या उपायाने फक्त एक वेळेस केस काळे करा आणि पहा परत आयुष्यभरा केस काळे करावे लागणार नाहीत, सफेद केस कायमचे आयुष्यभरासाठी काळे होणार ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, सुंदर दिसण्यासाठी केस हे एक महत्त्वाचा भाग आहे. केस लांबसडक, काळेभोर आणि केसांना एक विशिष्ट प्रकारची चमक असेल तर आपण सगळ्यांमध्ये उठून दिसतो. तुम्हाला तुमचे केस तुम्हाला कायमचे काळे करून पाहिजे असतील, तुमचे केस खूप पांढरे असतील व सतत तुम्हाला असे वाटत असेल की, आपण कुठे जायला नको किंवा आपल्या डोक्यावर टोपी घालून जावे. कारण आपले केस पांढरे असतात किंवा गळत असतात. अनेकांना असे वाटत असते आपले केस मोठे असावेत. आपले केस चांगले शाईन मारायला पाहिजे व आपल्या डोक्यात कासलाही कोंडा होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करत असतो.

परंतु मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की, आज-काल केस गळतीचे प्रमाण वाढले आहे. आजच्या या ताण-तणावाच्या जीवनामुळे आपण आहाराकडे लक्ष देत नाही. त्यामुळे केस गळतीचे प्रमाण खूपच वाढले आहे. अनेक ठिकाणी तर, असेही दिसून आले आहे की, अनेक लोकांना टक्कल ही पडले आहेत. त्याचबरोबर केस पांढरे होण्याची ही समस्या भरपूर जणांना असते आणि लहान वयातच केस पांढरे होऊ लागतात. यासाठी आज आपण काही उपाय जाणून घेणार आहोत. केस गळती व केस पांढरे होण्याचे कारण म्हणजे आपले आहाराकडे लक्ष न देणे, थायरॉईड मुळे ही केस गळतीचे प्रमाण वाढते. आणि मित्रांनो ज्यावेळी आपले केस अशा पद्धतीने गळायला सुरुवात होते आणि हे आपले केस ज्यावेळी पांढरे होतात त्यावेळी आपला आत्मविश्वास ही कमी होत असतो.

मित्रांनो आपण ज्यावेळी आपली ही समस्या घेऊन डॉक्टरांकडे किंवा इतर कुठे जातो तेव्हा आपल्याला वेगवेगळी महागडी औषधे दिली जातात. इतकी औषधे घेऊन सुद्धा आपल्याला त्याचा चांगला रिझल्ट येत नाही किंवा काही वेळेला आपल्याला त्या औषधांचा साईड इफेक्ट सुद्धा होत असतो. म्हणूनच मित्रांनो आपण अशा पद्धतीने बाहेरील औषधे किंवा इतर कोणत्या गोळ्या किंवा डाय हे आपल्या केसांना लावतो. त्यावेळी आपले केस आणखीन खराब होण्यास सुरुवात होते आणि आपले केस आणखीन पांढरे होतात. परंतु मित्रांनो, असे महागडे औषधे घेण्यापेक्षा किंवा इतर महागडी डाय आपल्या केसांना लावण्यापेक्षा आपण जर आपल्या आयुर्वेदाचे मदत घेऊन काही घरगुती उपाय आपल्या घरामध्ये योग्य पद्धतीने केले तर याचा चांगला रिझल्ट आपल्याला मिळू शकतो.

तर मित्रांनो आज आपण एक छोटासा आणि सोपा त्याचबरोबर अगदी घरामध्ये कमी खर्चामध्ये करता येण्यासारखा एक उपाय आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो असा आजचा हा उपाय जर आपण महिन्यातून फक्त पाच ते सहा वेळा म्हणजेच आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा जर केला तर यामुळे आपले केस कायमचे काळे होतीलच आणि त्याचबरोबर हा उपाय करायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला परत कोणत्याही पद्धतीचा डाय आपल्या केसांवर लावावा लागणार नाही. कोणतीही औषधे सुद्धा आपल्याला या उपाय केल्यानंतर घ्यावी लागणार नाहीत आणि त्याचबरोबर मित्रांनो हा उपाय कोणीही करू शकते म्हणजेच पुरुष किंवा महिला यापैकी कोणीही हा उपाय करू शकतात.

चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणता आहे हा उपाय आणि कशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे. याबद्दलची सविस्तर माहिती. तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला मुख्य दोन पदार्थांची आवश्यकता आहे एक म्हणजे आवळा चूर्ण आणि दुसरे म्हणजे दही. मित्रांनो आवळा चूर्ण हे आपल्याला कोणत्याही मेडिकल शॉप मध्ये किंवा आयुर्वेदिक दुकानांमध्ये किंवा सौंदर्य प्रसाधनाच्या दुकानांमध्ये अगदी सहज उपलब्ध होतं. मित्रांनो या उपायासाठी आपल्याला आवळा चूर्ण किंवा आवळा पावडर याच एक पाकीट घेऊन यायचं आहे आणि दुसरा पदार्थ तो म्हणजे दही. मित्रांनो दही तर आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये उपलब्ध होतं. मित्रांनो अशा पद्धतीने या दोन पदार्थांचा वापर करून आपल्याला आजचा हा उपाय करायचा आहे.

तर मित्रांनो हा उपाय करत असताना आपल्याला एक ॲल्युमिनियमचं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आवळा चूर्ण म्हणजेच आवळा पावडर घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये दही टाकायचं आहे. मित्रांनो तुम्हाला जितक्या प्रमाणामध्ये हा डाय तयार करायचा आहे तितक्या प्रमाणामध्ये या दोन्हीही वस्तू तुम्ही एका अन्युमिनियमच्या किंवा लोखंडाच्या भांड्यामध्ये घ्यायच आहे. त्यानंतर हे दोन्ही पदार्थ आपल्याला चमच्याच्या किंवा हाताच्या साह्याने व्यवस्थितपणे एकत्र करून घ्यायचे आहे. त्यानंतर हे मिश्रण तयार झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला 24 तासापर्यंत तसंच झाकून ठेवायचं आहे आणि 24 तास झाल्यानंतर मित्रांनो हे मिश्रण काळ्या रंगाचे होईल. त्यानंतर हे मिश्रण आपण ज्या पद्धतीने डायल होतो त्या पद्धतीने आपल्याला आपल्या केसांवर व्यवस्थित लावून घ्यायचा आहे.

तर मित्रांनो हे अशा पद्धतीने आवळा चूर्ण आणि दही यांचे मिश्रण 24 तास करून ठेवायच आहे आणि त्यानंतर ते आपल्या केसांवर लावायच आहे. मित्रांनो हे मिश्रण आपले केसांवर कमीत कमी दोन ते तीन तास तसंच ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर मित्रांनो गार पाण्याने आपल्याला आपले केस धुवून घ्यायचे आहेत. मित्रांनो आपले केस धुत असताना आपल्याला कोणत्याही शाम्पूचा किंवा साबणाचा वापर करायचा नाही. फक्त थंड पाण्याने आपल्याला आपले केस धुऊन घ्यायचे आहेत. मित्रांनो अशा पद्धतीने हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करायचा आहे. हा उपाय केल्यानंतर काही दिवसांमध्ये तुमचे केस काळेभोर झालेले आहेत असे तुम्हाला दिसून येईल.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.