घराजवळील पिंपळाचे झाड तोडल्यावर काय होते ? काय असतात संकेत “शुभ की अशुभ” नक्की वाचा महत्वपूर्ण माहिती …..!!

वास्तु शाश्त्र

 

मित्रांनो पिंपळाचे झाड आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. या झाडामध्ये देवी-देवतांचा वास असतो आणि त्याची पूजा केल्याने अनेक फायदे होतात असे मानले जाते. तसेच शनि दोषापासून व्यक्तीला मुक्ती देखील मिळते. त्यामुळे धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देव वृक्षाची पदवी देण्यात आली आहे. पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी केली जाते, मग ती अमावस्या असो किंवा पौर्णिमा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्या झाडावर राहतात असे मानले जाते, म्हणून पिंपळाची पूजा केल्याने पुण्य तसेच पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात.

 

आणि त्याच गुरु मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्र बरोबरच आयुर्वेदामध्ये ही पिंपळाच्या झाडाचे आपल्याला अनेक फायदे सांगितलेले आहेत आणि या झाडाचे अद्वितीय असे वर्णन केले आहे, पिंपळ एक असे झाड जे २४ तास ऑक्सिजन देते, हे मानवांसाठी खूप महत्वाचे आहे. मित्रांनो अनेकदा आपल्या घराच्या भिंती मध्ये किंवा आजूबाजूच्या कोपऱ्यामध्ये पिंपळाचे झाड उगवते. हिंदू धर्मशास्त्रामध्ये या पिंपळाच्या वृक्षाला अत्यंत पवित्र व शुभ मानले जाते परंतु या वृक्षास घरासमोर व आजूबाजूला लावण्यास हिंदू शास्त्रात मनाई केली गेली आहे.वास्तुशास्त्रानुसार सुद्धा पिंपळाचे झाड आपल्या घराच्या आजूबाजूला तसेच पिंपळाच्या झाडाची सावली आपल्या घरावर पडणे अशुभ मानले गेले आहे.

 

त्यामुळे आपल्या घरावर अनेक मोठी मोठी संकटे येऊ शकतात त्यामुळे जर तुमच्या घराच्या आजूबाजूला पिंपळाचे झाड उगवले असेल तर ते काय करायचे आणि ते झाड पुन्हा दुसरीकडे कसे लावायचे किंवा त्याचे विसर्जन कोणत्या दिवशी करायचे असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. हिंदू धर्मशास्त्रानुसार जर तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादे पिंपळाचे झाड उगवले असल्यास ते लवकरात लवकर उपटून दुसऱ्या जागी लावावे. हे रोपटे तुम्ही मंदिराच्या अवतीभोवती किंवा रस्त्याच्या किनाऱ्याला हे रोपटे लावू शकता.जर हे रोपटे तोडणे शक्य नसल्यास अशावेळी त्याची पाने तोडून जवळच्या तलावांमध्ये विसर्जित करू शकतात.

 

हे करण्यासाठी रविवारचा दिवस अतिउत्तम मानला गेलेला आहे.रविवारच्या दिवशी हे कार्य केल्यामुळे त्याचा कोणताही दोष आपल्यावर व आपल्या कुटुंबातील सदस्यांना लागत नाही.मात्र अनेकदा असे पाहायला मिळते की एकदा पिंपळाचे झाड उपटल्यानंतर सुद्धा पुन्हा त्याच ठिकाणी ते झाड रोपटे पुन्हा उगवत असते,अशावेळी निराश न होता एक उपाय आपण करू शकतो आणि रविवारच्या दिवशी पिंपळाचे रोप आहे अशा ठिकाणी एक साबुत लिंबू व मिरची आपण त्या रोपटे जवळ ठेवायचे आहे. तीन तास लिंबू-मिरची पिंपळाच्या रोपटा जवळ ठेवायचे आहे त्यानंतर पिंपळाचे रोपटे तुम्ही उपटू शकता आणि ज्या ठिकाणी तुम्ही हेच रूप पुन्हा लावाल त्या ठिकाणी लिंबू-मिरची पुन्हा आपल्याला ठेवायचे आहे.

 

आणि त्याचबरोबर मित्रांनो पुराणात पिंपळाचे खूप महत्व सांगितलेले आहे. पिंपळ हे दैव्य झाड असून याची पूजा नक्की करायला हवी असे पुराणात म्हंटले गेले आहे. पिंपळाची पूजा करण्याची योग्य वेळ सकाळी आणि दुपारी असते. रात्रीच्या वेळी या झाडाजवळ जाणे टाळले पाहिजे. या शिवाय ज्योतिष शास्त्रात देखील पिंपळाचे झाड घरी लावणे अशुभ मानले जाते. घरात किंवा घराच्या जवळ पिंपळाच झाड असेल तर पिंपळाच झाड उपटून टाकलं पाहिजे. घराच्या जवळ पिंपळाचे झाड असणे कार्बन डाईऑक्साइड सोबत अनेक दृष्टीने बाधक आहे.

 

आणि त्याचबरोबर पिंपळाच्या झाडला हिंदू धर्मात मोठे महत्व आहे. पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. त्यामुळे पिंपळाचे झाड कापायला लोक घाबरतात. पिंपळाचे झाड कापले तर पाप लागेल अशी भावना असते. वास्तू शास्त्रात पिंपळाचे झाड कसे काढावे याबद्दल सांगितले आहे. पिंपळाचे झाड काढण्यापूर्वी त्या झाडाची ४५ दिवस सलग पूजा करायला हवी. ४५ दिवस पूजा केल्यानंतरच पिंपळाचे झाड काढावे. ४५ दिवस या झाडावर कच्चं दूध देखील वाहावे. त्यानंतर हे झाड काढून एखाद्या दुसऱ्या भांड्यात लावून ते मंदिरात नेऊन ठेवावे. पूजा न करता पिंपळाचे झाड कधीच काढू नये. शास्त्रामध्ये पिंपळ प्रदक्षिणा वृत्त देखील सांगण्यात आले आहे. त्यामुळे पिंपळाचे झाड काढण्यापूर्वी तुम्ही पिंपळ प्रदक्षिणा वृत्त देखील करू शकता. हे वृत्त केल्यास झाड काढल्याचे काही पाप लागणार नाही. पिंपळाच्या झाडावर ब्रम्हा, विष्णू , महेश यांचा वास असतो.

 

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

 

Leave a Reply

Your email address will not be published.