मित्रांनो आपल्यातील अनेक जण स्वामी समर्थांचे अगदी मनापासून सेवा व पूजाच्या करत असतात आणि त्याचबरोबर दररोज नित्य नियमाने आपली देवपूजा झाल्यानंतर स्वामींची विशेष सेवा देखील हे लोक करत असतात. तर अशा पद्धतीने आपल्यातील बरेच जण स्वामी समर्थांची अगदी मनापासून भक्ती करत असतात. कारण मित्रांनो ज्यावेळी आपण स्वामींच्या अगदी मनापासून आणि विश्वासाने सेवा करतो तेव्हा स्वामी आपल्या त्या सेवेचे फळ आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि त्याचबरोबर आपल्या पाठीशी कायम उभे राहतात आणि आपल्यावर येणाऱ्या प्रत्येक संकटातून आपली सुटका करत असतात.
मित्रांनो आपल्यातील सर्वांनाच हे माहित आहे की स्वामींची सेवा केल्यामुळे त्या सेवेचे फळ आपल्याला मिळतेच आणि त्याचबरोबर आपल्यातील बऱ्याच जणांना स्वामींची सेवा करत असताना स्वामींचे अनेक वेगवेगळे अनुभव किंवा प्रचिती देखील येत असतात.
तर मित्रांनो आज आपण असाच एक स्वामींचा अनुभव पाहणार आहोत. हा अनुभव मित्रांनो मुंबईमध्ये असणाऱ्या ज्युपिटर हॉस्पिटल चे डॉक्टर राजेंद्र पाठक यांच्या आईंना आलेला होता आणि त्यांना आलेला अनुभव सांगत असताना ते आपल्याला काय सांगतात व त्यांना कोणता अनुभव आलेला आहे याबद्दलच माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
मित्रांनो डॉक्टर राजेंद्र पाठक यांच्या आईंना म्हणजेच मीनल पाठक यांना आलेला अनुभव सांगत असताना ताई आपल्याला सांगतात की, नमस्कार मी मीनल पाठक. तुमच्यापैकी अनेक जण मला ओळखतही असतील. कारण मी डॉक्टर राजेंद्र पाठक यांची आई आहे आणि मी मुळची पुण्याची आहे.
परंतु आता नवऱ्यासोबत आणि माझ्या मुलांसोबत आम्ही सर्वजण सध्या मुंबई येथे राहतो आणि लग्नाआधी आमच्या घरामध्ये मी माझी आई आणि त्याचबरोबर माझी वहिनी या दोघीही स्वामींची सेवा अगदी मनापासून करत असत आणि त्यांच्याबरोबरच कधी कधी मीही स्वामींच्या नामस्मरणासाठी किंवा पूजेसाठी त्यांच्यासोबत बसत असत.
माझ्या माहेरी त्याचबरोबर सासरची माणसे सुद्धा स्वामींची सेवा व पूजा करतात. म्हणजेच माझ्या माहेरच्या माणसांचा आणि त्याचबरोबर सासरच्या माणसांचा ही स्वामींवर खूप विश्वास आहे.
त्याचबरोबर दत्त जयंती, स्वामी समर्थ प्रकट दिन, गुरुपौर्णिमा यांसारखे अनेक सण आम्ही सोबतच खूप मोठ्याने साजरी करतो आणि यावेळी आम्ही स्वामींची विशेष सेवा देखील करत असतो. स्वामींचे पारायण देखील आम्ही या दिवसांमध्ये करतो. अशा पद्धतीने स्वामींच्या कृपेमुळे माझ्या माहेरची आणि त्याचबरोबर सासरची दोन्हीही माणस ही स्वामींचे सेवेकरी आणि स्वामींचे भक्त असल्यामुळे स्वामींची कृपा आमच्यावर कायमच राहिली आहे.
त्यांच्या कृपेमुळे आम्हाला आज कशाचीच कमी नाही. पुढे ताई म्हणतात की माझे सासरे हे डॉक्टर आहेत आणि माझी सासू ही शिक्षिका आहे आणि एकदा मी माझ्या सासूबाईंना तुम्ही कशा पद्धतीने स्वामींची सेवा करायला सुरुवात केली असा प्रश्न विचारला.
