हजारो रुपये वाचवणारा उपाय, कमी चालत असलेल्या गॅसची फ्लेम घरच्या घरी ठीक करा, मोजून फक्त पाच मिनिटात १००% घरच्या घरी ….!!

Uncategorized

मित्रांनो, आपल्या प्रत्येकांना हे माहीतच आहे की आपल्या घरामध्ये असणाऱ्या स्त्रियांची रोज सकाळी फारच घाई असते. अशावेळी आपण एका हाताने स्वयंपाक, एका हाताने इतर साफसफाईची किंवा बाकी कामं करत असतो. डोक्यात ऑफीसचे किंवा घरगुती विचार चालू असतात. तोंडाने मुलांना आणि नवऱ्याला किंवा आणखी कोणाला काही सुचना देत असतो. अशावेळी आपल्याला एका गॅसवर चहा, एकीकडे नाश्ता आणि एकीकडे जेवणाच्या डब्यातील पोळीभाजी असे सगळेच करायचे असते. अशावेळी गॅसची फ्लेम चांगली मोठी असेल तर सगळ्या गोष्टी झटपट होतात. पण अनेकदा ही फ्लेम काही ना काही कारणाने लहान झालेली असते.

 

त्यामुळे आपला स्वयंपाकात आणि ओट्यापाशी खूप वेळ जातो. त्याचबरोबर मित्रांनो ज्यावेळी आपल्या घरामध्ये कार्यक्रम असतात किंवा एखादा सण असतो. त्या वेळी तर एकावेळी जास्त पदार्थ करायचे असल्यावर आपली पुरती तारांबळ उडते, आणि आता गॅस बर्नरची फ्लेम अचानक कमी का होते? गॅस फडफडून बंद का होतो? य़ामध्ये कोणते बिघाड झाल्याने असे घडते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

 

अनेकदा सिलिंडर भरलेला असूनही अचानकपणे गॅस फडफडतो किंवा जातो. अशावेळी सतत गॅस लावावा लागतो, यामध्ये बराच वेळ जातो आणि स्वयंपाकाला आणि पुढच्या सगळ्या गोष्टींना उशीर होतो. काही वेळा तर गॅसची फ्लेम इतकी लो असते की, एखादा पदार्थ व्हायला खुप वेळ जातो. काही सोप्या उपाय जर वापरले तर ही फ्लेम मोठी करता येऊ शकते.

 

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया त कोणत्या आहेत हे उपाय आणि आणि त्या कशा करायच्या हे समजून घेऊया.

तर मित्रांनो या समस्येवर सर्वात पहिला आणि सर्वात सोपा उपाय म्हणजे आपण आपल्या गॅसचा बर्नर जो आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो हा गॅस स्वच्छ करून घेत असताना आपण गॅसच्या बर्नरला बरीच छिद्रे असतात.

 

मित्रांनो सर्वात महत्त्वाचा जो उपाय आपण आपला गॅसची फेम कमी झाल्यावर किंवा ज्यावेळी त्यामधून गॅस कमी प्रमाणात येतो त्यावेळी करू शकतो तो म्हणजे मित्रांनो जो आपल्या गॅसवर भरणार असतो त्याच्या खाली एक लांबडी नळी असते. त्या नळीच्या आतमध्ये मित्रांनो एक स्टिक असते म्हणजेच एक जाड काठी असते आणि त्याच्यामध्ये एक बारीक छिद्र असते.

 

तर मित्रांनो आपल्या घरामध्ये असणाऱ्या बारीक तार चा वापर करून किंवा सुईने किंवा सेफ्टी पिन चा वापर केला तरी देखील चालू शकते. किंवा जी बांधकाम साठी तार असते ती तार चा उपयोग करून आपण ते जे बारीक छिद्र असते. त्यामध्ये ती तार घालून ते छिद्र स्वच्छ करून घ्यायचा आहे.

 

मित्रांनो अशा पद्धतीने त्यामध्ये जी काही घाण आढळलेली आहे ती आपल्याला काढून घ्यायचे आहे. मित्रांनो अशा पद्धतीने आपण हे उपाय करून आपल्या गॅसची फ्रेम स्वच्छ करू शकतो आणि यामुळे आपला गॅसही पुन्हा व्यवस्थित सुरू होईल तर असे हे घरगुती उपाय तुम्ही नक्की करून पहा.

Leave a Reply

Your email address will not be published.