चेहऱ्यावरील नको असलेले केस १००% मुळापासून घालवा या घरगुती उपायाने …..!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, चेहऱ्यावरील अनावश्यक केसांमुळे संपूर्ण चेहऱ्याचा लुक बिघडतो. हे केस काढण्यासाठी काही जणी ब्युटी पार्लरमध्ये जाऊन भरपूर खर्च करतात. पण पार्लरमधील त्रासदायक ट्रीटमेंट करण्याऐवजी तुम्ही स्वयंपाकघरातील सामग्रींचा वापर करून चेहऱ्यावरील अनावश्यक केस कमी करू शकता. चेहऱ्यावरील केस दिसू नये, यासाठी काही जण ब्लीच सारख्या रासायनिक उत्पादनांचाही उपयोग करतात.पण चेहऱ्यासाठी हे हानिकारक प्रकार करण्याची काहीच आवश्यकता नाही. तुम्हाला तुमच्या घरामध्येच असणाऱ्या वस्तू आणि तसंच फ्रीजमध्ये यासाठी काही ना काही उपयोगी नैसर्गिक सामग्री सापडतीलच.

मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे यासाठी तुम्हाला जास्तीचा खर्च करावा लागणार नाही. तसंच घरगुती घरगुती आणि नैसर्गिक उपचारांमुळे त्वचेवर दुष्परिणाम देखील होणार नाहीत. तर मित्रांनो या संबंधित सर्वात पहिला उपाय करत असताना आपल्याला बेसन, हळद आणि कच्च दूध यांचा वापर करून हा उपाय करायचा आहे.

उपाय करत असताना एक चमचा आपल्याला बेसन पीठ एका वाटीमध्ये घ्यायच आहे आणि त्यानंतर एक चिमूटभर आपल्याला हळद घ्यायची आहे. मित्रांनो या उपायासाठी तुम्हाला शक्यतो आंबे हळदीचाच वापर करायचा आहे आणि जर तुम्हाला आंबेहळद मिळाली नाही तर अशावेळी घरामध्ये असणाऱ्या हळदीचाही वापर करू शकता. तर एक चमचा बेसन पीठ त्यामध्ये एक चिमूट हळद आणि त्यानंतर एक ते दीड चमचा कच्चे दूध तुम्हाला घ्यायचे आहे.

त्यानंतर याची एक व्यवस्थितपणे पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर ही पेस्ट आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मित्रांनो एक किमान अर्धा तासानंतर ज्यावेळी ही चेहऱ्यावर लावलेली पेस्ट चांगल्या पद्धतीने वाळेल.

त्यावेळी तुम्हाला तुमच्या बोटांच्या मदतीने गोलाकार पद्धतीने चेहऱ्यावर मालिश करून ती पेस्ट उतरवायचे आहे. मित्रांनो जेव्हा तुम्ही ही पेस्ट उतरायला सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर असणारे सर्व केस निघून जातील आणि त्यानंतर तुम्हाला थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे. मित्रांनो चेहऱ्यावरील नको असलेले केस घालवण्यासाठी हा अत्यंत फायदेशीर उपाय आहे.

त्यानंतर मित्रांनो दुसरा एक उपाय आपल्याला या समस्येसाठी करता येतो तो करत असताना मित्रांनो तुम्हाला सर्वात आधी दोन चमचे लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे साखर घ्यायचे आहे. हे दोन्ही पदार्थ एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याची एक व्यवस्थितपणे मिक्स करून त्याचे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे.

मित्रांनो साखर पूर्णपणे लिंबूच्या रस मध्ये विरघळेपर्यंत तुम्हाला हे मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायच आहे आणि साखर विरघळल्यानंतर तुम्हाला ही जी पेस्ट तयार झालेली आहे ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्याला लावायचे आहे. मित्रांनो पुन्हा तुम्ही दहा ते पंधरा मिनिटं ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवायची आहे आणि पूर्णपणे वाळल्यानंतर आपल्या हाताच्या साहाय्याने घासून आपल्याला ही पेस्ट उतरवायचे आहे.

मित्रांनो यामुळे चेहऱ्यावर असणारे नको असलेले केस निघून जाण्यास मदत होते आणि हाताने ही पेस्ट उतरल्यानंतर पुन्हा आपल्याला थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्यायचा आहे. आणि मित्रांनो तिसरा एक छोटासा उपाय आपल्याला आपल्या चेहऱ्यावर असणारे नकोसे केस घालवण्यासाठी करता येतो तो म्हणजे मेथी दाण्यास संबंधित.

मित्रांनो रात्रीच्या वेळी तुम्हाला एक ते दोन चमचा मेथी दाणे एका ग्लासमध्ये किंवा वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत आणि सकाळच्या वेळी जेव्हाही हे दाणे फुगतील म्हणजेच यामध्ये पाणी मुरेल तेव्हा तुम्हाला या मेथी दाण्याची पेस्ट तयार करून घ्यायचे आहे.

मित्रांनो ही पेस्ट आपल्याला थोडीशी घट्ट तयार करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चिमूटभर आंबेहळद किंवा रेगुलर हळद मिक्स करायचे आहे आणि त्यानंतर याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि ही पेस्ट आपल्याला संपूर्ण चेहऱ्यावर लावायचे आहे.

ही पेस्ट व्यवस्थितपणे वाळल्यानंतर तुम्ही हाताच्या साह्याने पेस्ट पुन्हा एकदा रगडून काढा आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. मित्रांनो या उपायामुळे ही तुमच्या चेहऱ्यावर असणारे नकोशी केस तुटून पडतील. तर मित्रांनो असे हे घरगुती काही उपाय जर आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा आपल्या घरामध्ये केले तर आपल्या या समस्येवर करून बघितले तर यामुळे नक्कीच आपल्या चेहऱ्यावर असणारे अतिरिक्त केस नक्की निघून जातील.

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.