उद्या सोमवार शिवलिंगाला बेलपत्र वाहताना ही एक चूक अजिबात करू नका ; नाहीतर संपूर्ण घर होईल बरबाद , महादेव होतील क्रोधित: पहा नेमक्या कोणत्या आहेत या चुका ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, खूप लोक शिवभक्त आहेत. नेहमीच शिवाची पूजा भक्ती करतात. पण श्रावण महिना महादेवांचा खूप खास आहे. या महिन्यात प्रत्येक शिवभक्त शिवशंभोची म्हणजे महादेवांची, शिवलिंगाची मोठ्या भक्तिभावाने पूजा करतो. श्रावण महिन्यात केलेली पूजा तत्काळ मान्य होते. श्रावण महिन्यात देव महादेव आपल्या भक्तावर लगेच प्रसन्न होतात. शिवलिंगाची पूजा करताना शिवलिंगा वरती प्रत्येकजण बेलपत्र अवश्य वाहतो. बेलपत्र हे शिवशंभुना अतिशय प्रिय आहे. त्यामुळे बेलपत्र वाहणे खूपच महत्त्वाचे असते. त्यामुळे महादेवांचा कृपाशिर्वाद आपल्या भक्तांना प्राप्त होत असतो.

मित्रांनो बेलपत्राला बिल्वपत्र असे संस्कृत मधे नाव आहे. भगवान शिवशंकरांना बिल्वपत्र अत्यंत प्रिय आहेत. जो भक्त शिवलिंगावर मनोभावे बेलपत्र आणि जल अर्पण करतो त्या भक्ताच्या मनातली इच्छा भगवान शिवजी पूर्ण करतात.सर्व मनोकामना पूर्ण करतात.

मित्रांनो बेलपत्र म्हणजे बेलाच्या झाडाची पानं. हिंदू धर्म शास्त्रानुसार शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने भोले शंकराची कृपा प्राप्त होते. मात्र हे बेलपत्र कसे अर्पण करावे ? बेलपत्र कोणत्या पद्धतीने तोडावे हे बऱ्याच जणांना माहिती नाही. यामुळेच खूप वेळा बेलपत्र तोडताना आणि ते अर्पण करताना नकळतपणे आपल्या हातून चूक होते आणि चुकीची पूजा केल्याने ती पूजा व्यर्थ जाते.

मित्रांनो शिवलिंगाची पूजा केल्याने पूजेचं जस फळं मिळायला हव तस मिळत नाही. कारण पूजेला बेलपत्र वाहण्यासाठी तोडत असताना काही नियम सांगितलेले असतात. हे नियम पाळणे गरजेचे असते. बेलपत्र भगवान शिवशंकरांच मस्तिष्क शितल ठेवण्याचं काम करतं. म्हणून बेलपत्र तोडण्याचे काही नियम आहेत. कोणते आहेत हे नियम जाणून घ्या.

मित्रांनो, महत्त्वाचा नियम चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी, अमावस्य या तिथींना कधीही बेलपत्र तोडू नये. तसेच ज्यादिवशी संक्रांत असेल आणि सोमवार असेल त्यादिवशीही बेलपत्र तोडू नये. या तिथी सोडून इतर तिथींना किंवा कोणत्याही दिवशी कधीही बेलपत्र तोडू शकता. जर का आपण यादिवशी बेलपत्र तोडत असाल तर आपण भगवान शिवशंकरावर आघात करत आहोत असा त्याचा अर्थ होतो. बेलपत्र तोडताना ते सकाळी लवकर आंघोळ करूनच पवित्र मनाने आणि भक्तिभावाने बेलपत्र तोडावे.

मित्रांनो अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेलपत्र कधीही शिळी होतं नाहीत. त्याना वारंवार धुवून पुन्हा वापरू शकता. काल तोडलेल बेलपत्र आजही वापरू शकता. पण वरील सांगितलेल्या तिथींना चुकून ही बेलपत्र तोडू नका. जर बेलपत्र नसेल तर दुसऱ्यांनी शिवलिंगावर वाहीलेल बेलपत्र धुवून घेऊन आपण ते वापरू शकता.

यामधे कोणतीही गोष्ट वर्ज नाहीये. स्कंदपुरणामधे उल्लेख आढळतो तो असा-
अर्पितान्यापीबिल्वाणी प्रक्षहल्यापी पुना पून:
शंखरार्यापणी यानी न नवाणी यदीक्वचित”
याचा अर्थ बेलपत्र कधीही शिळे होत नाहीत आणि दुसऱ्यांनी अर्पण केलेले बेलपत्र आपण धुवून अर्पण करू शकतो.

मित्रांनो जेव्हा तुम्ही बेलपत्र तोडायला जाल तेव्हा एक एक बेलपत्र तोडायच आहे. तसेच जितकी आवश्यक आहेत तितकीच बेलपत्र तोडा. संपूर्ण फांदी तोडू नये. बेलाच्या झाडास कोणतंही नुकसान होणार नाही, कोणतीही हानी पोहचणार नाही याची काळजी घ्या आणि महत्वाची गोष्ट बेलपत्र तोडण्यापूर्वी आणि तोडून झाल्यानंतर त्या बेलाच्या वृक्षास मनोमन प्रणाम करायचं आहे. कारण आपण पान तोडून त्या वृक्षाला एक प्रकारे हानीच पोहचवतो. त्यामुळे नमन करण्यास अजिबात विसरू नका.

मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचे आहे तेव्हा ते उलटे अर्पण करावे. कारण यात चक्र आणि वज्र आहे. बेल पत्र तीन पानांपासून ते अकरा पांनापर्यंत असतात त्याला दल असे म्हणतात. जितकी जास्त दल तितकं ते बेलपत्र उत्तम मानलं जातं. जर तुम्हाला जास्त दलाच बेलपत्र मिळालं तर ते शिवशंभूना अवश्य अर्पण करा. तुमच्यावर शिवशंभूची कृपा खूप लवकर बसेल.

मित्रांनो बेलाची वृक्ष खूप उंच असल्यामुळे बेलपत्र तोडता येत नाहीत. तर अशावेळी दुरूनच आपण बेलाच्या झाडाचं दर्शन घ्यावे. बिल्वपत्र तोडण्यासाठी झाडावर चढून काठी कुराड वापरून बेलपत्र किंवा बेलपत्र ची फांदी तोडू नये. अन्यथा शिवशंकर आपल्यावर क्रोधित होतील .

मित्रांनो शिवलिंगावर एखाद्या व्यक्तिने बेलपत्र अर्पण केलेले असेल त्या बेलपत्राची उपेक्षा आपल्याकडून होणार नाही याची दक्षता घ्या. मित्रानो वर सांगितलेले माहितीनुसार काळजीपूर्वक बेलपत्र शिवलिंगाला अर्पण केले तर स्कंद पुराणानुसार आपल्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा भोलेनाथ पूर्ण करतील.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.