41 वर्ष स्वामी सेवा केली तरीही मुलाने घराबाहेर काढले सुनेने आश्रमात नेहून टाकले, इतकी स्वामी सेवा करत होते पण शेवटी ………! हा अनुभव वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल ?

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा आणि त्याचबरोबर स्वामींची कृपादृष्टी कायमच आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर राहावी यासाठी आपल्यातील अनेक जण स्वामींचे सेवा अगदी दररोज न चुकता करत असतात यामध्ये स्वामींचे पारायण स्वामींचा नाम जप, गुरुचरित्र, पारायण, सारामृताचे वाचन इत्यादी अनेक गोष्टी या स्वामींच्या वेगवेगळ्या सेवांमध्ये केला जातात आणि मित्रांनो आपल्यातील अनेक स्वामी भक्त ज्या पद्धतीने स्वामी सेवा करत असतात त्या सेवेचे फळ देखील स्वामी त्यांना कधी ना कधी तर देतातच आणि त्याचबरोबर त्यांच्यावर आलेल्या प्रत्येक संकटातून स्वामी त्यांना बाहेर काढत असतात.

मित्रांनो स्वामी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे येऊन प्रत्येक भक्ताची मदत करत असतात आणि त्याच्यावर आलेल्या संकटातून स्वामी त्या भक्ताला बाहेर काढतातच. तर मित्रांनो असाच एक स्वामी भक्ताला आलेला अनुभव स्वामी सेवेकराला आलेला अनुभव आज आपण पाहणार आहोत.

मित्रांनो हा अनुभव आहे कल्याण येथील सुमन ताईंचा. तर कोणता आहे हा त्यांना आलेला स्वामी अनुभव आणि स्वामिनी त्यांना कोणत्या संकटातून बाहेर काढलेले आहे हे आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. तर मित्रांनो आपला स्वामी अनुभव सांगत असताना सुमन ताई आपल्याला सांगतात की, मी गेली 41 वर्ष स्वामी सेवा करते म्हणजे लहान असल्यापासूनच स्वामींचे सेवा मी करत आहे.

त्यानंतर जशी जशी मी मोठे झाले तसे तशी स्वामींवर माझा जास्तच विश्वास घट्ट होत गेला आणि मी स्वामींच्या वेगवेगळ्या सेवा करायला सुरुवात केली आणि स्वामींच्या सेवेमध्ये खूपच आनंद मला मिळाला सुरुवात झाली. लग्नानंतरही मी स्वामींची सेवा सुरू ठेवली.

मी स्वामींच्या सेवेमध्ये स्वामींचा नाम जप स्वामींचे पारायण सारांमृताचे वाचन या सर्व गोष्टी अगदी मनापासून आणि श्रद्धेने करत आलेले आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक गुरुवारच्या दिवशी स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जाऊन तिथेही मी स्वामींचा नाम जप करते आणि थोडा वेळ घालवते आणि मगच घरी येते तर अशा पद्धतीने माझी स्वामी भक्ती सुरू होती.

मी आणि माझे पती आणि एक मुलगा आणि एक मुलगी असे आम्ही चौघेजण घरात असत त्यानंतर मुलगी मोठी झाल्यानंतर मुलगीची आम्ही लग्न लावून दिले आणि त्यानंतर थोड्याच दिवसांनी मुलाचेही लग्न झाले. परंतु मुलाने आम्हाला न सांगता लग्न केले होते. त्यांनी त्याच्या पसंतीनुसार बायको करून घरामध्ये आणली.

त्यानंतर आमच्या घराचे संपूर्ण रूपच पालटून गेले. म्हणजे जी सून माझ्या मुलाने करून घरामध्ये आणलेली होती ती खूपच वाईट होती. म्हणजेच ती खूपच वाईट वृत्तीची होती आणि तिला घरामध्ये देवधरम केलेला आवडत नव्हता. त्याच बरोबर ती मला व माझ्या पतीला आमचे वय झाल्यामुळे तीरस्काराने वागवत होती.

ती आल्यापासून आम्ही आमच्याच घरामध्ये परक्याप्रमाणे राहत होतो आणि यावर आमचा मुलगाही काही बोलत नव्हता तोही बायकोच्या भीतीने बायकोच्या हो मध्ये हो मिळवत होता आणि अशा पद्धतीने आम्ही काही दिवस काढले. अचानकपणे माझ्या पतीला पॅरालिसिसचा झटका आला आणि त्यानंतर ते खूपच आजारी पडले आणि ते कायम झोपूनच होते.

अशा पद्धतीने त्यांच्या उपचारासाठी सुद्धा आमचा मुलगा पैसे देत नव्हता. याचं आम्हाला दुःख वाटत होतं आणि त्यामुळे पुढे काही दिवसांमध्येच माझ्या पतीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने माझे वाईट दिवस सुरू झाले. कारण जेव्हा माझ्या पतीचे निधन झाले तेव्हा सूनेने मला जास्त त्रास द्यायला सुरुवात केली.

त्यामुळे मला जगणे सुद्धा नको झालेले होते परंतु मी स्वामींसाठी जगण्याचा निर्णय घेतला आणि जे काही घरांमध्ये खाण्यासाठी मिळेल ते खाऊन असे कसे मी दिवस काढत होते आणि एके दिवशी अचानकपणे माझ्या मुलाने मला घराच्या बाहेर काढले म्हणजेच एक दिवशी मला माझा मुलगा थोडे फिरून येऊया असे म्हणून बाहेर घेऊन गेला.

मला एका वृद्धाश्रमात सोडले. त्यानंतर मी त्याला विनंती करून घरामध्ये असणारी मी स्वामींची एक छोटीशी मूर्ती माझ्यासोबत घेतली आणि वृद्धाश्रमात राहण्यासाठी गेले. ज्या घरामध्ये मी स्वामींच्या सेवा दिवस-रात्र केलेली होती त्या घरातूनच आता मला माझ्या मुलाने बाहेर काढले होते आणि मला वृद्धाश्रमामध्ये नेऊन सोडले. तिथे गेल्यानंतर थोडे दिवस मला अस्वस्थ वाटत होते परंतु हळूहळू सवय झाली त्यानंतर पुढे सहा महिन्यांनी माझा मुलगा रडत रडत वृद्धाश्रम मध्ये आला.

साक्षात काय चमत्कार झाला होता तर त्याची जी बायको होती तिचे एका कार एक्सीडेंट मध्ये निधन झालेले होते आणि त्यानंतर त्याला आईच्या अस्तित्वाची जाणीव झाली आणि म्हणून तो माझ्याकडे आलेला होता. तो आल्यानंतर त्याने माझे पाय धरले माफी मागितली आणि घरी चल म्हणून आग्रहच केला.

म्हणूनच मी त्याच्यासोबत घरी आले आणि घरी आल्यानंतर दुसरी पोरगी बघून मी त्याचे लग्न लावून दिले आणि स्वामींच्या आशीर्वादाने जी दुसरी सून मी करून घरामध्ये आणली. ती एक स्वामी सेवेकरी होती. ती अगदी नम्र आणि संस्कारी मुलगी होती. आता स्वामींच्या आशीर्वादाने माझा मुलगा आणि तिचा संसार खूप सुखा समाधानाने सुरू आहे. श्री स्वामी समर्थ!

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.