चांगली वेळ येण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ आपल्याला देतात हे १० शुभ संकेत, बघा तुम्हाला पण मिळत आहेत का हे संकेत …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये सर्व गोष्टी असाव्यात तसेच आपले जीवन हे सुखा समाधानाचे असावे असे वाटतच असते आणि त्यासाठी प्रत्येक जण हा मेहनत कष्ट घेतच असतो. तसेच आपण अनेक देवी देवतांचे पूजा अर्चना देखील करीत असतो. तर बऱ्याच वेळा आपण देवधर्म करून तसेच खूप सारी मेहनत घेऊन देखील आपणाला त्याचे शुभफळ प्राप्त होत नाही. म्हणजेच आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत राहतात. मग त्यावेळेस आपण खूपच निराश होत राहतो.

 

तर मित्रांनो आज मी तुम्हाला असे काही संकेत सांगणार आहे. या संकेतांवरून तुम्ही जाणून घेऊ शकता की तुमची देखील चांगली वेळ येणार आहे. म्हणजेच तुमची चांगली वेळ येण्यापूर्वी आपल्याला हे काही शुभ संकेत मिळत असतात. ज्याकडे आपण दुर्लक्ष करीत असतो. तर हे संकेत तुम्हाला मिळाले तर तुम्ही त्यावेळेस समजून जा की तुमची चांगली वेळ आता सुरू होणार आहे.

 

तर त्यातील पहिला जो संकेत आहे तो म्हणजे जर तुमच्या घरामध्ये काळया मुंग्यांनी वर्तुळ तयार केले तर हे आपल्यासाठी खूपच शुभ मानले जाते. यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करणार आहे तसेच माता लक्ष्मी तुमच्यावर सदैव प्रसन्न होणार आहे आणि आपले चांगले दिवस येणार आहेत हे मात्र नक्की.

 

मित्रांनो तुम्ही आपल्या आजूबाजूला झाडावरती पक्षांची घरटे पाहिलेच असेल. परंतु जर तुमच्या घरात एखाद्या पक्षाने घरटे बनवणे हे खूपच शुभ संकेत मानले जाते. यामुळे आपल्या घरामध्ये महालक्ष्मीचे आगमन होणार आहे हे समजून जा. म्हणजे तुमच्या घरामध्ये एखाद्या कोणत्याही पक्षांनी जर त्याचे घरटे तयार केले तर हे आपल्यासाठी खूपच शुभ असते.

 

मित्रांनो तुम्ही आपल्या घरामध्ये अनेक प्रकारचे प्राणी पाहिले असतील म्हणजेच मुंग्या, पाल, उंदीर तर अनेक जण आपल्या घरामध्ये पाल पाहिले की खूपच घाबरतात. परंतु आपल्या घरामध्ये पाल असणे हे शुभ लक्षण आहे. म्हणजेच तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये असणाऱ्या देवघरांमध्ये पाल दिसली तसेच तुमच्या घरामध्ये असणाऱ्या तुळशीच्या रोपांमध्ये पाल दिसली तर हे खूपच शुभ लक्षण आपल्यासाठी आहे. म्हणजेच आपली चांगली वेळ सुरू होणार आहे. म्हणजेच आपल्याला धनलाभ अमाप संपत्ती मिळू शकते हा त्यामागचा संकेत असतो.

 

शास्त्रानुसार जर तुमच्या हाताला खाज होत असेल म्हणजेच तळहाताला खाज होत असेल तर हा देखील आपल्यासाठी खूपच शुभ लक्षण असतो. म्हणजेच आपली चांगली वेळ येण्या मागचा हा संकेत असतो. जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला धनलाभ होऊ शकतो. तसेच चांगली बातमी देखील आपल्या काणी पडू शकते. म्हणजे हाताला खाज येणे हे धनलाभाचे लक्षण आहे. त्यामुळे हे आपल्यासाठी शुभ संकेत मानला जातो.

 

जर तुम्हाला स्वप्नामध्ये बासुरी, हत्ती, शंकर, नाग, गुलाब, तारे ,झाडू दिसले तर हे देखील आपली चांगली वेळ येणे मागचा संकेत आहे. म्हणजेच आपल्यावर माता लक्ष्मी खूपच प्रसन्न आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला धनलाभ होऊ शकतो. तसेच तुम्हाला जर सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी जर शंखाचा आवाज पाणी पडला तर हा आपल्यासाठी शुभ संकेत मानला जातो. ज्यामुळे आपल्या घरामध्ये लवकरच लक्ष्मीची आगमन होणार आहे.

 

तसेच जर तुम्हाला घराच्या बाहेर तुम्ही त्यावेळेस जाता त्यावेळेस तुम्हाला जर ऊस दिसला तर हा देखील संकेत आपल्यासाठी शुभ मानला जातो. यामुळे आपल्याला पैसे मिळू शकतात.

 

मित्रांनो घुबड दिसणे हे अनेक ठिकाणी शुभ तर अनेक ठिकाणी अशुभ मानले गेलेले आहे. जर तुम्ही एखाद्या प्रवासाला जात असाल आणि वाटेत तुम्हाला जर घुबड दिसले तर हे आपल्यासाठी शुभ संकेत मानला जातो. म्हणजेच यामुळे आपल्याला अमाप संपत्ती मिळवणार आहे तसेच आपल्या कामांमध्ये आपल्याला यश मिळणार आहे. हे मात्र नक्की.

 

परंतु जर तुम्हाला घुबड आपल्या घरी आलेले दिसेल तर हे मात्र आपल्यासाठी अशुभ मानले गेलेले आहे. यामुळे आपल्या घराची प्रगती देखील थांबू शकते. तसेच मित्रांनो जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जाणार असाल आणि वाटेत जर एखादा कुत्रा काहीतरी खाताना जर तुम्हाला दिसत असेल तर हा आपल्यासाठी शुभ संकेत असतो. जेणेकरून आपणाला खूप पैसे मिळू शकतात आणि लवकरच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन देखील होणार आहे हे मात्र नक्की.

 

त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्हाला सकाळी सकाळी बाहेर पडल्यानंतर कोणीतरी झाडू मारताना दिसल्यास तर हा देखील आपल्यासाठी शुभ संकेत मानला जातो. जर तुम्हाला दररोज हे दृश्य दिसत असेल तर समजून जा की तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच धनलाभ होणार आहे. तसेच आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहणार आहे.

 

आपले चांगले दिवस येणार आहेत आणि आपण लवकरच श्रीमंत होणार आहोत. तर मित्रांनो वरील सांगितलेले हे काही संकेत जर तुम्हाला देखील दिसत असतील तर तुम्ही त्यावेळेस नक्की समजून जा की तुमची लवकरच चांगली वेळ आता सुरू होणार आहे. तुमचे चांगले दिवस यायला वेळ लागणार नाही आणि या संकेतांकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.