मित्रांनो, आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे भक्त असतोच. अगदी मनोभावे आणि श्रद्धेने आपण प्रत्येक देवी देवतांची पूजा करीत असतो. परंतु मित्रांनो आपल्यातील आता बरेच जण हे स्वामी समर्थांचे भक्त आहेत. स्वामी आपल्या पाठीशी आहे ते आपल्या प्रत्येक अडचणीतून आपणाला बाहेर काढतील अशी भक्तांना खात्री असते. त्यामुळे भक्त हे स्वामींची अगदी मनोभावे व श्रद्धेने सेवा करीत असतात.
तर मित्रांनो बऱ्याच भक्तांना स्वामींचे अनुभव प्रचिती देखील आलेली आहे. तर मित्रांनो असाच एक अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो हा अनुभव आहे
नाशिक मधील नांदकने या गावातील सौ. अर्चना अरविंद लाटे यांचा आणि हा अनुभव आपण आज त्यांच्याच भाषेमध्ये जाणून घेणार आहोत.
नमस्कार मी अर्चना. स्वामींना वंदन करून माझा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. हा अनुभव मला चार वर्षांपूर्वी आला होता आणि माझा हा अनुभव मी सगळ्यांना सांगावं असं मला वाटत होतं आणि आज ती वेळ आलेली आहे. तर नाशिक मधल्या जवळच असलेल्या नांदीकने या गावांमध्ये मी राहते.
हा अनुभव आजही आठवला की अंगावर शहारे आणून देतो. नांदीकने या गावांमध्ये सर्वजण हे माळकरी होते आणि आमच्या घरातील ही सर्वजण माळकरी होते. नाशिक मधील त्र्यंबकेश्वर जवळ स्वामींचे गुरुपीठ स्वामींचा मठ अगदी जवळ होता. त्यामुळे आमचं स्वामींच्या या मठामध्ये सारखं जाणे येणे होत होतं.
माझ्या घरामध्ये दोन जाऊ, दिर, सासू-सासरे, दिरांची मुले आणि माझी दोन मुले असा कुटुंब होता. माझे मिस्टर शेतीच करायचे. परंतु स्वामींची कृपा आमच्यावर असल्यामुळे आमच्या शेतीमालाला चांगला भाव देखील मिळायचा आणि त्यामध्ये आम्हाला यश देखील मिळत राहायचं. आम्ही घरामध्ये स्वामींची मूर्ती देखील आणलेली होती.
त्या मूर्तींची आम्ही सर्वजण अगदी मनोभावे पूजा करीत होतो. जर गुरुवारी पंचामृताने अभिषेक करून संध्याकाळी आम्ही गोडधोड नैवेद्य देखील दाखवत होतो. तसेच ज्या काही स्वामींच्या सेवा आहेत या आम्ही सर्व जाऊ मिळून करत असायचो.
आम्ही आमची प्रत्येक सुखदुःख हे स्वामीपुढे व्यक्त करत होतो आणि स्वामी देखील आम्हाला प्रत्येक दुःखामध्ये, सुखामध्ये साथ दिली. म्हणजे एखाद्या आमच्या कुटुंबातील मोठ्या सदस्याप्रमाणे स्वामी आम्हाला होते.
ती मूर्ती नसून साक्षात स्वामीच आहेत असे आम्ही मनोमनच ठरवले होते. आमच्या इकडे त्र्यंबकेश्वरची वारी असते. या वारीमध्ये आमच्या गावातील तसेच आमच्या कुटुंबीयातील देखील सर्वजण पायी जात होते. वारी फक्त दोन दिवसांमध्ये आली होती. त्यामुळे आम्ही सर्वजण आमच्या बॅगा वगैरे भरत होतो. म्हणजे थोडेफा भरून झाल्या होत्या. आम्ही गुरुवारी स्वामींना पंचामृतने अभिषेक घातला सर्व सेवा केल्या. अभिषेक घातल्यानंतर ती स्वामींची मार्बल ची मूर्ती एकदमच हातातून खाली पडली आणि त्याचे तुकडे झाले.
त्या स्वामींच्या मूर्तींची तुकडे झाले त्यावेळेस माझे तर अंग कापतच राहिले. एवढे दिवस या मूर्तीची आपण सेवा केली पण आज एकदमच काय झाले हे कोणालाच कळेना. हा भयानक प्रसंग पाहिल्यानंतर सर्वच जन आमच्या घरातील घाबरले होते. आमच्या घरातील सगळेजण हे दोन दिवस अजिबातच जेवलेच नाहीत.
कारण कोणते तरी संकट येणार आहे हे मात्र आम्हाला जाणवत होते. पण नेमकं कोणते संकट येणार आहे हे मात्र आम्हाला माहिती नव्हतं. या धक्क्यातून आम्हाला सावरताच येत नव्हतं. मग यामुळे आम्ही त्र्यंबकेश्वरला पायी दिंडी जाणार होती त्या पायी दिंडीतून जाणे टाळलं. आम्ही पायी दिंडीतून गेलो नाही.
मग दोन दिवसानंतर ही पायी दिंडी सुरू झाली म्हणजे आमच्या गावातील भरपूर जण हे पायी दिंडीतून त्रंबकेश्वरला गेले. म्हणजेच आमच्या गावातून त्र्यंबकेश्वरचा प्रवासाला दोन दिवस लागत होते.
दोन दिवस पूर्ण होणार होते. तोपर्यंत आम्हाला कळालं की एका ट्रकने आमच्या गावातील काही लोकांना चिरडलं आहे. म्हणजे या पायी दिंडीचा अपघात झालेला आहे आणि त्यामध्ये कितीतरी लोक ही मरण पावलेली होती. याच लोकांमध्ये आम्हीही जाणार होतो.
ही बातमी टीव्हीवर तसेच पेपरामध्ये देखील आली होती. या पायी दिंडीतून आम्ही देखील सर्वजण जाणार होतो. परंतु स्वामींनी आम्हाला त्यातून वाचवलं. स्वामींनी संकट हे आपल्यावर घेतलं आणि आम्हाला जीवदान दिले. मला आज हे सांगताना खूपच रडू येतय. स्वामी मुळे माझा परिवार वाचला. स्वामी हे थोर आहेत.
तर स्वामींनी आम्हाला आलेले सर्व संकट दुःख आपल्यावर घेतलं आणि आम्हाला जीवदान दिले. तर असा हा माझा अनुभव. आजही हा अनुभव आठवला की माझ्या अंगावर शहारे येतात.
तर मित्रांनो असा हा अर्चनाताईंचा अनुभव आपल्या देखील शरीरावर शहारे आणण्यासारखा होता. त्यांना देखील स्वामींची प्रचिती आलेली आहे. स्वामी हे आपल्या पाठीशी आहेत आणि स्वामी हे प्रत्येक भक्ताला अडचणीतून बाहेर नक्कीच काढतात. हे आपल्याला या अनुभवातून समजलेच असेल.
मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित केलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या नवनवीन लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा. आणि शेअर करायला विसरू नका.