मित्रांनो, वर्षामध्ये असे काही दिवस असतात की, ज्या दिवशी आपण कोणतेही उपाय केले किंवा जी काही पूजा करू ते लवकर फलित होते म्हणजे त्याचे फळ आपल्याला लवकर मिळते. यातीलच एक दिवस म्हणजे होळीचा दिवस. होळीचा दिवस तर अनेक तांत्रिक मांत्रिक आतुरतेने वाट पाहत असतो. कारण या दिवशी जे काही तंत्र, मंत्र विद्या तसेच अनेक प्रकारचे उपाय केल्याने ते अत्यंत जलद गतीने फलित होत असतात.
आज आपण एक असा उपाय पाहणार आहोत की, जो उपाय केल्याने ज्या कोणाचे लग्न होत नसेल. काही अडचणी बाधा येत असतील. सतत या नात्याने लग्नामध्ये अडचण निर्माण होत असेल. लग्न जुळून येत नसेल कोणता ना कोणत्या बाधा उत्पन्न होत असते. तर अशा लोकांनी होळीच्या दिवशी जर हा उपाय केला तर त्यांचे लग्न हे 21 दिवसाच्या आत ठरेल.
हा उपाय मुलगा किंवा मुलगी कोणीही करू शकतो. ज्याचे लग्न ठरण्यास काही अडचणी निर्माण होणार होत आहेत अशांनी हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर हा उपाय त्यांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती त्यांच्यासाठी करू शकते. हा उपाय कसा करावा? कधी करावा व कोठे करावा? याची संपूर्ण माहिती आजच्या या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.
बराच वेळेला असे होत असते की मुलगा किंवा मुलगी हे लग्नासाठी तयार नसतात तर, अशा वेळेला यांच्या आई वडिलांनी संकल्प घेऊन जर हा उपाय केला तरी देखील चालू शकते किंवा इतर वेळेस मुलगा किंवा मुलगी स्वतः हा उपाय करू शकतात. पहिला उपाय म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी किंवा ज्या वेळेस तुम्हाला वेळ असेल त्यावेळी ‘बजरंगबाणचा’ पाठ तुम्हाला करायचा आहे.
हा उपाय तुम्ही होळीच्या दिवसापासून सुरू करून पुढे 21 दिवस हा उपाय चालू ठेवायचा आहे. दुसरा उपाय म्हणजे पानाचे दोन वेढे घ्यायचे आहेत. त्यावर दोन विलायची आणि हळकुंड अशाप्रकारे त्या पानावर ठेवून ते पान महादेवाच्या मंदिरामध्ये महादेवाच्या चरणासमोर किंवा पार्वतीच्या चरणासमोर ठेवायचे आहे. हा उपाय तुम्हाला होळीच्या दिवसापासून रंगपंचमीच्या दिवसापर्यंत करायचा आहे.
तिसरा उपाय म्हणजे होळीच्या दिवसापासून 21 दिवस विष्णू देवाची पूजा आपल्याला करायचे आहे. या पूजेमध्ये आपल्याला चार मुखी दिवा लावायचा आहे. हा दिवा कणकीचा तयार करायचा. रोज संध्याकाळी किंवा सकाळी हा आपल्याला आपल्या देवासमोर किंवा विष्णू देवाचा ज्या कोणत्या रूपातील फोटो असेल त्या फोटो समोर लावायचा आहे. दुसऱ्या दिवशी दिवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करावा किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवावे.असे सलग 21 दिवस हा उपाय आहे करायचा आहे.
चौथा उपाय म्हणजे आपल्याला दोन लाल फुल घ्यायचे आहेत. हे लाल फुल गुलाबाच, जास्वंदाच्या इतर कोणत्याही वनस्पतीच्या असेल तर चालू फक्त त्याचा कलर हा लाल असला पाहिजे. हे लाल फुल आपल्याला होळीच्या दिवसापासून सलग 21 दिवस हनुमान च्या मंदिरामध्ये जाऊन हनुमानाला अर्पण करायचे आहे. हे फुल अर्पण करत असताना आपल्या इच्छा म्हणजेच जे काही आपला लग्नाबद्दलची इच्छा आहे ती त्याबद्दलची प्रार्थना करायची आहे आणि अकरा प्रदक्षिणा घालावा.
अशाप्रकारे हे काही उपाय आहेत जे तुम्ही म्हणजेच मुलगा किंवा मुलगी हा उपाय करू शकता किंवा
आई वडील किंवा घरातील इतर व्यक्ती हा उपाय त्या मुला मुलीसाठी करू शकतो.
अशा प्रकारे हा उपाय ज्या व्यक्तींचे लग्न ठरत नाही अशांसाठी आहे. अशा व्यक्तींनी नक्कीच हा उपाय करून बघा. तुमचे लग्न लवकरात लवकर जुळून येईल.