हातही न लावता आणि पितांबरीचा वापर ही न करता कितीही जुने तेलकट, झालेले देवाचे दिवे साफ करा मोजून फक्त पाच मिनिटांत …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, कोणत्याही पूजेची सुरुवात करण्यापूर्वीच सुरुवातीला एका बाजूला दिवा लावला जातो आणि मित्रांनो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आपल्या घरामध्ये असणाऱ्या देवघरांमध्ये दिवे लावणे अत्यंत शुभ मानले जाते आणि म्हणूनच आपल्यातील बरेच जण आपल्या देवघरांमध्ये किमान एक तरी दिवा लावतच असतो. हा दिवा कायमच सुरू असतो म्हणजेच चोवीस तास हा दिवा प्रज्वलित असतो आणि म्हणूनच मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये शक्यतो तांब्याची किंवा पितळेचे असतात. मित्रांनो जेव्हा अशा पद्धतीने आपण हे दिवे कायमच प्रचलित ठेवतो. म्हणजेच कायमच चालू असतात. त्यामुळे त्यावर काळे डाग पडलेले असतात आणि त्याचबरोबर हे दिवे खूपच चिकट, तेलकट झालेले असतात.

तर मित्रांनो अशा वेळी काळे पडलेले दिवे हे स्वच्छ करण्यासाठी आपल्याला खूपच मेहनत घ्यावी लागते आणि त्याचबरोबर खूप मेहनत घेऊन आणि त्याचबरोबर त्याला वेगवेगळ्या साधनांनी सुद्धा यावर असलेला तेलकटपणा जात नाही आणि काळे डाग सुद्धा जात नाहीत.

तर मित्रांनो अशा वेळी आपण बाजारामध्ये मिळणाऱ्या वेगवेगळ्या केमिकल आणि लिक्विड यांचा वापर करून हे दिवे चमकवण्याचा आणि यावर असणारा तेलकटपणा घालवण्याचा विचार करतो. तेव्हा ही जी केमिकल युक्त लिक्विड आणि विविध पावडर आपल्याला बाजारामध्ये मिळतात ही एक तर सर्वात महाग असतात. नाहीतर त्यांचा चांगला परिणाम त्या दिव्यांवर होत नाही.

परंतु मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये असणाऱ्या काही गोष्टींचा वापर करून हे दिवे चमकवण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो नक्कीच आपल्या घरामध्ये असणारे दिवे आणि पितळेची त्याचबरोबर तांब्याची भांडीही स्वच्छ होतील. त्याचबरोबर जे आपल्या घरामध्ये दिवे आहेत त्यांवर असणारा तेलकटपणा आणि काळे डाग निघून जातील. तर मित्रांनो आज आपण असाच एक घरगुती आणि अगदी सोपा उपाय पाहणार आहोत.

हा उपाय जर आपण आपल्या घरामध्ये एक ते दोन वेळा जरी करून पाहिला तर यामुळे तुमच्या घरामध्ये असणाऱ्या तांब्याच्या आणि पितळेच्या दिव्यांमध्ये आणि त्याचबरोबर भांडी, दागिने यामध्ये तुम्हाला नक्की फरक दिसून येईल. तर मित्रांनो चला पाहूयात कोणता आहे हा घरगुती उपाय.

तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी एका मोठ्या भांड्यामध्ये दीड ते दोन ग्लास पाणी घ्यायचा आहे. मित्रांनो जितक्या प्रमाणात तुमच्या घरामध्ये असणाऱ्या तांब्याची आणि पितळाच्या भांड्यांचे तुम्ही काळे डाग काढणार आहात तितक्या प्रमाणात तुम्हाला हे पाणी तयार करायचं आहे.

तर मित्रांनो साधारणता दिवे आणि समया स्वच्छ करण्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये ते दोन ग्लास पाणी घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा वॉशिंग पावडर टाकायची आहे. मित्रांनो तुमच्या घरामध्ये अवेलेबल असणार कोणत्याही प्रकारचं वॉशिंग पावडर तुम्ही या उपायासाठी वापरू शकता. त्यानंतर आपल्याला एक छोटा चमचा बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा यामध्ये टाकायचा आहे.

आपल्याला यामध्ये अर्धा किंवा जर शक्य असेल तर एक लिंबू पिळायचा आहे म्हणजेच एका लिंबूचा रस यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. हे तिन्ही पदार्थ या पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हे सर्व पदार्थ एकत्रित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जे तेलकट झालेले आणि काळे पडलेले दिवे आहेत ते आपल्याला त्या भांड्यामध्ये सुट्टे करून टाकायचे आहेत.

त्यानंतर मित्रांनो हे भांडे आपल्याला गॅसवर उकळण्यासाठी म्हणजेच गरम करण्यासाठी ठेवायचा आहे. त्यानंतर मित्रांनो पाच ते दहा मिनिटे अशा पद्धतीने आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला असे दिसून येईल यावर असणारा तेलकटपणा आणि काळे डाग निघून गेलेले आहेत.

तर अशा पद्धतीने ही स्टेप केल्यानंतर आणखीन एक छोटीशी स्टेप आपल्याला करायचे आहे. यासाठी सर्वात आधी हे भांडे आपल्याला गॅसवरून उतरवून घ्यायचा आहे आणि हे पाणी गार झाल्यानंतर आपल्याला यामध्ये असणारी दिवे आणि जे काही तांब्याची घेऊन पितळेचे भांडे आहे ते काढून घ्यायचे आहे.

जर तुम्हाला शक्य असेल तर पुन्हा एकदा तुमच्या घरामध्ये असणारे पितांबरीने किंवा तुम्ही ज्या पावडरने तुमच्या घरामध्ये असणारे देवी असतात त्यांनी पुन्हा एकदा हलक्या हाताने घासून घ्यायचा आहे. मित्रांनो अशा सोप्या पद्धतीने हा उपाय तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की करून पहा. तुमच्या घरामध्ये असणारे तांब्याचे आणि पितळेचे दिवे किंवा भांडी आहेत ते नक्की चमकतील.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.