गरीबी इतकी होती की, भिक मागून खायचो, झिरो मधून ऑफिसर पर्यंतचा पर्याय, शैलजा ताईंना आलेला अंगावर काटा आणणारा स्वामी अनुभव ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, स्वामींची विशेष सेवा आणि वर्षातून किमान एकदा तरी पारायण करतातच आणि मित्रांनो अशा पद्धतीने यावेळी अनेक स्वामी भक्त स्वामी समर्थ स्वामींची सेवा करतात तेव्हा स्वामी त्याचे फळ आपल्या भक्तांना देतच असतात. त्याचबरोबर स्वामी आपल्या भक्तांचे त्यांच्यावर आलेल्या प्रत्येक संकटातून संरक्षणही करत असतात आणि त्याचबरोबर स्वामींचा आशीर्वाद हा स्वामींच्या भक्ताच्या पाठीशी कायम असतोच. हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. मित्रांनो आज आपण असाच एक स्वामी अनुभव पाहणार आहोत. मित्रांनो आज आपण उज्जैन येथील शैलजा ताईंचा स्वामी अनुभव जाणून घेणार आहोत.

तर मित्रांनो शैलजा ताई यांना नेमका कोणता स्वामी अनुभव आलेला आहे आणि कशा पद्धतीने या ताईंनी स्वामींची सेवा करून आपले नशीबच बदललेले आहे हे आता आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो आपल्याला आलेला स्वामी अनुभव सांगताना शैलजाताई आपल्याला सांगतात की..

नमस्कार मी शैलजा. मी आणि माझा भाऊ आमचे आई-वडील असे चौघेजण आम्ही उज्जैन येथे राहत होतो आणि तिथे आमच्या घरची परिस्थिती वाईट होती आणि आम्ही एका चार बाय चार च्या खोलीमध्ये राहत होतो. आमचे वडील खूपच व्यसनाच्या आहारी गेलेले होते आणि ते कोणतेही काम करत नव्हते. त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी ही आमच्या आईवर आली.

आई घराजवळ असणाऱ्या मोठ्या घरांच्या मध्ये जाऊन दोन्ही मांडी करत होती आणि अशा पद्धतीने ती आमचे घर चालवत होती. तर अशा पद्धतीने खूपच वाईट दिवस आणि अत्यंत गरीबीचे दिवस आम्हाला लहानपणापासूनच भोगावे लागले होते.

घरची परिस्थिती अत्यंत वाईट असल्यामुळे मी आणि माझा भाऊ आणि दोघेही चौथीपर्यंत शिक्षण घेतले आणि तिथून पुढे शाळा सोडून देण्याचा निर्णय घेतला. परंतु आमची आई ज्या ठिकाणी कामाला जात होती. तिथल्या एका काकूंनी मला दहावीपर्यंत शिक्षण दिले. म्हणूनच त्यांच्याच या मदतीमुळे मी माझे दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि मला लहानपणापासून खूप शिक्षण घेऊन म्हणजेच शाळा शिकून मोठे होऊन एक ऑफिसर बनायचे स्वप्न होते आणि घरची परिस्थिती लवकरात लवकर कशी बदलता येईल. हे माझ्या डोक्यामध्ये वारंवार चालत असायचं.

दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर आमच्या शाळेमध्ये एक शिक्षक होते आणि त्यांना मी हुशार असल्याचं कळालं आणि म्हणूनच त्यांनी माझं पुढचं शिक्षण घेण्यासाठी मला मदत केली. पुढील शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांची सुरुवात करायला देखील सुरुवात केली.

परंतु अचानकपणे आईची तब्येत खूपच बिघडली. म्हणजेच आईला सुद्धा आजारपण झाले आणि अशावेळी मी आणि माझा भाऊ इतरत्र कुठेही मिळतील. ती कामे करून घर चालवत होतो आणि अनेक वेळा तरी आम्ही दुसऱ्यांकडे भीक मागून म्हणजे दुसऱ्यांकडे अन्न मागून आमचे दिवस पुढे ढकलत होतो. त्यानंतर पुढे आईचे आजारपण सुरू होते परंतु ती कामाला जातच होती.

आम्हीही सुट्टीच्या दिवशी आईला मदत करण्यासाठी जात होतो आणि अशा पद्धतीने आमचे हे दिवस सुरू होते मी स्पर्धा परीक्षा देतच होते. परंतु प्रत्येक परीक्षेमध्ये एक किंवा दोन आणि कित्येकदा तरी अर्धा मार्गाने माझे लिस्टमध्ये नाव आले नाही म्हणजेच मेरिट लिस्ट मध्ये माझे एक किंवा दोन गुण जाऊ नये माझे अधिकारी होण्याची स्वप्न खूप वेळा अपूर्णच राहत होते.

