मित्र मैत्रिणींनो मटण खाल्ल्यानंतर अजिबात चुकूनही खाऊ नका हे पदार्थ ; नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो मटण खाण्याचे अनेक फायदे आहेत. ज्या लोकांना शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असते किंवा लोह कमी असतं, अश्या लोकांनी मटण नक्की खावं. मटण खाल्ल्याने कॅल्शियमच प्रमाण शरीरामध्ये वाढतं, परिणामी हाडे मजबूत होतात. तसंच ज्या लोकांना रक्ताची कमतरता असेल ते शरीरामध्ये रक्त कमी पडत, हिमोग्लोबिन ज्यांचं कमी झालं आहे अश्या लोकांना तुम्ही पाहिलं असेल कि डॉक्टर्स हे मटण खाण्याचं सल्ला देतात. कारण मटनामध्ये तुमच्या शरीरातील रक्त वाढवण्यासाठी हिमोग्लोबिन ची मात्रा आयण म्हणजेच लोहाची मात्रा मोठया प्रमाणात आढळते आणि म्हणून मित्रांनो अश्या या सर्व फायद्यासाठी आपण मटण नक्की खायला हवं.

मात्र मित्रानो मटण खाल्यानंतर काही पदार्थ मात्र आपण चुकूनही खाऊ नये. कारण हे पदार्थ खाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या बॉडीमध्ये अश्या काही केमिकल रिएक्शन होतात. अश्या काही रासायनिक अभिक्रिया होतात कि, त्यांचा परिणाम हा आपल्या एकंदरच आपल्या आरोग्यावरती खूप गंभीरपणे जाणवतो. म्हणून मित्रांनो हे पदार्थ आपण खाऊ नयेतं. चला तर पाहूया हे पदार्थ कोणते आहे, मित्रांनो पदार्थ नंबर 1 मध म्हणजेच मध. मित्रांनो मटण खाल्यानंतर किंवा मटण खाण्यापूर्वी आपण चुकूनही मध खाऊ नका कारण मधामध्ये जे घटक आढळतात. या घटकांचं ज्यावेळी मटनाशी रासायनिक क्रिया होते. त्यातून जे पदार्थ निर्माण होतात किंवा जे विषारी पदार्थ निर्माण होतात.

त्यांचा थेट परिणाम आपलं हृदय, किडनी त्यांच्या कार्यक्षमतेवरती होत असतो आणि म्हणून आपल्या शरीरावर अत्यंत गंभीर परिणाम करणारा असा हा पदार्थ आपण मटण खाल्यानंतर किंवा मटण खाण्यापूर्वी चुकूनही खाऊ नये. मित्रांनो त्यानंतरचा पुढचा पदार्थ म्हणजे दूध म्हणजेच मिल्क.

मित्रांनो आपल्या सर्वाना माहित असेल आपले आजी, आजोबा किंवा पूर्वज सुद्धा आपल्याला सांगून गेलेले आहेतं कि, दुध किंवा दुधाचे पदार्थ हे मटणाबरोबर किंवा मटनानंतर चुकूनही खाऊ नयेत. मित्रांनो याला अपवाद किंवा एक पदार्थ तो म्हणजे दही. तुम्ही दही हे मटणाबरोबर वापरू शकता.

मात्र दूध हे चुकूनही मटणाबरोबर किंवा मटनानंतर खाऊ नका किंवा पिऊ नका. मित्रांनो दुधामध्ये एंटीबायोटिक गुणधर्म मोठया प्रमाणात आढळतात. लक्षात घ्या एंटीबायोटिक गुणधर्म दुधामध्ये मोठया प्रमाणात आढळतात आणि त्यामुळे ज्या एंटीबायोटिक गुणधर्मचा आणि मटणाचा ज्यावेळी संबंध येतो त्यावेळी केमिकल रिएक्शन मधून असे भयंकर पदार्थ निर्माण होतात कि, तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाहीत. मित्रांनो आजकाल बऱ्याच लोकांना अंगावरती कोडं फुटणे असा आजार आढळतो आणि हा काही गंभीर आजार नाही. मात्र समाजामध्ये त्या आजाराबद्दल इतकी भीती आढळते कि विचारू नका. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल कि तुमच्या अंगावर कोडं फुटू नये.

हा आजार होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर हे 2 विशम पदार्थ म्हणजेच मटण आणि दुध यांच एकत्रित मिश्रण कधीही घेऊ नका. जर तुम्हाला दूध घ्याचच असेल मित्रांनो तुम्ही थेट दुसऱ्या दिवशी दूध घ्यायाला हवं. कारण मटण पचण्यास कमीत कमी 12 ते 24 तासाचा अंतर कालावधी लागू शकतो. त्यामुळे ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा कि, दुधाचं सेवन आपण मटनावरती चुकूनही करू नये.

मित्रांनो तिसरा पदार्थ म्हणजे बऱ्याच लोकांना जेवण केल्यानंतर चहा पिण्याची सवय असते. तर मित्रांनो अत्यंत चुकीची सवय आहे. कारण चहा ज्यावेळी आपण पितो त्यावेळी ग्यासेस, ऍसिडिटी आणि अनेक प्रकारचे गंभीर आजार होण्याची शकता असते आणि म्हणून जेवण केल्यानंतर तरी आपण चहा पिणं टाळावं.

म्हणूनच मित्रांनो मटण खाल्ल्यानंतर आपण चहाच सेवन करायच नाही. कारण एक तर आपण चहामध्ये आपण दुध वापरत असतो, भारतीय लोक चहामध्ये दुधाचा वापर करतात आणि म्हणून मटनानंतर चहा घेऊ नये. अजून एक सवय अशी बराच जणांना सिगारेट ओडण्याची सवय असते.

मित्रांनो जेवल्यानंतर ज्यावेळी तुम्ही सिगारेट ओढता किंवा मांसाहार केल्यानंतर तुम्ही सिगारेट च जेवण करता त्यावेळी लक्षात घ्या असं हे धुम्रपान केल्याने या धूम्रपानाचे इफेक्ट शतपटीने वाढतात म्हणजे तुम्ही रेगुलर ज्यावेळी धूम्रपान करता त्यावेळी त्याचे जे दुषपरिणाम आढळतात. त्याच्या कितीतरी पट अधिक परिणाम हे जेवण केल्यानंतर धूम्रपान केल्याने दिसून येतात.

बऱ्याच ठिकाणी यावरती संशोधन झाले आहे त्यामुळेच आपण या गोष्टीवरती विश्वास ठेवायला हवा. मित्रांनो जेवणानंतर लगेच झोपणे टाळा. जेवण झाल्याबरोबर झोपतात. अर्धा पाऊण तास झोपतात. त्या लोकांना अपचनाचे त्रास मोठया प्रमाणात जाणवतो. छातीमध्ये जळजळ होते, तर पित्ताचा प्रकोप इतका वाढतो कि, पित्त असह्य बनत. मित्रांनो मटण खाल्यानंतर तिखटच प्रमाण तसेच मसाल्याचं प्रमाण फार मोठं असतं आणि म्हणून मटण खाल्यानंतर मित्रांनो झोपण्याचा प्रयत्न करू नका किंवा अर्धा ते पाऊण तास तरी आपण मटण खाल्यानंतर झोपू नये.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.