४ वर्ष्याच्या मुलीने अंगुठी गिळली आणि पुढे बघा स्वामींनी दाखवली लीला नागपूर मधील स्वामी समर्थ मठातील ताईंना आलेला थरारक स्वामी अनुभव !

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यातील बरेच जण स्वामी समर्थांची सेवा अगदी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करत असतात आणि त्याचबरोबर स्वामींचा नामजप स्वामींचे सारा अमृताचे पारायण आणि गुरुवारचे विशेष सेवा इत्यादी अनेक गोष्टी स्वामींचे सेवेमध्ये केले जातात आणि ही जी सेवा स्वामींची स्वामी भक्तांकडून स्वामी साठी केली जाते या चा आशीर्वाद म्हणून स्वामी आपल्या भक्तावर आलेल्या प्रत्येक संकटातून त्यांची सुटका करतात किंवा त्यांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा असतील तर त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करतात आणि त्यांची प्रत्येक संकटातून सुटका ही करत असतात अशा पद्धतीने स्वामी आपल्या भक्तांना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये येऊन मदत करत असतात.

आणि त्याचबरोबर मित्रांनो स्वामी सेवा केल्यामुळे स्वामींचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि स्वामी आपल्याला वेगवेगळे संघटन बाहेर काढतात हे आपल्याला वेगवेगळ्या स्वामी अनुभव आणि स्वामींच्या प्रचिती म्हणून कळून येतेच आणि आपण सध्या अनेक ठिकाणी असे स्वामी अनुभव स्वामींची प्रचिती ऐकत असतो मित्रांनो आज आपण नागपूरमधील एका ताईंचा असाच अत्यंत अनुभव पाहणार आहोत मित्रांनो या ताईंना आलेला स्वामींचा अनुभव हा खूपच थरारक होता. तर मित्रांनो आता हा त्या ताईंना आलेला अनुभव कोणता आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.

मित्रांनो हा अनुभव सविता वाघ नागपूरमधील एका ताईंना आलेला आहे आणि या ताई आपला अनुभव सांगत असताना म्हणतात की, नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सविता वाघ मी सध्या नागपूर येथे राहते आणि आमच्या घरामध्ये मी माझे पती आणि एक मुलगी असे आम्ही राहत होतो आणि तेव्हा माझी मुलगी चार वर्षाची होती आणि माझे मिस्टर एका कंपनीमध्ये जॉब करत होते आणि एके दिवशी ते सकाळी सर्व कामे आटवून त्यांच्या कामावर गेले आणि मीही घरामध्ये असणारे सर्व कामे करून घेतली आणि त्यानंतर मला सोनाराच्या दुकानांमध्ये जायचे होते त्यामुळे मीही माझे सकाळची कामे लवकर लवकर आवरून घेतली.

माझी सर्व कामे आवरल्यानंतर मी कपाट उघडले आणि त्यामधील जुन्या सोन्याच्या ज्या वस्तू होत्या त्या मोडीस घालून नवीन करून घेण्यासाठी सोनार कडे जाणार होते म्हणून त्या सर्व वस्तू मी काढून बाहेर ठेवल्या होत्या आणि त्यानंतर मी आवरण्यासाठी दुसऱ्या खोलीमध्ये गेले आणि तेव्हा माझी चार वर्षाची मुलगी तिथेच खेळत होती आणि अचानकच मला तिचा रडण्याचा आवाज आला आणि मी पळत पळत तिच्याजवळ आले तर तेव्हा ती खूप मोठ्याने रडत होती आणि तिचा आवाजही बसलेला होता आणि तिला मी विचारत होते की काय झाले त्यावर ती मला फक्त घशाकडे बोट करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती.

आणि त्यानंतर तिने ज्या ठिकाणी मी ते सोन्याच्या वस्तू ठेवल्या होत्या तिथे बोट केले आणि घशाकडे बोट केले त्यावरून मला असा अंदाज आला की तिने त्या सोन्याच्या ज्या वस्तू बाजूला ठेवल्या होत्या त्यामधील कोणतीतरी वस्तू तोंडामध्ये घातली असेल आणि ती अडकलेले असेल हे कळाल्यानंतर मी शेजारच्या मावशीला व त्यांच्या मुलाला बोलावून घेतले आणि त्यानंतर त्या मावशीचा जो मुलगा होता त्याने सर्वांना घेऊन दवाखान्यांमध्ये आलो आणि लगेच मी माझ्या मिस्टरांनाही कळवली आणि मिस्टर ही थोड्या वेळाने तिथे आले आणि त्यानंतर मी माझ्या आईला सुद्धा फोन केला.

त्यानंतर डॉक्टरांनी एक्स-रे व सोनोग्राफी केली आणि त्यावरून त्यांना असे कळाले की तिने एक अंगठी गेलेली होती आणि ती तिच्या गळ्याच्या खालच्या बाजूला अडकलेली होती यावर डॉक्टरांनी सांगितले की ही अंगठी घशाच्या खालच्या बाजूला अडकलेली आहे आणि ती कशीतरी करून ती पोटामध्ये खाली ढकलावी लागेल आणि त्यानंतर ऑपरेशन करून किंवा एक औषध देऊन आपण ती टॉयलेटच्या अवयवा द्वारे बाहेर काढू शकतो यावर आम्हाला खूपच भीती वाटायला सुरुवात झाली आणि त्यानंतर मला आईचा फोन आला की आईने तिकडे घरामध्ये स्वामींचे सारंमृत चे पारायण करायला सुरुवात केली आहे.

आणि त्यानंतर आम्हीही इथे स्वामींच्या नामाचा जप करत होतो आणि डॉक्टर तिकडे त्यांचे प्रयत्न सुद्धा करत होते थोड्या वेळानंतर डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले की ती अंगठी आता पोटामध्ये आलेले आहे आणि आता आम्ही तिला एक औषध देऊ आणि जर ते औषध पिल्यानंतर ती अंगठी टॉयलेटच्या वाटे बाहेर आली तर ठीक नाहीतर आपल्याला ऑपरेशन करावे लागेल आणि त्यानंतर स्वामींच्या कृपेमुळे ते औषध दिल्यानंतर ती अंगठी टॉयलेटच्या बाहेर आली, आणि त्या दिवशी साक्षात स्वामिनी आमची खूपच मदत केली होती आणि ज्या पद्धतीने आई स्वामींचे पारायण करायला बसली होती आणि आम्ही स्वामींच्या नामाचा जप करत होतो यामुळे स्वामी आमच्या मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी माझ्या मुलीचा जीव त्या दिवशी वाचवला. श्री स्वामी समर्थ!

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.