स्वतःची किंमत वाढवायची असेल तर मग? हे दहा नियम नक्की पाळा यशस्वी जीवनासाठी सर्वोत्कृष्ट प्रेरणादायी विचार सकारात्मक विचार….!!

Uncategorized

मित्रांनो, आपला जीवनामध्ये आपल्याला योग्य स्थान मिळावे असे सगळ्यांनाच वाटत असते. सगळ्यांनी आपल्याला योग्य ते स्थान द्यावे. समाजामध्ये आपल्याला आदर मिळावा. चार चौर्यांमध्ये आपला आदर असावा. पण कधी कधी असे होत नसतं. आपल्याला चारचौघांमध्ये आदर मिळाला हवा असा सगळ्यांनाच वाटत असतं. यासाठी आपण स्वतःची किंमत वाढवावी लागते. म्हणूनच आज आपण आपली किंमत वाढवण्यासाठी काही दहा नियम सांगण्यात जाणून घेणार आहे. ज्यामुळे समाजामध्ये आपल्याला आदर सन्मान मिळेल. याचीच माहिती आजच्या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

पहिला नियम म्हणजे स्वतःचा आदर करा. काही वेळेला असे घडत असते की आपण आपल्यालाच वेळ देत नसतो. आपण स्वतःचा आदर करत नसतो. जर असे आपण केले तर आपल्याला दुसरे मानसन्मान देणारच नाही. म्हणून कधीही आपण स्वतःला आदर दिला पाहिजे. तरच इतरही व्यक्ती आपल्याला आदर देतील. दुसरा नियम म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी बोलवले जात नाही त्या ठिकाणी अजिबात जावू नये.

 

काही वेळेला आपण असे करत असतो की ज्या ठिकाणी आपल्याला बोलावलं नाही त्या ठिकाणी जातो. आणि आपला रिस्पेक्ट गमावत असतो. त्यामुळे आपल्याला समाजामध्ये आदर मिळत नसतो. म्हणून नेहमी ज्या ठिकाणी बोलवलं आहे असाच ठिकाणी जावे. तिसरा नियम म्हणजे आपल्या प्लॅनिंग इतरांना सांगू नये. जर आपण आपले भविष्यातील प्लॅनिंग इतरांना सांगितले आणि ते काही कारणास्तव घडले नाही तर इतर लोक आपल्याबद्दल असा विचार करतात की हा फक्त बोलतो करत तर काहीच नाही.

 

त्यामुळे आपला समाजामध्ये आदर राहत नाही. म्हणून आपण प्लॅनिंग सांगण्यापेक्षा तो सांगण्याआधी करून दाखवा. ज्याने आपला समाजामध्ये आदर निर्माण होईल. पुढील नियम म्हणजे स्वतःला दोष देऊ नये. काही लोक असे असतात काहीही झालं तरी ते स्वतःलाच दोष देत असतात. जे काही वाईट झालेला आहे ते स्वतःवर ओढून घेतात. यामुळे समाजामध्ये त्यांची सेल्फ रिस्पेक्ट कमी होते. समाजातील व्यक्ती त्यांना आदर सन्मान देत नाही. म्हणून कधीही स्वतःला दोष देऊ नये.

 

पुढील नियम म्हणजे संघर्ष हा आपल्या एकट्याचा असतो. हे नेहमी लक्षात ठेवा. आपण जेव्हा यशाच्या शिखरावर जातो तेव्हा सर्वजण आपल्याजवळ येतात. परंतु ते यश गाठण्यासाठी जे संघर्ष करावे लागतील त्या संघर्षामध्ये साथ देण्यासाठी कोणीही नसतं. ते संघर्ष स्वतः एकट्यालाच करावे लागते. हे नेहमी लक्षात ठेवावे. पुढील नियम म्हणजे लोकांपासून अंतर ठेवा. जर आपण प्रत्येक ठिकाणी बोलवणं आल्या आल्या लगेच गेलो तर त्या ठिकाणी आपली किंमत राहत नाही.

 

ते लोक आपल्याला मान देत नाहीत. इतरांसाठी आपण कधीच नेहमी हजर राहू नये. यामुळे आपण आपला सेल्फ रिस्पेक्ट कमी करून देत असतो. अशाने आपला समाजामध्ये सन्मान राहत नाही. आदर राहत नाही. पुढील नियम म्हणजे लोकांना फार महत्त्व देऊ नका. जर आपण एखाद्याला लिमिट पेक्षा जास्त महत्त्व देत असतो तर त्याचा आदर हा अहंकारांमध्ये रूपांतरित होत असतो. अशामुळे त्याचा आपल्या जीवनावर फार मोठा परिणाम होतो.

 

म्हणून कधीही कोणत्याही व्यक्तीला महत्त्व हे अपेक्षा पेक्षा जास्त देऊ नये. योग्य त्या पद्धतीने योग्य त्या ठिकाणी त्या व्यक्तीला महत्त्व द्यावे. पुढील नियम म्हणजे लोकांचा स्वभाव ओळखा. काही लोक असे असतात की जे फक्त आपला फायदा पुरतं वापर करून घेत असतात. त्यांचा फायदा सफल झाला की ते आपला विचार करत नाही. म्हणून कायम लोकांचा स्वभाव आपण ओळखून राहावे. तरच समाजामध्ये आपल्याला आदर मिळेल.

 

पुढील नियम म्हणजे असा बदला घ्या. आपल्या शत्रूचा बदला हा आपण भांडून नाही तर त्या व्यक्ती पेक्षा यशस्वी होऊन घ्यायचा असतो. कारण त्या व्यक्ती सोबत भांडण करण्यात आपण आपले महत्त्वाचे एनर्जी वाया घालवत असतो. म्हणून अशा व्यक्तींपासून भांडण्यापेक्षा त्या व्यक्तींपेक्षा यशस्वी होऊन दाखवल्यावरच त्याला योग्य तो बदला घेता येतो. पुढील नियम म्हणजे आनंदी राहायचा मंत्र.

 

आपण जर स्वतः नेहमी खुश राहायचं असेल तर कोण काय करतोय? कोण कशासाठी करतोय आणि का करते? हे जाणून घेण्यापेक्षा त्याचा विचार करू नका. त्याच्याकडे दुर्लक्ष करा. जेवढ्या आपण याकडे दुर्लक्ष करू तेवढे आपण आपल्या जीवनामध्ये आनंदी व सुखी राहा आणि तरच आपल्याला आपल्या समाजामध्ये योग्य तो मान सन्मान आणि आदरणीय म्हणून नेहमी अशा व्यक्तींपासून दूर राहावे.

 

अशाप्रकारे हे काही दहा नियम आहेत की ज्यामुळे आपण आपला समाजामध्ये योग्य तो मान सन्मान व आदर मिळू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published.