मित्रांनो, बहुतेक वेळा आपल्या शरीरामध्ये मुतखडा असतो आणि डॉक्टरांकडे निदान केल्यानंतर हा मुतखडा कधीकधी लहान आकाराचा असतो किंवा कधीकधी हा मुतखडा मोठ्या आकाराचा असतो, अशावेळी डॉक्टर आपल्याला ऑपरेशन किंवा अनेक औषधी सेवन करण्याचे सल्ले देत असतात. जर तुम्हाला सुद्धा ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला असेल तर अशा वेळी थोडे थांबा आणि आजच्या लेखामध्ये आम्ही सांगितलेला उपचार अवश्य करून पहा आणि हा उपचार केल्याने तुमच्या शरीरातील मुतखडा पूर्णपणे निघून जाण्यासाठी मदत होणार आहे.
मित्रांनो, मानवी शरीरात मूत्र पिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणाऱ्या कठीण स्फटिकजन्य पदार्थाला मुतखडा म्हणतात. लघवीतील न विरघळलेला हा कठीण पदार्थ ज्यावेळी एका ठिकाणी जमा होतात त्यावेळी मुतखडा तयार होतो. हा खुप त्रासदायक ठरू शकतो. ज्या व्यक्तींच्या रक्तातील युरिक अॅसिडचे प्रमाण अधिक असते, त्यांना युरिक अॅसिडपासून मुतखडे तयार होण्याची शक्यता जास्त असते. आणि तसेच लघवीचे प्रमाण कमी झाल्याने मुतखडा तयार होतो. पाणी कमी पिल्याने आणि श्रम, व्यायाम या कारणांनी पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने मुतखडा तयार होतो. यावर आयुर्वेदात काही घरगुती उपाय सांगितले आहेत.
मित्रांनो हा घरगुती उपाय फक्त दोन पानांचा रस दोन चमचे रोज घेतल्याने मुतखडा तुकडे होऊन बाहेर पडतो त्याचप्रमाणे हा रस पुरुषांच्या लैंगिक समस्या पूर्णपणे कमी करतो. तसेच पोट साफ करतो व सर्दी, खोकला, कफ पूर्णपणे बरा करतो. हा उपाय शारीरिक दुर्बलता आणि किडनी स्टोन या दोन घटकांवर असून त्यासाठी हा रस आपल्याला घ्यायचा आहे. मित्रांनो यासाठी आपल्याला तुळशीची 5 ते 6 पाने लागणार आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला अत्यंत महत्त्व दिले जाते कारण या तुळशीच्या पानाचा उपयोग सर्व रोग दूर करण्यासाठी होतो. म्हणून तुळशीचे वृंदावन अंगणातच ठेवलेले असते.
मित्रांनो यामध्ये 75 उपयुक्त घटक असतात ज्याने सर्दी खोकला ताप यापासून ते रक्तशुध्दी पर्यंत अशा हजारो रोगावर उपयोगी पडते. आणि मित्रांनो यानंतर लाजाळू या वनस्पतीची पाने लागणार आहेत. साधारणता एक चमचा रस निघेल एवढी पाने घ्या. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्याने ही वनस्पती सर्वत्र मिळते. तसेच त्याच्या या पानांची पावडर आपण विकत घेऊ शकतो. यामधील अड्रेनालीन नावाचा घटक जो मुतखडा विरघळून तो फोडून बाहेर काढण्यास मदत करतो. या दोन्ही वनस्पतीची पाने एकत्र बारीक करून घ्यायची आहेत. त्यामुळे त्याचा रस काढता येईल.
हा रस रोज सकाळी उपाशीपोटी साधारणत दोन चमचे घ्यायचा आहे. रस काढल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे पाणी टाकावे. हा रस घ्यायला सुरुवात केल्यापासून साधारणतः तीन ते पाच दिवसांमध्ये तुमचा मुतखडा सहज आणि लवकर विरघळत जाईल. तसेच काही व्यक्तींचा लवकर बरा होत नसेल तर त्यांनी हा रस पंधरा दिवसापासून ते दोन महिने सलग घ्यावा. तसेच याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. ज्या व्यक्तिंना लैंगिक समस्या आहे त्यांनी हा रस सलग दोन महिन्यापर्यंत घ्यायचा आहे. त्यांची समस्या दूर नक्कीच होईल..
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.