स्वामींच्या 11 गुरुवारची मांडणी कशी करावी? संपूर्ण माहिती एकदा नक्की वाचा आणी शेअर करा ; श्री स्वामी समर्थ …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे भक्त आहेत. आपण अनेक प्रकारच्या सेवा स्वामींच्या करीत असतो. केंद्रांमध्ये तसेच मठांमध्ये आपल्याला स्वामींच्या सेवा करताना बरेच जण आपण पाहत असतो. तर मित्रांनो अनेक जण हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरूवारची व्रत करीत असतात. ते व्रत लक्ष्मीचे मातेचे असते. तर मित्रांनो तसेच स्वामींचे देखील अकरा गुरुवारचे व्रत असते. तर मित्रांनो स्वामींचे हे अकरा गुरुवारचे व्रत आपल्यापैकी बरेच जण करीत असतात. बऱ्याच जणांना आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी तसेच कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत तसेच अनेकांना नोकरीमध्ये यश मिळत नसेल अशा विविध अनेक प्रकारच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी बरेचजण हे स्वामींचे अकरा गुरुवरचे व्रत करीत असतात.

मित्रांनो अकरा गुरुवारचे व्रत केल्यानंतर बऱ्याच जणांना स्वामींची प्रचिती देखील आलेली आहे. आपल्या इच्छा पूर्ण देखील झालेल्या अनेकांना अनुभव आलेले आहेत. तर मित्रांनो हे स्वामींचे ११ गुरुवारचे व्रत करताना त्या पूजेची मांडणी कशाप्रकारे करायची आहे? याचीच आज मी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे.

स्वामी समर्थ महाराज हे आपल्याला प्रत्येक अडचणीतून बाहेर काढत असतात. ते आपल्या भक्ताला योग्य तो मार्ग देखील दाखवत असतात. तर मित्रांनो तुम्हाला देखील स्वामींचे ११ गुरुवारचे व्रत जर करायचे असेल तर मी ज्याप्रमाणे सांगेन त्याप्रमाणे या 11 गुरुवार व्रताची मांडणी करायची आहे.

तर मित्रांनो हे अकरा गुरुवारचे व्रत गुरुवारपासून सुरू करायचे आहे. गुरुवारी तुम्ही सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून घ्यायचे आहे आणि आपण ज्या ठिकाणी पूजेची मांडणी करणार आहोत त्या ठिकाणची जागा ही स्वच्छ करायची आहे.

तिथे पाट किंवा चौरंग मांडायचा आहे आणि या चौरंगावरती किंवा पाठावरती तुम्ही एक वस्त्र अंथरायचे आहे. हे वस्त्र लाल रंगाचे असावे. या वस्त्रावर तुम्ही जर तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ पुसून ठेवायचा आहे. तसेच मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांचा जो फोटो आहे त्याच्या उजव्या बाजूला तुम्ही घंटी ठेवायचे आहे आणि डाव्या बाजूला शंख ठेवायचा आहे.

तसेच स्वामींच्या फोटोला तुम्ही गंध लावायचा आहे. स्वामींच्या फोटोपुढे तुम्ही एखादे फळ जे तुमच्या घरामध्ये उपलब्ध आहे ते फळ ठेवायचे आहे आणि जे फळ तुम्ही ठेवले आहे त्या फलाच्या साईडला तुम्ही एका वाटीमध्ये साखर घ्यायची आहे थोडीशी आणि त्यामध्ये तुळशीचे पान टाकायचे आहे आणि ती वाटी त्या फोटो समोर ठेवायचे आहे.

त्याच्या बाजूला तुम्ही एक फुलपात्रभर पाणी भरून ठेवायचे आहे. तसेच मित्रांनो आपण जिथे घंटी ठेवलेली आहे त्याच्यासमोर तुम्ही आपल्या घरामध्ये जर जपमाळ असेल तर ती जपमाळ ठेवायचे आहे. तसेच आपण आपल्या स्वामींच्या फोटोला तुम्ही हार घालायचा आहे. हार नसेल तर तुम्ही फुले देखील अर्पण करू शकता.

तसेच मित्रांनो तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थांचे गुरुचरित्र सारामृत पोथी असेल तर तुम्ही ती पोथी त्या पाठावर ठेवायची आहे. तसेच मित्रांनो तुम्ही ही सर्व मांडणी करत असताना अगरबत्ती आणि धूप तसेच दिवा प्रज्वलित करायचा आहे. मित्रांनो ही मांडणी करीत असताना तुमच्या मनात कोणतेही विचार येता कामा नये. फक्त तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरण करायचे आहे.

तर मित्रांनो अशी ही व्यवस्थित मांडणी आपल्याला करायची आहे. तर मित्रांनो तुम्ही हे 11 गुरुवारचे व्रत का करत आहात म्हणजेच 11 गुरुवारचे व्रत करण्याअगोदर आपणाला संकल्प सोडायचा असतो. हा संकल्प सोडत असताना तुम्हाला एक ताट घ्यायचे आहे आणि एक फुलपात्रात पाणी घ्यायचे आहे.

थोडेसे ते पाणी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये एक फुल तुम्ही टाकायचे आहे आणि जी तुमची कोणती इच्छा आहे म्हणजे ती पूर्ण व्हावी यासाठी तुम्ही अकरा गुरुवारचे व्रत करत आहात तर ती इच्छा बोलायचे आहे आणि तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणून ते पाणी त्या ताटामध्ये सोडायचे आहे.

तर मित्रांनो असा हा संकल्प आपल्याला अकरा गुरुवारचा व्रताचा करायचा आहे आणि हा संकल्प केल्यानंतर तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये किंवा मठांमध्ये जाऊन तुम्ही एक नारळ आणि खडीसाखर त्या मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जाऊन स्वामींचे चरणी अर्पण करायचा आहे. तुमच्या घराच्या आसपास कुठेही जर केंद्र किंवा मठ नसेल तर तुम्ही तो नारळी किंवा खडीसाखर अर्पण नाही केली तरीही चालते.

तसेच मित्रांनी हे 11 गुरुवारचे चे स्वामींचे व्रत आहे हे व्रत करीत असताना आपण पूर्णपणे मांडणी केल्यानंतर संकल्प केल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप तसेच अकरा वेळा तारक मंत्राचा जप करायचा आहे आणि नंतरच मग पोथी वाचण्यास म्हणजेच सारामृत वाचण्यास सुरुवात करायचे आहे.

तर मित्रांनो अनेक बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की आम्हाला सकाळी तेवढा वेळ नसतो. तर तुम्ही सकाळी पूजेची मांडणी करायची आहे आणि आरती करायची आहे आणि मग दिवसभरात किंवा संध्याकाळी तुम्ही बाकीच्या विधी करू शकता.

म्हणजेच तारक मंत्र तसेच स्वामी समर्थांचा मंत्र आणि सारा मृत वाचणे या विधी तुम्ही संध्याकाळी देखील करू शकता. फक्त सकाळी तुम्ही मांडणी करून आरती करू शकता.

तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही देखील जर स्वामींचे अकरा गुरुवारचे व्रत करणार असाल तर अशा प्रकारे मांडणी करून या सर्व विधी पूर्ण करायचे आहेत. स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण करतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.