तीन ते चार वेळा मी स्पर्धा परीक्षेची परीक्षा दिली. परंतु प्रत्येक वेळी एक किंवा अर्धा किंवा दोन मार्गाने मी मेरिट लिस्ट मध्ये येत नव्हते. असंच एक दिवस आई कामाला गेली होती आणि मी घरामध्ये अभ्यास करत बसले होते. तेव्हा आमच्या घरामध्ये एक ब्राह्मण साधू आले आणि त्यांना मी भिक्षा दिली.

त्यानंतर ते मला म्हणाले की, बाळा तुझ्या कुंडलीमध्ये दोष आहे आणि तुझा आता वाईट काळ सुरू आहे. तुझ्या मागे साडेसाती लागलेली आहे .त्यामुळे तुझी कोणतीहीच कामे पूर्ण होणार नाही आणि त्याचबरोबर तुला तुझे ग्रह शांती घालावी लागेल आणि पूजा घालावी लागेल असे त्यांनी मला सांगितले.

त्यावर मी लगेच त्यांना विचारले की यासाठी किती खर्च येईल? तर त्यांनी त्यासाठी खूपच खर्च येईल असे सांगितले. त्यामुळे मी तो विषय तिथेच सोडून दिला आणि त्यानंतर पुढे माझा अभ्यास मी सुरूच ठेवला. पुन्हा दोन वेळा मी स्पर्धा परीक्षा दिली. परंतु त्यावेळी सुद्धा मला अपयशच आलं आणि याच निराशेने मी अभ्यास करत करतच दुसरीकडे जॉब करण्याचा निर्णय घेतला.

घराजवळच असणाऱ्या छोट्याशा कंपनीमध्ये मी जॉब करायला सुरुवात केली. अशा पद्धतीने तिथून मिळणाऱ्या थोड्या पैशामुळे आमचे घर कसेबसे चालत होते. एके दिवशी मी ऑफिसमध्ये माझ्या भविष्याबद्दलच विचार करत बसले होते. तेव्हा तिथे माझ्या ऑफिसमध्येच काम करणारी एक काकू जवळ आली आणि मला माझ्या टेन्शन बद्दल विचारल्यावर मी त्यांना माझ्या जीवनामध्ये जे काही सुरू आहे त्याबद्दल सांगितलं.

त्यानंतर त्या काकूंनी मला धीर दिला आणि त्या म्हणाल्या काळजी करू नकोस स्वामी सर्व ठीक करतील. यावर मी त्या काकूंना स्वामींबद्दल विचारले त्यांनी मला स्वामींच्या लिहिल्याबद्दल आणि स्वामींच्या सेवेबद्दल सर्व माहिती सांगितली.

त्यानंतर मला थोडा आधार वाटला म्हणून मी त्यांना स्वामींबद्दल सर्व विचारले. तेव्हा त्यांनी स्वामी सेवा स्वामींची अकरा गुरुवारचे व्रत या सर्वाबद्दल माहिती सांगितली आणि तेव्हा मी अकरा गुरुवारचे व्रत करण्याचा निर्णय घेतला. त्यावर त्यांनी मला आमच्या घराजवळ असणाऱ्या स्वामी केंद्रामध्ये नेले आणि तिथून स्वामी समर्थांची नित्यसेवा ही पोथी आणि इतर लागणारे सर्व साहित्य घेऊन दिले.

तिथून मी स्वामींच्या सेवेला सुरुवात केली. तिथून दररोज मी स्वामींचे सेवा करायला सुरुवात केली आणि गुरुवारच्या दिवशी स्वामी केंद्रामध्ये जाऊन त्याचबरोबर घरामध्ये स्वामींची विशेष सेवा देखील करायला सुरुवात केली आणि थोड्याच दिवसांमध्ये पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षांची प्रसिद्ध झाली.

तो पेपर गुरुवारच्या दिवशी होता. तर मी रोजच्याप्रमाणे स्वामींची विशेष सेवा गुरुवारची सेवा केली आणि त्यानंतर पेपरला गेले पेपर तर दरवेळी जातो तसा सोपाच गेला होता. त्यानंतर थोड्या दिवसांनी परीक्षेचा निकाल लागला आणि स्वामींच्या कृपेमुळे मी एमआयडीसी मध्ये एका मोठ्या पोस्टवर अधिकारी म्हणून माझी नेमणूक झाली.

तर अशा पद्धतीने स्वामींच्या अकरा गुरुवारच्या व्रतामुळे आणि स्वामींच्या सेवेमुळे स्वामींच्या आशीर्वादामुळे मला माझे स्वप्न पूर्ण करता आले आणि त्याचबरोबर यामुळे आता माझ्या घरची परिस्थिती सुद्धा सुधारली आहे. तर अशा पद्धतीने स्वामी मुळे माझे संपूर्ण जीवनच बदलून गेले. श्री स्वामी समर्थ!

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.