मोतीबिंदु जाऊन हे 8 आजार फुकट बरे करते ही वनस्पती जांभुळ या वनस्पतीचे हे फायदे वाचून तुमच्यापन पायाखालची जमीन सरखेल ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, जांभूळ खाणे प्रत्येकालाच आवडते आणि त्याचे औषधी गुणधर्म बघितले तर ते आवश्यक खाल्ले पाहिजे. असे ही बहुपयोगी जांभूळ फळ असल्याने वर्षातून एकदाच उपलब्ध होते. पण तुम्हाला माहीत आहे का कि, जांभळाचे संपूर्ण झाडच औषधी गुणांनी परिपूर्ण आहे जांभळाच्या झाडाच्या पानाचे सालीचे मुळाचे औषधी उपयोग तुम्ही जाणून घेतले तर तुम्ही थक्क व्हाल. त्यामुळे वनस्पती संपूर्ण भारतभर सर्वत्र उपलब्ध आहे चला तर आपण जाणून घेऊया या. जांभळाच्या झाडाचे काही औषधी उपयोग.

मित्रांनो, काही महिलांचा वारंवार गर्भपात होत असतो अशा वेळी जांभळाच्या कोवळ्या पानांचा रस प्यायला दिल्यास गर्भपात होण्याचे रोखले जाते आणि मित्रांनो, शरीरातील उष्णता वाढून तोंडात फोड येतात, ज्यांना तोंड येणे असे म्हणतो अशा वेळेस झाडाच्या पानांचा काढा करून हे पाणी थंड झाल्यावर या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडातील उष्णतेचे फोड जातात. हा उपाय दिवसातून तीन वेळा केल्याने तोंडातील फोड नष्ट होतात.

मित्रांनो अनेक वेळा अतिथंड किंवा अति गरम पदार्थ खाल्ल्याने किंवा व्हायरल इन्फेक्शनमुळे घसा बसतो अशावेळी जांभळाच्या झाडाची ताजी साल काढून त्याच्या काढा बनवावा व या कोमट पाण्याने रात्री झोपण्यापूर्वी गुळण्या केल्याने अगदी दुसऱ्या दिवशी आराम मिळतो आणि कोणत्याही कारणाने झालेली जखम धुण्यासाठी या जांभळाच्या झाडाची पाने उकळून थंड केलेले पाणी वापरले तर त्यामुळे जखम लवकर भरण्यासाठी मदत होते. जांभळाच्या सीजनमध्ये जांभळे गोळा करून ती स्वच्छ धुऊन एका भांड्यात ठेवावीत. त्यामध्ये थोडे मीठ घालून जांभळे बुडतील एवढे पाणी टाकावे.

आणि आता एक दोन तीन दिवस तसेच ठेवावे नंतर ते गाळून त्याचा रस बाजूला काढावा व हा रस एका बाटलीत भरून एक दिवसभर उन्हात ठेवावी व नंतर तो स्टोअर करून ठेवावा मित्रांनो हा रस मधूमेहासाठी पोटाच्या सर्व समस्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आणि मंदावलेली पचनक्रिया अपचन यासारखे पोटाचे सर्व विकार यांच्या दोन चमचे रस सकाळ-संध्याकाळच्या सेवनाने नष्ट होतात. दाताच्या समस्या साठी या जांभळाच्या झाडाची सालीची राख बनवावी व त्यामध्ये थोडे सैंधव मीठ टाकून या पावडरने दात घासल्याने हिरड्यातून रक्त येणे, दात दुखणे, दातांची कीड, तोंडाचा वास येणे या सर्व समस्या नष्ट होतात.

मित्रांनो डोळे जळजळ करत असतील डोळ्यातून सतत पाणी येत असेल तर या जांभळाची कोवळी पाने बारीक ठेचून त्याचा गोलाकार असा लगदा करावा व तो डोळ्यांवर पाच मिनिटं ठेवल्याने या सर्व समस्या नष्ट होतात. जांभळाच्या बियांची पावडर आणि आवळा पावडर समप्रमाणात घेऊन ती मिक्स करावी व ही पावडर दोन ग्रॅम याप्रमाणे घेऊन यात एक चमचा मध घालून त्याचे सेवन करावे मोतीबिंदू नाहीसा होतो आणि मित्रांनो, मुळव्याधीचे दुखणे सुरू झाल्यावर या जांभळाच्या कोवळ्या पानांचा काढा सकाळ-संध्याकाळ सेवन केल्याने मुळव्याध देखील बरी होते.

आणि मित्रांनो जुलाब होत असतील तर या जांभळाची पाने व साल यांचा काढा करून पिल्याने जुलाब थांबतात तसेच वर्षातून एकदा येणाऱ्या या जांभळाचे सेवन सलग पंधरा दिवस करतो त्याला मुतखडा होण्याचा धोका अगदी शून्य होतो. मित्रांनो, जांभळाचे काही औषधी उपयोग सांगितले आहेत. परंतु जांभळाच्या कवळ्या पानांचे सेवन केल्याने अजूनही भरपूर आरोग्यदायी फायदे आपल्या शरीरात मिळतात.

आणि मित्रांनो जांभळाच्या पानांपासून तयार केलेला चहा घेतल्याने मधुमेह नियंत्रित ठेवता येतो. जांभळाची पाने ही तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.जांभळाच्या पानांचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. जांभळाच्या पानांमध्ये अँटी-हायपरग्लायसेमिक गुणधर्म आढळतात, जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. जे मधुमेह नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.