची सेवा, मी थोडा मोठा झाल्यावर आई मला घेऊन जायची आणि मग मलाही कळत न कळतपणे का होईना स्वामी नावाची गोडी लागली.

आणि मी फार रिलीजीअस असा नाही आहे, मी जास्त स्पिरिच्युअल आहे, माझे बाबा म्हणतात की मी रामायणात आणि महाभारतमध्ये श्री कृष्णा चे काम केले आहे, त्यामुळे थोरामोठ्यांचा आशीर्वाद मला लाभले, जे धार्मिक संत होते त्यांचे आशीर्वाद मला मिळाले. आणि अनेक जाणकारांच्या भेटण्याचा योग आला, त्या प्रत्येकाच म्हणणं होतं की या कलियुगात परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यात सोपा मार्ग आहे तो म्हणजे नामस्मरण ! मला आनंद हा आहे की मी लहानपणापासूनच ते करत आलोय, बघत आलोय, माझ्या बाबांमुळे व माझ्या आईमुळे त्याच्यात काय ताकद आहे हे फक्त नामस्मरण करणारा माणूसच तुम्हाला सांगू शकतो.

आणि मित्रांनो व्हायब्रेशन्स , एनर्जी, थ्रील करण्यासाठी नामस्मरण करायला पाहिजे. मी स्वामी समर्थांचे करतो , हे मी आवर्जून तुम्हाला सांगतो की स्वामी समर्थच महाराजांचे करायला हवे असे नाही, तुम्हाला ज्या कोणत्याही अन्य अद्भुत शक्तीचे करायचे असेल त्यांचे करा, मग त्यामध्ये गुरुनानक असेल, दत्तगुरु असतील रामकृष्ण , पांडुरंग कोणीही तुमचा देव तुमच्या मनात आहे त्या शक्तीला, त्याचं नाव घ्या, नामस्मरण करा आणि मला खात्री आहे की ती शक्ती तुमच्यासाठी उभी राहते .तुम्हाला ताकत देते. जसे स्वामी माझ्यासाठी उभे राहतात. आणि माझ्या परिवारासाठी अनेक छोट्या-मोठ्या प्रसंगातून अनेक वेळा स्वामीनी मला बाहेर काढले आहे.

आणि काही वेळी असं वाटतं, पुढे अंधार आहे, उद्याची सकाळ आपण बघणार की नाही पण आणि लिटरली इतका वाईट प्रसंग जरी आला , तुम्हाला ते अलगद बाहेर काढतात. आणि नंतर तुम्हाला तसं काही झालंच नव्हतं पण आपण उगाच टेंशन करत होतो अस लगेच तुम्हाला ते प्रॉब्लेम मधून अलगद बाहेर काढतात. इतकेच नव्हे तर असं एक माझं स्वतःच मत आहे की जर तुमच्या हातून काही चुकलं तर ते त्याची शिक्षा स्वामी लगेच देतात, स्वामींच्या भक्तांना जाणवत असेल की लगेच फटका मिळतो, लगेच समजतं की आपण असं केलं ना म्हणून स्वामींनी शिक्षा दिली आणि त्यांचे वास्तव्य असल्याचं जाणवतं.

आणि माझ्याकडे शेअर करायला काही चमत्कार नाही किंवा गमतीशीर प्रसंग नाही, पण मी तुम्हाला ईतकच सांगेन की एक वेगळ्या प्रकारची ताकद, एक वेगळ्या प्रकारचे समाधान, एक वेगळ्या प्रकारची शांती स्वामींच्या नामस्मरण केल्याने मिळते.सर्वांना मी इतकेच सांगेल की दिवसातले पाच मिनिटे स्वतःसाठी काढा, व्यायाम करा आणि पाच मिनिट म्हणजेच शांतीसाठी नामस्मरण करा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात आपोआप बदल जाणवेल ,आपोआप तुमच्या आजूबाजूची परिस्थिती बदलायला लागेल, चमत्कार होईल का ! तर नाही, पण जे समोर येते त्याला सामोरे जाण्याची शक्ती मात्र निश्चित वाढल्याचे तुम्हाला जाणवेल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.