आम्ही स्वामी सेवा करताना आमच्या आईला आलेला हा स्वामी अनुभव वाचून नक्कीच अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे भक्त आहेत. आपली मनोभावे आणि श्रद्धेने आपण स्वामींची सेवा करण्यात मग्न असतो. स्वामी हे आपल्या प्रत्येक अडचणीतून संकटातून बाहेर काढतील असा प्रत्येक भक्ताचा विश्वास असतो. स्वामीदेखील प्रत्येक भक्ताच्या पाठीशी उभे राहतात. ते फक्त भक्तांनी केलेली सेवा पाहत असतात. तो फक्त मग गरीब असो वा श्रीमंत याकडे ते अजिबात लक्ष देत नाहीत. फक्त त्या भक्ताने केलेली सेवा ते बघत राहतात. तर स्वामींचे अनुभव हे बऱ्याच भक्तांना देखील आलेले आहेत. असाच एक अनुभव एक ताई आपणाला आज सांगणार आहेत. त्या ताईंच्या आईंना हा अनुभव आलेला आहे. हा अनुभव आपल्या अंगावर नक्कीच शहारे आणण्यासारखा असा आहे. चला तर मग ताईंच्या शब्दांमध्येच त्यांच्या आईला आलेल्या अनुभव जाणून घेऊयात.

नमस्कार मित्रांनो मी आज माझ्या आईला आलेला स्वामींचा अनुभव आज तुम्हाला सांगणार आहे. तसे तर माझी आई स्वामींची सेवा ही करतच होती. परंतु त्यावेळेस माझा भाऊ हा दवाखान्यामध्ये ऍडमिट होता. त्याची कंडीशन खूपच भयानक होती. म्हणजेच डॉक्टरांनी काहीही सांगता येत नाही असे देखील सांगितले होते. मग त्यावेळेस माझी आई खूपच टेन्शनमध्ये आलेली होती.

मग त्यावेळेस संगमनेर येथील प्रमोद सोनवणे यांच्याकडून मी आरोग्य सेवा जाणून घेतली आणि ही आरोग्य सेवा मी माझ्या आईला सांगितली. ती आरोग्य सेवा माझ्या आईने चालू केली माझ्या भावासाठी माझ्या आईने ही सेवा अगदी मनोभावे व श्रद्धेने करण्यास सुरुवात केली. तसेच स्वामींची सात पारायणे, तीन पारायणे तसेच स्वामींच्या सारामृता मधील चौदावा अध्याय देखील तिने वाचलेला होता. म्हणजेच तिला जसे जमेल तशी तिने स्वामींची सेवा देखील केली होती.

अगदी मनोभावे आणि श्रद्धेने ती सेवा करत होती. हे करत असताना तिला स्वामींचा एक अनुभव आला म्हणजेच एका गुरुवारी स्वामींची सेवा करीत असताना जो दिवा प्रज्वलित केला होता त्या दिव्याला चंद्रकोराचा आकार आलेला होता. म्हणजेच त्या काजविला चंद्रकोराचा आकार झालेला होता.

त्या चंद्रकोरेकडे निरखून पाहिलं तर स्वामींची प्रतिमा तयार झालेली दिसत होती. स्वामींच्या गळ्यामध्ये कंटाहार देखील दिसत होता. म्हणजेच स्वामींची प्रतिकृती त्या चंद्रकोरमध्ये झळकत होती. असा हा दृष्टांत माझ्या आईला गुरुवारच्या दिवशी स्वामिनी दिला. म्हणजेच आई स्वामी सेवा करत होती आरोग्यसेवा जी करत होती ती माझ्यापर्यंत पोहोचत आहे असा हा दृष्टांत स्वामींनी माझ्या आईला दिलेला होता.

स्वामींची जी टोपी घातलेली जी प्रतिमा आहे तशी प्रतिमा त्या दिव्याच्या काजवीमध्ये तयार झालेली होती. त्यावेळेस माझ्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि अगदी मनोभावे आईने नमस्कार केला. नंतर काही दिवसातच माझ्या भावाला डिस्चार्ज मिळाला. माझा भाऊ हा धोक्यातून बाहेर आलेला होता. त्याला डिस्चार्ज देखील डॉक्टरांनी दिला होता. असा हा अनुभव माझ्या आईला आला.

म्हणजेच स्वामी हे आपल्यात आहेत. जे आपण सेवा करतो हे स्वामी पाहत आहेत. म्हणजेच प्रत्येक संकटातून आपल्याला स्वामी नक्कीच बाहेर काढतात. परंतु अगदी मनोभावे कोणताही विचार मनात न आणता आपण स्वामींची सेवा करायला हवी.आपले जे संकट असतात हे स्वामींचे संकट होऊन जातात. त्यामुळे भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य देखील स्वामींनी आपल्या भक्तांसाठी सांगितलेले आहे. तर मित्रांनो तुम्ही देखील स्वामींची सेवा करीत असताना अगदी मनोभावे कोणतेही विचार डोक्यात न घेता करायला हवी.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.