रोजची देव पूजा कशी करावी??? पूजेचे दहा साधे सोपे नियम! देवपूजा करतेवेळी या चुका अजिबात करू नका ..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मा नुसार प्रत्येकाच्या घरामध्ये देवांचा देवारा हा असतोच. ज्यामध्ये आपण आपला आराध्यांना ज्याच्यावर आपल्या अत्यंत भक्ती आहे तसेच इतर देवांची ही पूजा करत असतो. हे देवपूजा करण्याचे काही नियम आहेत. त्या नियमानुसार जर आपण ही देवपूजा केली तर, नक्कीच आपल्याला त्या देवाचा आशीर्वाद प्राप्त होईल. आजच्या या लेखांमध्ये आपण देवपूजा कशी करावी? याबद्दलचे काही दहा साधे सोपे नियम आहेत तेच नियम आजच्या या लेखात मागून जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर पूजेमध्ये कोणता गोष्टी टाळाव्यात? याचे देखील माहिती आपण जाणून घेणार आहोत.

 

जर, आपण या दहा साध्या सोप्या नियमाचे पाहून करून दररोज नित्यनेमाने देवाची पूजा केली तर, आपल्या घरामध्ये धनाची बरकत होईल. पैसा अडका कधीच कमी पडणार नाही. आपल्या घरातील सर्व वाईट शक्ती निघून जाते. घरात सकारात्मक शक्तीचा प्रवेश होईल. त्याचबरोबर घरामध्ये सुख, समृद्धी, यश यामध्ये वाढ होईल.

 

घरामध्ये कशाचीही कमतरता पडणार नाही. घरात सर्व काही सोयी सुविधा उपलब्ध होतिल. आपल्यावर देवी देवतांचा आशीर्वाद राहील. देवाला हा कायम घराच्या ईशान्य दिशेला असावा. जर काही करणार असतो शक्य नसेल तर, हा देवारा पूर्व दिशेला असला तरी देखील चालू शकतो. पूर्व दिशेला जर काही कारणास्तव जागेच्या अभावी तुम्हाला देव्हारा बांधणी शक्य नसेल तर, उत्तर दिशेला देणारा बांधावे देखील शुभ मानले जाते.

 

पूजा संबंधीचा पहिला नियम म्हणजे देवपूजा करत असताना तुम्ही नेहमी आसनावर बसून पूजा करावे. देवाला हा इतकाही उंच असू नये की आपला हात तिथे पोहोचणार नाही. आपण उभा राहून किंवा खुर्चीत बसून कधीही देवपूजा करू नये आपली उंची देवारा पेक्षा कमी असावी. याची दक्षता घ्यावी.

 

दुसरा नियम म्हणजे देवपूजा करत असताना आपल्या कपाळावर तिलक लावावा. जर आपण हा तिलक लावला नाही तर, आपण केलेली पूजा ही देवाला मान्य नसते. जे कुंकू किंवा हळद तुम्ही तुम्हाला वापरता ते देवाला वापरू नये. देवाचे वेगळ्या असावे. त्याचबरोबर ज्या अक्षता तुम्ही देवाला मध्ये ठेवत असता त्यातील तांदूळ हे तुटलेले नसावे. ते नेहमी अखंड असावेत.

 

तिसरा नियम म्हणजे देवाला स्नान घालण्यासाठी जे आपण पाणी वापरतो ते नेहमी ताजे असावे. जर हे शक्य नसेल तर आपण जे पाणी भरून ठेवतो त्या पाण्यामध्ये तुळशी पत्र किंवा बेलपत्र ठेवावे आणि देवाला स्नान घालताना आपल्या हाताने पाणी घालू नये. तर कोणत्याही एका ग्लासमध्ये पाणी घ्यावे. देवांना आंघोळ घालावी. एक गोष्ट लक्षात ठेवा की, त्या पाण्याला आपला नखाचा स्पर्श होणार नाही.

 

चौथा नियम म्हणजे देवाला ठेवले जाणारे पाणीही कोणत्याही धातूच्या भांड्यात ठेवले तरी चालू शकते. मात्र काचेच्या भांड्यामध्ये कधीही ठेवू नये. पाचवा नियम म्हणजे देवासमोर लावला जाणारा दिवा हा रोज स्वच्छ करावा. त्याचबरोबर त्यात लावली जाणारी वात ही रोजच्या रोज बदलावी. एकदा लावलेली वात परत तीच लावू नये. रोज नवीन वात लावावे. तसेच दिवा ठेवताना तो प्रत्यक्ष जमिनीवर ठेवू नका. त्याखाली तांदूळ किंवा एखादे कापड ठेवा. मगच दिवा ठेवा. त्यानंतर दिवा लावून झाल्यानंतर या आपले हात धुले कधीही विसरू नका.

 

सहावा नियम म्हणजे एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये. यामुळे घरामध्ये अडचणी निर्माण होतात. त्याचबरोबर तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला लावावा तर तेलाचा दिवा हा देवांच्या डाव्या बाजूला लावा. सातवा नियम म्हणजे एकाच देवाचे तीन फोटो किंवा तीन मुर्त्या असू नयेत. त्याचबरोबर देवारा मध्ये पुजल्या जाणाऱ्या मुर्त्या ह्या जास्त मोठ्या असू नयेत.

 

आठवा नियम म्हणजे देवारांमध्ये दुखावलेली मूर्ती किंवा फोटो असू नये. त्याचबरोबर तुम्ही जी पूजा करत असताना ती मंत्रजाप केल्याशिवाय पूर्ण होत नाही. म्हणून तुम्हाला कोणता मंत्र येत नसेल तर ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा जप तर नक्कीच करा. पूजा करत असताना आपले मन हे पूजेमध्ये मग्न असले पाहिजे. मन विचलित होता कामा नये. शक्य असल्यास देवपूजा करत असतात मौन व्रत पाळावे.

 

देवाला जी आपण पुष्प वाहत असतो ते अंगठा, मध्यमा, अनामिका या तीन बोटांचा वापर करूनच वाहायचे आहे. देवाला कधीही सुकलेली फुले अर्पण करू नये. त्याचबरोबर दोन देवांच्या मध्ये एक इंचाचा तर अंतर ठेवावा. पुढचा नियम म्हणजे देवळामध्ये शंख ठेवत असताना तो प्रत्यक्ष जमिनीवर कधीही ठेवू नये. लाल कापड अंथरूण एखादा वाटीमध्ये शंख ठेवावा.

 

या शंका मध्ये पाणी भरून ठेवावे व दुसरा दिवशी ते पाणी आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडावे. देव्हाऱ्यातील अन्नपूर्णा ही नेहमी तांदळामध्ये ठेवावे. शेवटचा नियम म्हणजे ते पूजा झाल्यानंतर आरती करायलाच हवी. कारण त्याशिवाय देवपूजा ही मान्य नसते आणि आपणास शक्य असेल तसे नैवेद्य दाखवावे.

 

अशाप्रकारे या नियमांची पालन करून तुम्ही देखील देवपूजा करा. नक्कीच तुमच्या घरामध्ये कशाचीही कमतरता पडणार नाही. लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. घरामध्ये सुखं समृद्धी आणि ऐश्वर्य नांदेल.

Leave a Reply

Your email address will not be published.