घरात या ठिकाणी असेल देवघर तर तुम्ही नक्कीच होणार करोडपती या ठिकाणी असतो माता महालक्ष्मी देवीचा वास ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेचे प्रमुख आणि मुख्य केंद्र म्हणजे आपल्या घरातील आपले देवघर. कारण देवघराच्या रचनेवरच आपल्या घराच्या पाया अवलंबून असतो. आपल्या हिंदू शास्त्रानुसार आणि आपल्याला आपल्या वाडवडिलांनी सांगितल्याप्रमाणे देवघरातूनच सकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असतात. आणि या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावावरच आपल्या घराची बरकत अवलंबून असते. आपल्या घरातील देवघर हे खूप महत्त्वाचे आहे. कारण त्यावरच आपल्या घराची प्रगती अवलंबून असते. जर देवघर चुकीच्या दिशेला असेल तर या देवघरातून सकारात्मक ऊर्जा येण्याऐवजी नकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे आपले देवघर कोणत्या दिशेला आणि कोठे त्याचप्रमाणे कशाप्रकारे असायला पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये घेणार आहोत.

 

देवघर कोठे असायला पाहिजे, देवघर जर आपल्या किचनमध्येच म्हणजे स्वयंपाक खोलीमध्ये असेल तर याला काय विरोध नाही. पण जर आपल्या घरामध्ये मांसाहार मास मच्छी खाल्ली जात असेल तर त्या स्वयंपाक घरामध्ये देवघर कधीही नसावे. कारण यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाहते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या घर देवघराची साफसफाई, स्वच्छता नेहमी झाली पाहिजे. जर स्वयंपाक घरामध्ये देवघर असेल आणि खरकाटी भांडी इतर कचरा जर वारंवार जास्त वेळ पडून राहत असेल, तर हे देखील खूप चुकीचे आहे. कारण कचरा, खरकाटी भांडी यामुळे देखील नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि याचा जो काही दोष असतो तो आपल्या देवघराला देखील लागू होतो. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाहू लागते. घरामध्ये बरकत राहत नाही, प्रगती थांबते. कुटुंबामध्ये सतत वादविवाद होत राहतात.

 

बऱ्याच वेळेला असे होते की जिन्याच्या खाली देवघर असते अपुरी जागा असल्यामुळे आपण ही सोय करून घेतो. मात्र जिन्याच्या खाली देवघरातणे पूर्णपणे चुकीचा आहे. कारण देवघरावरून आपण वर खाली चढत असतो. जणू काय देवांवरच आपला पाय पडत आहे. असे होते त्यामुळे जिन्याच्या खाली देवघर केव्हाही नसावे. जर देवघर जिन्याखाली असेल तर कर्जामध्ये वाढ होते. कर्जाची परतफेड लवकर होत नाही कर्जाचे डोंगर वाढत जाते. आणि कितीही देवी देवतांची पूजा केली, विधी केली तरी या पूजेचे फळ आपल्याला मिळत नाही. उलट देवी देवता आपल्यावर भ्रष्ट होतात नाराज होतात. त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही त्यामुळे जिन्याखाली देवघर कधीही नसावे.

 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले देवघर कधीही बाथरूम जवळ किंवा टॉयलेट जवळ नसावे. कारण नकारात्मक ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात प्रवाह बाथरूम आणि टॉयलेट पासून होत असतो. जर आपले देवघर बाथरूम जवळ किंवा देवघरा जवळ असेल तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव एवढा वाढेल की आपल्या घरामध्ये सुख, समाधान कधीही राहणार नाही. सतत मतभेद वादविवाद होत राहतील त्या घराची शांतता नष्ट होईल. आणि त्या घरामध्ये शुभ कार्य कधीही होत नाही. बेसमेंट मध्ये देखील देवघर असू नये. कारण बेसमेंट मध्ये देवघर असणे हे खूप चुकीचे आहे. शुभ कार्य तर होतच नाहीत. मात्र अनेक दुर्घटना यामुळे नक्कीच होतात अपशकुन घडतात अकाली मृत्यू देखील होतो. घरातील सदस्यांना चांगले आरोग्य लाभत नाही.

 

बेडरूम मध्ये चुकूनही देवघर असू नये कारण यामुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद होतात. संसार सुख लाभत नाही. यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये वाद निर्माण होतात. सर्वजण एकमेकांचे वैरी होतील. यावर एकच उपाय आहे जर आपले घर लहान असेल आणि सर्वकाही आपल्या एकाच घरामध्ये असेल जर आपली जागा लहान असेल तर देवघरामध्ये आणि इतर घरांमध्ये एक पडदा असावा. जेणेकरून दोन वेगवेगळ्या खोल्या होतील. असे केल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येईल. मनामध्ये आता असा प्रश्न निर्माण झाला असेल की नेमके देवघर कोणत्या दिशेला असायला पाहिजे. देवघर नेहमी ईशान्य देशाला असायला पाहिजे. ईशान्य दिशा ही देवघरासाठी खूप शुभ आहे. ईशान्य या नावातच ईश आहे. म्हणजेच ईश्वर आहे त्यामुळे ही दिशा देवघरासाठी खूप शुभ आहे.

 

असे मानले जाते की, ज्यावेळी वास्तुपुरुष धरतीवर आले म्हणजे जन्माला आले त्यावेळी त्यांचे डोके ईशान्य दिशेला होते. त्यामुळे ही दिशा खूप शुभ मानले आहे. आणि ही दिशा बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करते. ईशान्य दिशेला जर आपल्याला आपले देवघर करता येत नसेल तर उत्तर दिशेला देखील आपण आपले देवघर तयार करू शकतो. आणि जर उत्तर दिशेला ही आपल्याला आपल्या देवघराची स्थापना करता येत नसेल तर आपण पूर्व दिशेला आपल्या देवघराची स्थापना करू शकतो. आणि या तीनही दिशांना जर देवघर स्थापन करणे शक्य नसेल तर आपण आग्नेय दिशेला देवघर स्थापन करू शकतो. मात्र आग्नेय दिशेला स्थापन केलेले देवघर आपल्याला म्हणावे तसे शुभ परिणाम आपल्याला प्राप्त करून देत नाही. जर आपले देवघर लाकडी असेल तर ते देवघर भिंतीपासून जरा लांब ठेवावे.

 

ज्यावेळी आपण देवांची देवपूजा करणार आहोत त्यावेळी आपले तोंड पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला असायला पाहिजे. अशा पद्धतीनेच आपल्याला आपल्या देवघराची स्थापना करून घ्यायची आहे. देवघर काळा रंगाचे किंवा गड तरंगाचे कधीही नसावे देवघर हे पांढरे शुभ्र किंवा मवाळ रंगाचे असावे. यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. असे मानले जाते की देवघर चौकोन किंवा गोल असेल तर त्याचे शुभ परिणाम घरावर होतात वास्तुशास्त्रानुसार देवघराची उंची ही देवघराच्या रुंदी पेक्षा मोठी असावी. देवघरातील देवींची देवांची स्थापना करत असताना देवी देवतांची स्थापना उत्तर किंवा पूर्व दिशेला करायची आहे. ज्यावेळी आपण देवांची पूजा करत असतो. त्यावेळी देवांचे चेहरे आपल्याला दिसायला पाहिजेत. आणि देवांची जी काही पाठ आहे ती पाठ पूर्व दिशेला असायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला आपल्या देवघराची स्थापना करायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते .

 

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.