जेव्हा जवळची व्यक्ती तुम्हाला त्रास देते तेव्हा फक्त ही गोष्ट करा…. तुम्हाला परत कधीच त्रास होणार नाही ..!!

Uncategorized

 

मित्रांनो, आपला जीवनात अनेक वेळा असे घडत असते की आपल्या जवळची एकदम खास व्यक्तीची असते तीच आपल्याला त्रास देत असते. आपले मन दुखावत असते. पण अशावेळी आपण तिला काहीही बोलत नाही आणि त्याचाच फायदा घेऊन ते सतत आपल्याला त्रास देऊ लागतात. यावेळी काय करायचे? हे आपल्याला कळत नसत. म्हणूनच आजच्या या लेखांमध्ये आपण याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत की अशा परिस्थितीमध्ये आपण काय करावे?

 

आपला नातामध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडू नये म्हणून आपण प्रयत्न करत असतो आणि समोरच्या व्यक्ती आपल्याला कितीही त्रास दिला तरी त्याला उलट उत्तर आपण काहीही देत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला त्रास देते तेव्हा आपल्याकडे दोन पर्याय असतात. पहिला पर्याय म्हणजे सहन करणे आणि दुसरा पर्याय म्हणजे बोलून दाखवणे. पण यापैकी खास करून आपण जो उपाय करत असतो तो म्हणजे सहन करणे.

 

असे केल्याने त्या व्यक्तिला काहीही फरक पडत नाही व तो आपल्याला सतत त्रास देऊ लागतो. आपण त्याला असा संदेश देत असतो की तुम्ही तुमची वाईट वागणूक चालू ठेवा आणि सहन करत जाते. आपण आपली सहनशीलता आहे तेवढे आपण सहन करण्याचा प्रयत्न करतो. परंतु ज्यावेळी आपला सहनशील त्याच्या बाहेर ही गोष्ट जाईल त्या वेळेला ते आपल्याला सहन होत नाही. त्याचे परिणाम खूप वाईट होत असतात.

 

सहन केल्यामुळे आपला आरोग्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. आपले आरोग्य बिघडत असतात. त्याचबरोबर आपण चुका करणाऱ्या व्यक्तीला प्रोत्साहन देखील देत असतो की तू ह्या चुका करत जा मी त्या सहन करत जातो. हा पर्याय चुकीचा आहे. या उलट जर ज्यावेळी तो व्यक्ती आपल्याला काही त्रास देत असेल तर आपण बोलून टाकले तर याचा अर्थ असा होतो की तेव्हा तुम्हाला तुमचा स्वतःबद्दल आदर आहे. हे सिद्ध होत असते.

 

जर आपण बोलून दाखवले तर त्या समोरचे व्यक्ती ती चूक परत करणार नाही. आणि आपले नुकसान होण्याचे थांबेल. जर समजा एखादा व्यक्ती तुमच्या घरासमोर कचरा टाकत असेल आणि तुम्ही काही त्याला बोलला नाही. तर कचरा टाकतच गेला तुम्ही सहन करत राहिला. तर तुमच्या घरासमोर कचऱ्याचा मोठा ढीग होईल आणि याचे परिणाम खूप वाईट होतात. परंतु वेळीच जर तुम्ही त्याला बोलला तर तो पुन्हा तिथे कचरा टाकणार नाही. गोष्टी तेथेच थांबतील. त्याचबरोबर जर एखादा आजार आपल्याला झाला असेल आणि डॉक्टरांनी दिलेला औषधांपासून आपल्याला तो आजार कमी होत नसेल तर आपण डॉक्टरांना बोलावे की या औषधाने मला कोणताही फरक पडत नाही.

 

तरच डॉक्टर आपल्याला दुसरी ट्रीटमेंट देऊ लागतील व आपण त्या आजारातून बाहेर पडू. जर आपण काहीच बोललो नाही तर आपला आजार वाढत जाईल व त्याचे परिणाम ही वाईट होतील. म्हणून कधीही कोणीही आपल्याला त्रास दिला तर तो सहन करत बसण्यापेक्षा त्याला बोलून दाखवणे हा उपाय योग्य आहे. परंतु जेव्हा आपण हे इतरांना बोलून दाखवत असतो त्यासाठी काही नियम आहे. ते म्हणजे ज्या वेळेला आपण आपले म्हणणे इतरांना बोलून दाखवत असतो त्या वेळेला ते सांगताना आपला मनामध्ये प्रेम आणि आदर असला पाहिजे व त्या भाषेतच आपल्याला ते इतरांना समजावून सांगायला हवे.

 

तरच समोरचा व्यक्ती आपले म्हणणे ऐकून घेईल व आपल्या बोलण्याला प्रतिसाद देईल. कारण समाजामध्ये लोक प्रेम आणि आदर यालाच महत्त्व देत असतात. जर आपण प्रेम आणि आदर मनामध्ये ठेवून इतरांना आपले म्हणणे पटवून दिले तरच तो व्यक्ती पुन्हा आपल्याला त्रास देणार नाही. आपल्या मनामध्ये ज्याप्रमाणे नात्यांचे संबंध ठेवायचे आहेत ते त्याला व्यवस्थित पटवून द्यावे. तरच तो आपले म्हणणे ऐकले.

 

म्हणून कधीही कोणताही व्यक्ती जर आपला त्रास देत असेल तर त्याला सहन करण्यापेक्षा बोलून दाखवावे. हे म्हणणे बोलून दाखवताना आपल्या मनामध्ये प्रेम आदराने तेच समजावून सांगावे. तरच त्याला प्रतिसाद मिळेल. व ती व्यक्ती ती चूक पुन्हा कधीही करणार नाही आणि आपल्याला त्रास देणार नाही.

 

अशाप्रकारे जर आपल्याला कोणी त्रास देत असेल तर त्याला सहन करण्यापेक्षा आपण त्याला बोलून दाखवणे हा उत्तम पर्याय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.