दात या दाढ काढण्यापूर्वी शेवटचा उपाय समजून करा हा घरगुती उपाय, दाढेतील कीड एका सेकंदात बाहेर परत मरेपर्यंत एकही दात दुखणार नाही …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागतो. म्हणजेच आपल्या आहाराकडे व्यवस्थित लक्ष नसल्यामुळे तसेच अनेक कामाचा ताण असल्यामुळे देखील आपण व्यवस्थित खाणे पिणे याकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे मग अनेक प्रकारचे आजार उद्भवतात आणि आजकाल वजन वाढणे तसेच कंबर दुखी गुडघेदुखीचा त्रास खूपच आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो दात दुखीचा देखील त्रास अनेक जणांना होत असतो. म्हणजेच अनेक जणांचे दात हे किडलेले असतात तसेच वारंवार दातांमध्ये दुखण्यासारखा त्रास होत असतो. मग यावरती आपण अनेक औषधे घेतो तरी देखील आपली दाताची समस्या कमी होत नाही.

 

आजकाल दात दुखीची समस्या सर्रास आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते. पूर्वीच्या काळी दात दुखीची समस्या वगैरे असे कोणतेच आजार नव्हते. पण आजकाल खूपच दात दुखीची समस्या वाढलेली आहे. तसेच मित्रांनो गोड पदार्थांचा म्हणजे चॉकलेट, कॅडबरी यांचा वापर अती असल्यामुळे लहान मुलांच्या देखील दात दुखीची समस्या जाणवते.

 

तर मित्रांनो दात दुखीची समस्या जर दूर करायची असेल तसेच दाताना जर कीड लागली असेल तर यावरती मी आज तुम्हाला घरगुती उपाय सांगणार आहे. मित्रांनो हा घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला लवंग तसेच तुरटी व मोहरीचे तेल लागणार आहे. मित्रांनो जर तुम्हाला दात दुखीची समस्या असेल म्हणजे दातांमध्ये खूपच त्रास होत असेल तर तुम्हाला पहिल्यांदा दोन ते तीन लवंग घ्यायचे आहेत आणि त्या एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचे आहेत.

 

म्हणजेच त्या लवंग तुम्हाला बारीक करून घ्यायचे आहेत परंतु मित्रांना लवंग घेताना त्या लवंगाला फुल असणे खूपच गरजेचे आहे. म्हणजे तुटलेले फुटलेले लवंग अजिबात घेऊ नका. त्यासमोर फुल असलेली लवंग तुम्हाला दोन ते तीन बारीक करून घ्यायचे आहेत आणि मित्रांनो ही बारीक केलेली जी लवंग आहे याची थोडीशी म्हणजे चिमूटभर तुम्ही पेस्ट घेऊन ती तुम्ही आपल्या दातांमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला त्रास होत आहे त्या ठिकाणी तुम्ही ती चिमूटभर लवंगाची पेस्ट तशीच ठेवायची आहे.

 

मित्रांनो आपल्याला जरी थुंकी आली तरी तुम्ही थुंकायचे नाही. तर तुम्ही चिमूटभर ती लवंगाची पेस्ट तशीच दातामध्ये धरून ठेवायची आहे आणि पाच मिनिटे झाल्यानंतर मग तुम्ही ती तुमची थुंकी थुकू शकता. मित्रांनो हा उपाय केल्यामुळे तुमचे दात दुखीचा त्रास नक्कीच कमी होणार आहे.

 

तसेच मित्रांनो जर तुम्हाला दातांमध्ये कीड आली असेल तर तुम्ही एक चमचा मोहरीचे तेल घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुरटी एक चमचा बारीक करून त्या तेलामध्ये घालायची आहे आणि हे व्यवस्थित तुम्हाला मिसळून मिक्स करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो एक थोडासा कापूस घेऊन तो कापूस तुम्ही त्या मिश्रणामध्ये बुडवायचा आहे आणि आपणाला जर तुम्हाला खालच्या साईटच्या दातांमध्ये कीड असेल तर तुम्ही तो कापूस तसाच त्या दातांमध्ये ठेवायचा आहे.

 

जर मित्रांनो तुमच्या वरील दातांमध्ये कीड आली असेल तर तुम्ही आपल दररोजचा जो दात घासण्यासाठी ब्रश वापरतात तो ब्रश घ्यायचा आहे आणि त्या मिश्रणामध्ये बुडवायचा आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला दातामध्ये कीड लागलेली आहे त्या दाताला तुम्ही मालिश करून घ्यायचे आहे आणि दोन तास तुम्हाला तसेच ठेवायचे आहे आणि नंतर तुम्ही चूळ भरू शकता.

 

मित्रांनो हा उपाय जर तुम्ही दोन ते तीन वेळा केला तर यामुळे तुमच्या दातातील कीड नक्कीच नाहीशी होईल. तर अशा पद्धतीने हे दोन घरगुती उपाय करून तुम्ही दाताचा जो काही त्रास आहे तसेच दातामधील कीड आहे ती नाहीशी करू शकता. तर असा हा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून पहा. यामुळे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

Leave a Reply

Your email address will not be published.