ठाण्यातील स्वामी समर्थ मठामध्ये सविता ताईंना आलेला स्वामींचा हा दिव्य अनुभव वाचून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो जेव्हा आपण स्वामी समर्थांचे वेगवेगळे अनुभव ऐकतो किंवा वाचतो तेव्हा यामुळे आपल्यातील बऱ्याच जणांना स्वामी सेवा सुरू करण्याची प्रेरणा ही मिळत असते आणि त्याचबरोबर यामुळे आपल्यातील बरेच जण स्वामींचे सेवा  करायला सुरुवात करतात तर मित्रांनो आज आपण अशाच एक ठाण्यातील एका ताईंचा स्वामी अनुभव पाहणार आहोत मित्रांनो हा जो अनुभव आहे हा ठाण्यातील एका ताईंचा आहे आणि त्यांचा अनुभव खूपच भयानक आहे आणि स्वामिनी त्यांना कशा पद्धतीने भविष्यामध्ये घडणाऱ्या वाईट घटनेची प्रचिती आधीच दिली आणि त्यापासून सावध केले हे आज आपण जाणून करणार आहे.

तर मित्रांनो हा जो अनुभव आहे तो ठाण्यातील सविता पाटील या ताईंचा आहे आणि त्यांचा अनुभव सांगत असताना  ते आपल्याला म्हणतात की नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अगदी लहानपणापासून स्वामी समर्थांची सेवा करत होते आणि त्याचबरोबर जेव्हा मी लग्न करून सासरी आले.तेव्हाही स्वामींची सेवा मी करत होते आणि त्याचबरोबर मी सासरच्या व्यक्तींनाही या स्वामी सेवा बद्दलची माहिती देऊन तिथेही स्वामी सेवा सुरू केली आणि त्यानंतर माझ्या पतीचे जे काम आहे ते कायम फिरते असते म्हणजेच कामानिमित्त त्यांना सारखे इकडे तिकडे जावे लागत असत आणि त्यामुळे आम्ही ठाण्यामध्ये एक फ्लॅट घेऊन तिथेच राहत होतो.

ठाण्यात मी माझे पती आणि आमचे दोन मुले असे चौघेजण राहत होतो आणि एके दिवशी माझ्या पत्नीचे काम सकाळी लवकर निघाले त्यामुळे ते सकाळी लवकर जाणार होते आणि म्हणून मी सकाळी सर्व कामे लवकर अवरली आणि त्यांना डबा दिला आणि ते सात वाजता त्यांच्या कामासाठी निघाले आणि त्यानंतर थोड्यावेळाने मी मुलांनाही डबा करून दिला आणि मुलेही साडेनऊच्या दरम्यान शाळेला गेले त्यानंतर मी घरातील धुणे भांडी आणि फरशी पुसली आणि त्यानंतर माझे हे जेवण मी बारा एकच्या दरम्यान केले आणि त्यानंतर दोन तीन वाजता जेव्हा सर्व कामे आवरली तेव्हा मी थोडीशी विश्रांती घ्यायची म्हणून बेडरूम मध्ये गेले आणि तिथे मला झोप लागली.

आणि जेव्हा मी झोपले तेव्हा माझ्या स्वप्नामध्ये मला माझी आई दिसली आणि त्यात माझी आई आमच्या दारामध्ये आलेली होती आणि मला बाहेरून काहीतरी खूनस देऊन सांगत होती ती तिच्या हाताच्या बोटाने जिभे कडे इशारा करत होती आणि जेव्हा मी तिला आत बोलवत होतो तेव्हा ती आत येत नव्हती फक्त बोटाच्या साह्याने जिभे कडे हात करत होतो आणि त्यानंतर इतक्यात मला जाग आली आणि मी खडबडून जागी झाले आणि मला थोडीशी भीतीशी वाटू लागली कारण माझी आई घरी आली होती परंतु ती दारातच उभी होती आत येत नव्हती त्यामुळे मी थोडीशी अस्वस्थ झाले आणि त्यानंतर घराच्या बाहेर येऊन बघितले तर कोणीही नव्हते परंतु तरीही मला अस्वस्थ वाटत होते.

त्यानंतर संध्याकाळी सहा-सात च्या दरम्यान माझे पती घरी आले आणि ते आल्यानंतर मला त्यांनी चहा मागितला त्यांनतर आत जाऊन त्यांना सर्वात आधी पाणी आणून दिले आणि त्यानंतर चहा आणण्यासाठी आत गेले आणि चहा करून जेव्हा बाहेर आले तेव्हा माझे पती ही त्यांच्या जिभे कडे बोट करून मला म्हणत होते की माझी जीभ मला आज थोडीशी जड वाटत आहे म्हणजेच मला जीभ उचलून बोलण्यासाठी त्रास होत आहे हे जेव्हा मी ऐकले तेव्हा मला पडलेल्या स्वप्नाबद्दल आठवले आणि त्यानंतर मला शंका आली म्हणून मी त्यांना घेऊन दवाखान्यांमध्ये केले तर तिथे गेल्यानंतर डॉक्टरने तपासणी सुरू केली आणि माझ्या पतीचे व्यवस्थितपणे चेकअप सुद्धा केले.

आणि त्यानंतर दोघांनाही त्यांनी केबिन मध्ये बोलावून सांगितले की जर तुम्ही यांना आता आणले नसते किंवा तुम्ही जर थोडा जरी वेळ केला असता तर तुमच्या पतीला पॅरालिसिसचा झटका आला असता आणि त्यामुळे कदाचित त्यांना जीवही गमवावा लागला असता असे डॉक्टर आम्हाला म्हणाले आणि हे ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण मी जर माझ्या पतीला इथे आणले नसते तर माझ्या पतीच्या जीवाला धोका होता आणि स्वामींच्या कृपेमुळे स्वामींनी माझ्या आईच्या रूपामध्ये स्वप्नामध्ये येऊन या आधीच मला संकेत दिला होता आणि त्यामुळेच मला याबद्दलची सर्व माहिती कळाली. आणि त्यामुळेच आज माझे पती सुखरूप आहेत. श्री स्वामी समर्थ!

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.