नागीण, नागवेढा, झोस्टर, यावर १००% रामबाण घरगुती उपचार ; फक्त चार दिवसात पूर्ण बरा करा ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आजकाल आपल्या आरोग्यावर बदलत्या वातावरणाचा परिणाम होऊ लागला आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे आरोग्याची योग्य ती काळजी घेणे जमत नाही. अनेक प्रकारचे आजार होऊ लागल्यामुळे दवाखान्यांमध्ये भरपूर पैसे लोकांचे खर्च होण्यास सुरुवात झाली आहे. मित्रांनो अनेकांना त्वचेसंबंधित अनेक आजार उद्भवतात. आज आपण नागिन किंवा नागवेढा किंवा हर्पिझ झोस्टर या आजाराविषयी माहिती घेणार आहोत. नागीण आजाराविषयी माहिती घेऊयात. नागिन हा आजार कांजण्यांच्या विषाणूमुळे होतो. कांजण्या होऊन गेल्यानंतर काही जणांच्या शरीरात हे विषाणू लपून राहतात आणि तेच विषाणू अनेक वर्षांनी चेतावृद्धीतून एखाद्या नसेमार्फत पसरून त्वचेवर फोड निर्माण करतात. नागीनीची तीव्रता वयाबरोबर वाढते. उतार वयात नागिणीचा त्रास जास्त होतो.

हे विषाणू चेता तंतुच्या रेषेवरच वाढतात. सुरुवातीस त्या चेतातंतूच्या मार्गावर खूप दुखते. तीन-चार दिवसात तेथील त्वचेवर लालसरपणा येतो. पाठोपाठ पाण्याने भरलेले दुसरे फोड येतात. हे फोड छोटे छोटे व एकत्र पुंजकेमध्ये असतात. पाच ते सहा दिवसात वर खपली धरून वाळू लागतात. फोड गेले की दुखणे थोड थांबते. पण काही वेळा पुढेही काही महिन्यापर्यंत दुखनेपणा टिकतो.

सामान्यपणे हा आजार बरगड्या मधील चेता तंतूच्या रेषेवर दिसतो. कधी कधी चेहरा किंवा हातावरही परिणाम दिसतो. शरीराच्या एकाच बाजूला बहुतेक करून आजार होतो. शरीराची मध्यरेषा ओलांडून फोड पुढे जात नाहीत. नागीण हा त्रासदायक आजार आहे. यासाठी आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो परंतु मित्रांनो काही घरगुती उपाय केल्याने या आजाराचा आपणाला फारसा त्रास होणार नाही कमी होईल. या आजाराचे फारसे गंभीर परिणाम सहसा होत नाहीत. परंतु डोळ्यात फोड आले तर मात्र दृष्टी जाऊ शकते.

मित्रांनो नागिन आजारावर तांदळाचे पीठ व दुर्वा अतिशय गुणकारी आहेत. दुर्वांचा रस, तांदळाचे पीठ या दोघांना एकजीव करून लेप तयार करा. हा लेप पुरुळ आलेल्या जागेवर लावा. या उपायाने नागिन पसरत नाही आणि दाहही कमी होण्यास मदत होते.

आपल्या आसपास असणाऱ्या अनेक वनस्पतींचा फायदा आपल्याला अनेक आजारावर होत असतो. परंतु आपल्याला याविषयी काहीच माहिती नसल्याकारणाने आपण त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतो. दुसरा उपाय म्हणजे मंजिष्ठा. मंजिष्ठा नागीण या आजारावर खूपच गुणकारी आहे. मंजिष्ठाचे चूर्ण रोज दोन वेळा दीड ते तीन ग्रॅम घेतल्यास नागिन आजारावर आराम मिळतो.

मित्रांनो तिसरा उपाय कडुलिंबाची पाने. आपल्या आसपास कडूनिंबाची भरपूर झाडे आपल्याला पाहायला मिळतात. कडूलिंबाचे आयुर्वेदामध्ये खूपच महत्त्वाचे स्थान मानले गेलेले आहे. कडुलिंबाची पाने नागीण या त्वचा विकारावर अतिशय गुणकारी आहेत. नागिन आजारामध्ये त्वचेचा खूप दाह होत असल्यास किंवा अंगावर पुरळ आली असल्यास कडुलिंबाच्या पानांचा पाणी घालून लेप करा. हा लेप पुरळ आलेल्या भागावर दिल्याने नागिन बरी होते किंवा कडूलिंबाची पाने अंथरून त्यावर नागिन झालेल्या व्यक्तीस झोपवल्याने देखील शरीराचा दाह थांबून आराम मिळतो.

मित्रांनो चौथा उपाय काशीफळ. भोपळ्याचा देठ कडुलिंबाच्या रसात उगळा व त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट नागवेढा आजारातील पुरळ आलेल्या भागावर लावा. असे काही दिवस केल्यास नागिन आजारांवर नक्कीच आराम मिळतो. तसेच मित्रांनो नागिन आजार नियंत्रणात आणण्यासाठी गरम पाण्यात थोडेसे मीठ टाकून त्या पाण्याने स्नान केल्याने फायदा होतो.

अजून एक उपाय असा आहे की गोपीचंद, सापाची कात आणि गेरू सर्व समप्रमाणात घ्यायचे आहे. तुम्हाला त्याचे बारीक चूर्ण तयार करून घ्यायचे आहे . हे चूर्ण खोबरेल तेलात मिसळून तयार होणारी पेस्ट पुरळ-फोड आलेल्या भागावर लावा. यामुळे तुम्हाला लगेचच आराम मिळेल.

मित्रांनो आपल्या आयुर्वेदात सांगितलेले जलोकावरचरण रक्तमुक्षण इत्यादी रक्त आणि पित्ताच्या शुद्धीचे उपचार केले पाहिजेत. नागिन उठल्यानंतर काही पथ्य पाळणे आवश्यक आहे. दूध, मिठाई यांच्याबरोबर आंबट पदार्थ खाऊ नयेत. लोणचे, खारवलेल्या मिरच्या, शेवया इत्यादी पदार्थ खाण टाळावेत. तसेच आपोआप पाणी सुटणारे पदार्थ जसे की दही, गूळ इत्यादी वस्तू त्वचारोग वाढवतात. म्हणून फक्त काळजी करत राहण्यापेक्षा या घरगुती उपायांचा अवलंब करा आणि नागिन त्वचा विकारापासून सुटका करून घ्या.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.