लाखो रुपयांची औषधे पण फेल आहेत या काळ्या मनुक्या समोर असे जबरदस्त फायदे सकाळी फक्त दोन खा आणि शरीराला होणारे चमत्कार पाहून थक्क ……!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो उत्तम आरोग्यासाठी ड्रायफ्रुट खाण्याचा सल्ला दिला जातो. किमान एक मूठ तरी ड्रायफ्रुट खावे असे सांगितले जाते. ड्रायफ्रुटमधील मनुका हा प्रकार अनेकांना आवडतोच असा नाही.काही जणांना दाताखाली गोड आवडत नाही म्हणून ते चिवडा, लाडूमधील मनुका कटाक्षाने बाहेर काढून टाकतात. पण जर तुम्ही काळे मनुके खात नसाल तर आजपासूनच ते खायला घ्या. कारण मित्रांनो या काळ्या मनुकांमध्ये असणारे आयुर्वेदिक घटक आणि त्याचबरोबर त्याचे चांगले गुणधर्मामुळे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या अनेक वेगवेगळ्या समस्या रोग तक्रारी दूर होण्यास मदत होते आणि म्हणूनच आपणही या काळ्या मनुकांचा आपल्या आहारामध्ये आणि त्याचबरोबर आपल्या संपूर्ण दिनचर्यामध्ये थोडासा जरी वापर केला तरी यामुळे याचे अनेक फायदे आपल्याला मिळू शकतात.

मित्रांनो काळ्या मनुकांचे नियमितपणे सेवन केल्यास शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदा होतो परंतु त्याच बरोबर हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक शरीराला हानिकारक ठरतो. काळ्या मनुकांचे अति सेवन केल्यास त्याचे काही तोटे देखील होतात. आणि काळ्या मनुका नियमितपणे खाण्याचे नेमके फायदे आणि तोटे काय आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो काळ्या मनुका नुसत्या खाव्यात अथवा पाण्यात भिजवून त्यांचे सेवन करावे. दररोज किमान ७ ते ८ मनुका खाव्यात. एका वेळी १२ ते १५ मनुकांपेक्षा जास्त मनुका खाऊ नयेत.

काळ्या मनुकांचे आरोग्याला होणारे फायदे खालील प्रमाणे आहेत, तर मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या माहितीनुसार या मनुकांमध्ये विटामिन ए, विटामिन बी वन, विटामिन बी फाईव्ह, विटामिन बी सिक्स, विटामिन ई आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे मनुकांचे नियमित सेवन केल्यास शरीराची रोग प्रतिकारकशक्ती वाढून आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते आणि मनुकांमध्ये भरपूर प्रमाणात एंटीऑक्सीडेंट असल्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. त्याचप्रमाणे मनुका अँटी एजिंगसाठी महत्त्वाचे काम करतात. शरीराचा चयापचयाचा वेग वाढवण्यासाठी देखील मनुकांचे नियमित सेवन उपयोगी ठरते.

आणि त्याचबरोबर मित्रांनो या मनुकांमध्ये अँटिबायोटिक गुणधर्म असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती भरपूर प्रमाणात वाढते. तसेच घशाचे खवखवणे, सर्दी-पडसे यासारख्या आजारांवर देखील मनुकांचे नियमित सेवन गुणकारी ठरते आणि काळ्या मनुकांमध्ये असणाऱ्या बियांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असल्यामुळे शरीरातील स्नायू मजबूत राहण्यास मदत होते. तसेच शरीरात कुठेही सूज येत असल्यास त्यावर नियमितपणे केलेले काळ्या मनुकांचे सेवन गुणकारी ठरते. संधिवात, सांधे आखडणे आणि स्नायूंना सूज येऊन होणारी वेदना या सर्वांवर मनुकांचे नियमित सेवन गुणकारी ठरते असे आढळून आले आहे.

मित्रांनो काळ्या मनुकांमध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम सुद्धा असते. त्याच्या प्रभावामुळे शरीरातील रक्‍त वाहिन्यांमधून होणारा रक्तप्रवाह सुरळीत राहतो तसेच रक्तात गुठळ्या होण्याचे प्रमाण कमी होते. रक्तदाब नियंत्रणात राहण्यास काळ्या मनुकांचे नियमित सेवन अतिशय गुणकारी ठरते आणि काळ्या मनुकांच्या नियमित सेवनामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते. काळ्या मनुकांपासून तयार होणारे तेल लावल्यास सोरायसिस सारखे त्वचाविकार बरे होण्यास मदत होते. तसेच कोरडी पडलेली त्वचा मऊ होण्यास मदत होते. त्वचेचा पोत सुधारतो.

मित्रांनो काळ्या मनुकांच्या नियमित सेवनामुळे डोळ्यांना होणारा रक्तपुरवठा चांगल्या रीतीने होतो आणि त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. ज्या लोकांना दिवसातील जास्तीत जास्त वेळ कॉम्‍प्‍युटर समोर काम करावे लागते त्यांच्यासाठी डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळ्या मनुकांचे नियमित सेवन अतिशय गुणकारी आहे. यामुळे डोळ्यांवर येणारा ताण कमी होण्यास मदत होते तसेच दृष्टी सुधारते आणि त्याचबरोबर काळ्या मनुका रात्रभर भिजवून सकाळी रिकाम्यापोटी त्यांचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता दूर होऊन पोट साफ होण्यास मदत होते.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.