मकर संक्रांतीचे ‘हे’शुभ रंग; संक्राती दिवशी या रंगाची साडी किव्हा कपडे अजिबात परिधान करू नका …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि नवीन वर्षातील पहिला सण म्हणजेच मकर संक्रांति. मकर संक्रांति हा आपापसातील एकोपा टिकवण्यासाठी साजरा केला जातो. म्हणजेच आपापसातील मतभेद विसरून प्रत्येक जण हा सण एकमेकांशी प्रेमाने वागतात. मकर संक्रांतीच्या दिवशी जर तुम्ही काही उपाय केले तरी यामुळे आपणाला त्याचे नक्की शुभ फळ प्राप्त होते. सौभाग्यवती स्त्रिया अनेक वस्तूंचे दान देखील केले जाते. गोडधोड पदार्थ देखील आपल्या घरी बनवले जातात. घरामध्ये संक्रांतीच्या दिवशी खूपच प्रसन्नतेचे वातावरण असते.

मित्रांनो आज मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. म्हणजेच कोणत्या रंगाची साडी स्त्रियांनी परिधान करायची आहे आणि कोणता रंग हा अशुभ आहे याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे.

या दिवशी सूर्य हा मकरवृत्ताकडून उत्तरेकडे सरकतो. म्हणजेच सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो म्हणूनच या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात. या दिवशी नदीस्नानाला खूप महत्त्व दिले गेलेले आहे. या दिवशी नदीवर जाऊन स्नान केले आणि त्यानंतर सूर्याची जर पूजा केली तर खूप सारे पुण्य मिळते.

त्यामुळे या दिवशी सूर्याची पूजा विशेष मानली जाते. तिळगुळाची पोळी व लाडू बनवण्याची परंपरा या सणाला आहे. या दिवशी शेंगभाज्या, फळभाज्या व तिळाचे मिश्र भाजी तसेच तीळ लावलेली बाजरीची भाकरी केली जाते.

मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणत एकमेकांना तिळगुळ वाटला जातो. म्हणूनच मकर संक्रांत हा नात्यामधला गोडवा वाढवणारा सण मानला आहे. अनेक सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात आणि अनेक प्रकारच्या वस्तूंचे दान देखील त्या करीत असतात. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे आणि कोणत्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत याविषयीची सविस्तर माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे.

तर मित्रांनो, मकर संक्रांति 15 जानेवारीला तर काही वेळेला ती 14 जानेवारीला असते. यावर्षी म्हणजे 2023 ची जी मकर संक्रांत आहे ती असणार आहे 15 जानेवारीला. तिचा पुण्यकाल सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असणार आहे.

महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याची परंपरा आहे. हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा खूप अशुभ मानला आहे. इतर कोणत्याही सणाला काळे वस्त्र परिधान केले जात नाही. परंतु मकर संक्रांत एकमेव सण आहे ज्या सणाला काळ्या रंगालाच खूप महत्त्व आहे.

कारण सूर्य हा मकर राशि प्रवेश करतो. काळा रंग जो आहे तो उष्णता शोषून घेताना थंडीपासून आपले संरक्षण होते. त्यामुळे मकर संक्रांतीला काळे वस्त्र परिधान केले जाते. जर तुम्हाला काळे वस्त्र परिधान करावेसे वाटत नसेल, काळ्या रंगाची साडी नेसावीशी वाटत नसेल तर तुम्ही दुसऱ्या पाच रंगाच्या साड्या नेसू शकता. हे रंग मकर संक्रांतीला देखील शुभ मानले गेलेले आहेत. त्यातील पहिला रंग म्हणजे लाल रंग.

लाल लाल रंग जो आहे तो हिंदू धर्मामध्ये खूप शुभ मानला जातो. यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. जर तुम्ही संक्रातीच्या दिवशी लाल रंगाची साडी घातली तर सुख-समृद्धीचे आगमन तुमच्या घरात होते. लाल रंग हा माता लक्ष्मीचा सुद्धा आवडता रंग आहे. जर तुम्ही संक्रातीला लाल रंगाची साडी घातली आणि पूजा केली तर तुम्हाला त्याचे निश्चित असे फळ नक्की मिळेल.

त्यानंतर दुसरा रंग आहे तो म्हणजे केसरी किंवा नारंगी. हादेखील शुभ रंग आहे. यामुळे तुम्हाला सूर्य देवाचा आशीर्वाद मिळतो. तुमचा दिवस शुभ जातो. तसेच तुम्हाला खूप सारे पुण्य देखील मिळते.

त्यानंतरचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी. हा रंग महिलांचा खूप प्रिय आहे. प्रत्येक स्त्रीला गुलाबी हा रंग आवडत असतो. या रंगामुळे तुमचे जे मन आहे ते शांत राहते. हा रंग जर तुम्ही संक्राती दिवशी वापरला तर तुमच्या जीवनात शांतता, समृद्धी नांदते.

यानंतरचा जो रंग आहे हिरवा. हिरवा रंग सुद्धा खूप शुभ मानला जातो. आपल्या हिंदू धर्मात हिरव्या रंगाला खूप विशेष असे महत्त्व आहे. तसेच हा रंग गणपती बाप्पांचा प्रिय रंग आहे. त्यामुळे तुम्ही मकर संक्रांतीला हिरव्या रंगाची साडी सुद्धा घालू शकता.

त्यानंतरचा जो रंग आहे तो आहे पोपटी. तुम्ही मकर संक्रांतीला पोपटी रंगाची साडी किंवा मोरपंखी रंगाची साडी घालून जर पूजा केली तर त्याचे सुद्धा तुम्हाला शुभ फळ नक्की मिळेल. तर मित्रांनो हे होते शुभ रंग जे आपण मकर संक्रांतीला परिधान करू शकतो. म्हणजेच या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता. आता जाणून घेऊयात की आपण मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत. जे आपणासाठी अशुभ ठरणार आहेत.

तर मित्रांनो मकर संक्रांत जी आहे तर तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे आणि संक्रातीने जे वस्त्र परिधान केले आहे ते वस्त्र मकर संक्रांतीला घालू नये अशी मान्यता आहे. त्यामुळे आपण मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाचे कपडे अजिबात परिधान करायचे नाहीत.

तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे तुम्ही मकर संक्रांतीला जर तुम्ही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणार नसाल तर मी जे तुम्हाला दुसरे रंग सांगितले आहेत जे आपल्यासाठी शुभ असणार आहे. ते तुम्ही परिधान करायचे आहेत आणि जो अशुभ रंग सांगितलेला आहे तो अजिबात परिधान करायचे नाही.

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.