त्यावर त्या मला म्हणाल्या की आमचे नुकतेच लग्न झालेली होते म्हणजेच सासूचे आणि सासऱ्यांचे दोघांचेही लग्न नुकतेच झाले होते आणि तेव्हा सासरे हे डॉक्टर होते आणि एकदा रात्री दवाखाने होऊन परत येत असताना त्यांचा अपघात झाला.
त्या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांचे दोन्हीही पाय निकामी झाले होते आणि तेव्हा त्यांना उपचारासाठी मोठ्या दवाखान्यात आम्ही घेऊन गेलो आणि तिथे माझी एक मैत्रीण आली होती आणि तिने स्वामींचे सेवेबद्दल आणि स्वामींच्या शक्ती बद्दल मला सांगितले आणि तेव्हा ऐकून मलाही थोडेसे बरे वाटले. म्हणून तेव्हा मी स्वामींची सेवा अगदी मन लावून केली आणि तेव्हा स्वामींच्या कृपेमुळे हे म्हणजेच सासरे लवकरात लवकर बरे झाले आणि तेव्हापासून मी स्वामींची सेवा करायला सुरुवात केली.
पुढे ताई असे म्हणतात की, जेव्हा माझे लग्न होणार होते तेव्हा सुद्धा माझ्या सासरच्या माणसांना स्वामी सेवेमधीलच मुलगी हवी होती. म्हणजेच स्वामींची सेवा करणारी स्वामींची पूजा करणारी मुलगी त्यांना हवी होती. कारण त्यांचा आता स्वामींवर खूपच विश्वास बसलेला होता.
घरामध्ये असणारी प्रत्येक व्यक्ती ही स्वामींची सेवा करावी स्वामींची पूजा करावी असे आता त्यांची इच्छा झालेली होती. त्याचबरोबर माझ्या मिस्टरांची डॉक्टर होण्याची इच्छा होती आणि म्हणूनच माझ्या सासूने घरामध्ये पैशांची कमतरता असताना सुद्धा इतरांकडून पैसे मागून माझ्या पतीला डॉक्टरचे शिक्षण दिले. कारण त्यावेळी अपघातामुळे सासरे तर बेडवरच पडून होते.
त्यानंतर त्यांनी माझ्या पतीला अशा पद्धतीने लोकांकडून पैसे मागवून डॉक्टर केले आणि त्यांना एका चांगल्या दवाखान्यामध्ये डॉक्टरची पदवी मिळवून दिली. तशाच पद्धतीने माझ्या मुलाला सुद्धा म्हणजेच राजेंद्र पाठकला सुद्धा डॉक्टर व्हायची खूप इच्छा होती आणि म्हणूनच त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही त्याला अमेरिकेला शिक्षणासाठी पाठवले.
परंतु तिथून आल्यानंतर त्याला एका मोठ्या दवाखान्यामध्ये नोकरी करायची होती. परंतु त्याला भारतामध्ये कोणत्याही मोठ्या दवाखान्यामध्ये नोकरी मिळत नव्हती आणि त्यावेळी मी माझ्या मुलासाठी म्हणजेच राजेंद्र साठी स्वामींचे 21 सारामृत वाचण्याचा निर्धार केला आणि ही स्वामी सेवा करण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर पुढे थोडेसे दिवसांमध्ये मी स्वामींची सारामृतचे पारायण करायला सुरुवात केली. स्वामींचे मी सात दिवसाचे पारायण पूर्ण केले आणि तिथून पुढे अगदी काही दिवसांमध्येच जुपिटर हॉस्पिटल या मोठ्या 70 करोडच्या हॉस्पिटलमध्ये राजेंद्र ला नोकरी मिळाली.
मी केलेल्या स्वामी सेवेचे स्वामींनी मला फळ दिले आणि अशा पद्धतीने एका मोठ्या पदावर माझ्या मुलाला म्हणजेच राजेंद्र ला नोकरी मिळाली आणि तेव्हापासून माझा आणि माझा सासरच्या माणसांचा स्वामींवरील विश्वास आणखीनच घट्ट झाला आणि आता स्वामींच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या कृपेमुळे आमच्या घरामध्ये सर्व काही सुरळीत सुरू आहे.
तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा राजेंद्र पाठक यांच्या आईचा स्वामी अनुभव आणि त्यांच्या स्वामी सेवेमधील प्रवास हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.