सकाळी खाली पोट चहा पिल्याने आपल्या शरीराला होणारे हे नुकसान वाचून तुमच्या पण पायाखालची जमीन सरखेल …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच अशी सवय आहे. की सकाळी उठल्यानंतर चहा प्यायची आपल्या प्रत्येकाच्या दिवसाची सुरुवात चहा नेच होते असे म्हणायला काही हरकत नाही. चहा पिल्याने आपल्या शरीरावर कोणकोणते परिणाम होणार आहेत. या बाबतचे सविस्तर माहिती आपण आजच्या या लेखामध्ये घेणार आहोत. ज्यावेळी आपण चहा पितो त्यावेळी तो चहा तोंडावाटे आपल्या पोटात जातो, त्यानंतर त्याचे पचन होऊ लागते. चहा मध्ये निकोटीन, कॅफिन व साखर हे घटक असतात. आणि हे तीनही घटक आपल्या शरीरासाठी घातक आहेत. कारण यांचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत असतो.

 

* निकोटीन- निकोटीन हा घटक नशा आणणारा आहे. चहा मध्ये निकोटीनचे प्रमाण कमी असले तरी ते वारंवार पिल्यामुळे त्याची आपल्याला सवय लागते. त्यामुळे वारंवार चहा पिण्याची तलप लागते. त्यामुळे आपण सारखे चहा पितो.

कॅफिन- कॅफिनच्या सेवनामुळे आपली जी पचनक्रिया आहे. ती पचनक्रिया सुरळीत होत नाही. त्या पचनक्रियेचे चक्र विचलित होते. त्यामुळे पोटामध्ये गॅस होण्याची समस्या निर्माण होते. आणि म्हणूनच पोट गॅस धरून फुगते. कॅफिन मुळे पोटामध्ये मोठ्या प्रमाणात गॅस तयार होतो.

 

साखर- साखर हा घटक आपल्या शरीरासाठी खूपच घातक आहे. यामुळे आपल्या शरीरावर भरपूर वाईट परिणाम होत असतात. सगळ्यात घातक शहातील पदार्थ म्हणजे साखर हा आहे.

 

ज्यावेळी आपण चहा पितो त्यावेळी तो चहा आपल्या पोटात जास्त वेळ राहतो. त्यामुळे पित्ताचे प्रमाण वाढते. आणि चहाच्या वारंवार पिण्याने आपल्या पोटामध्ये असणाऱ्या आतड्यांना याचा त्रास होतो त्यामुळे आपल्या पोटामध्ये जळजळ होते. त्याचबरोबर पोटदुखीचा देखील त्रास होतो. आणि आपल्या शरीरातील आतडे देखील कमजोर होण्यास सुरुवात होते. आतडी कमजोर झाल्यामुळे आतड्याचे रोग होण्यास सुरुवात होते. आता आपल्या मनामध्ये अशी शंका येईल. की आम्ही तर नियमित न चुकता चहा पितो मात्र आमच्या शरीरावर असे कोणतेही परिणाम झालेले दिसत नाहीत.

 

ज्यावेळी आपण आपले चहाचे प्रमाण वाढवतो, त्यावेळी याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसायला लागतात. त्यामुळे चहा आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे. आपल्यापैकी काही जणांना तर सकाळी उठल्याउठल्या चहा लागतो. उपाशी पोटीच आपण चहा पितो मात्र चहा पिणे आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे. आपणच नव्हे तर आपल्या या देशामध्ये सर्वांनाच सकाळी उठल्यानंतर चहा लागतो. चहा पिल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही. कारण चहाला आपण शक्तीवर्धक पेय समजतो. मग तो चहा कितीही गरम असला तरी त्याची सेवन आपण करतोच आणि असा चहा पिऊन आपण अनेक रोगांना आपल्या शरीरामध्ये बोलवत असतो.

 

चहा पिल्याने आपल्या शरीरातील पित्ताचे प्रमाण वाढते. किती झाल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होत नाही. पचनक्रिया न झाल्यामुळे त्याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतात. यामुळे अनेक पोटाचे आजार उद्भवतात शरीर कमजोर झाल्यामुळे आणि वारंवारता शरीराला आवश्यक असणारे घटक यांची कमतरता भासते, त्यामुळे अंगदुखी, गुडघेदुखी यासारखे रोग तर येतात. त्याचबरोबर हृदयाच्या संबंधात असलेले देखील आजार उद्भवतात ज्यावेळी आपल्या शरीरातील नसा ब्लॉक होतात. त्यावेळी हृदविकारासारखा आजार होण्याची शक्यता असते त्यामध्ये आपल्याला अटॅक येण्याची देखील शक्यता नाकारता येणार नाही.

 

चहा पिल्याने भूक देखील लागत नाही त्यामुळे चहा पिणे बंद केला तर आपल्या शरीरासाठी खूपच चांगले आहे आणि याची खूप चांगली परिणाम देखील होणार आहे परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना चहाची खूप सवय लागली आहे आणि ही सवय त्यांची बंद होत नाही तर अशा व्यक्तींना चहा प्यायचाच असेल तर तुळशीची पाने, तीळ व दालचिनी चहा पावडरीचे पाने, मिरे, बडीशोप व गूळ घालून तयार केलेला चहा प्यायचा आहे. गुळाच्या चहामध्ये दूध घालायचे नाही. जर गुळाच्या चहामध्ये दूध घातले तर तो चहा फुटतो त्यामुळे काळा चहा आपल्याला प्यावा लागणार आहे. आणि हा काळा चहा आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे.

 

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. असाच प्रकारच्या वेगवेगळ्या लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.