खरोखर वजन कमी करायचे आहे, पोटाची चरबी नाहीशी करायची आहे तर हा घरगुती आयुर्वेदिक उपाय करून पहा ८ दिवसातच फरक जाणवू लागेल …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो वजन वाढणे हा विषय खूप चर्चेचा झालेला आहे. आणि वाढलेले वजन कमी करण्यासाठी कोणकोणते उपाय करावेत, याचा विचार आपण सतत करत असतो. आज काल बऱ्याच लोकांमध्ये वजन वाढण्या बाबत काळजी दिसून येत आहे वजन वाढण्याचे कारण म्हणजे अनियमित जेवण, अनावश्यक आहार त्याचबरोबर धावपळीची जीवनशैली यामुळे आपल्या शरीरातील वजन वाढत असते. बदलत चाललेल्या जीवनशैलीमुळे माणसाच्या खाण्यापिण्यातही बदल होत आहेत. त्यामुळे पोषक आहार खाण्याकडे प्रत्येकांचे दुर्लक्ष होते वेळेअभावी जे काही खायला भेटेल ते खावे आणि आपल्या कामाला लागावे. अशी कामाची रूपरेषा ठरलेली आहे. परिणामी यामुळे वजन वाढते वजन वाढल्याने शरीराची सुंदरता तर कमी होते याशिवाय आपले शरीर म्हातारे देखील होते.

 

शरीरातील वाढलेले वजन जर कमी करायचे असेल तर आपल्याला योगा त्याचबरोबर व्यायाम आणि नियमित खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचे आहे. नियमित व्यायाम करणे हे आपल्या शरीराला सवय जर लावून घेतली तर याचे चांगले परिणाम आपल्याला दिसून येणार आहेत. आजच्या या लेखांमध्ये आपण शरीराचे वाढलेले वजन वाढलेले पोट तसेच शरीरावर अनेक ठिकाणी वाढलेली चरबी कमी करण्यासाठी कोणकोणते घरगुती आयुर्वेदिक उपाय करता येतात. याची माहिती आपण या लेखांमध्ये घेणार आहोत. हे उपाय केल्यामुळे नैसर्गिकरित्या आपल्या शरीराचे वाढलेले वजन कमी होणार आहे. शरीराचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आपल्याला जवस लागणार आहे. जवसामध्ये फॉलिक ऍसिड मोठ्या प्रमाणात असते यामुळे आपले वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

 

जवस खाल्ल्याने आपल्या शरीरातील वजन कमी होते. त्याचबरोबर भूक देखील कमी लागते. भूक भागवण्याचे काम जवस उत्तमरीत्या करत असते जवसाचा उपयोग फक्त वजन कमी करण्यासाठीच नव्हे तर केसांची मजबुती चेहऱ्यावरील तेज यासाठी देखील जवस खूप फायदेशीर आहे. त्यासोबतच आपल्याला ओवा देखील लागणार आहे. ओव्यामध्ये पचनशक्ती मोठ्या प्रमाणात असते. ओवा शरीरामध्ये उष्णता वाढवण्याचे काम करतो. शरीरातील उष्णता वाढल्यामुळे वजन वाढत नाही. आणि जो आपल्याला तिसरा घटक लागणार आहे. तो म्हणजे बडीशेप शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे काम बडीशोप उत्तमरित्या करते त्याचबरोबर अन्न पचन करण्यासाठी देखील बडीशेप उत्तमरीत्या कार्यरत आहे. आपल्या शरीरातील विषारी घटक काढून टाकण्याचे काम बडीशेप चांगल्या प्रकारे करते.

 

वरील तीन घटकाबरोबरच आपल्याला आणखीन एक घटक वजन कमी करण्यासाठी लागणार आहे. तो म्हणजे काळेजीरे आपल्याला घ्यायचे आहेत. जिरे शरीरातील मेट्याप्लेझम कमी करण्याचे काम करते. शरीरातील मेट्या प्लेझम कमी झाल्यावर आपले वजन कमी होण्यास मदत होते. जिऱ्याचा वापर आपल्याला यासाठी करायचा आहे. की आपण जे काही खाल्लेले आहे. त्याचे फॅट मध्ये रूपांतर न होऊन त्याची एनर्जी तयार व्हावी यासाठी आपल्याला जिरे खायचे आहेत. वरील लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे जवस ओवा बडीशोप तसेच काळे जिरे समप्रमाणात घ्यायचे आहेत. आणि बडीशोप सोडून तीनही घटक मंद आचेवर परतून घ्यायचे आहेत. जेणेकरून त्यातील ओलापणा नाहीसा होईल. त्यानंतर सर्व पदार्थ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहे.

 

वरील तयार केलेली पूड आपल्याला दररोज सकाळी अनुशापोटी एक ग्लास कोमट पाण्यातून घ्यायची आहे. नेहमी तीस दिवस जर आपण हा उपाय केला तर आपल्या शरीरावर अनावश्यक वाढलेली चरबी कमी होणार आहे. त्यासोबतच आपल्याला आपल्या खाण्यापिण्याकडे देखील थोडे लक्ष द्यावे लागणार आहे. म्हणजेच काय तर सकाळी उठल्यानंतर दोन ते तीन ग्लास कोमट पाणी आपल्याला प्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला आपण जे पेय वजन कमी करण्यासाठी तयार केलेले आहे, ते प्यायचे आहे. त्यामध्ये आपण लिंबू पिऊन चवीसाठी काळे मीठ किंवा सैंधव मीठ टाकून प्यायचे आहे. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये वाढलेली चरबी कमी होणार आहे. त्यासोबतच ज्या ज्या वेळी आपल्याला भूक लागेल त्या त्या वेळी एक ग्लास पाणी प्यायचं आहे.

 

पाणी पिऊन झाल्यानंतर पुन्हा जर अर्ध्या तासाने आपल्याला भूक लागली तर हलका आहार घ्यायचा आहे. वजन कमी करायचे असेल तर जेवण्या अगोदर अर्धा तास व जेवल्यानंतर अर्धा तासाने आपल्याला पाणी प्यायचे आहे. जर अधून मधून जेवताना पाणी लागत असेल तर पाण्याऐवजी आपण ताक किंवा दही याचा वापर करू शकतो जेवत असताना पाणी प्यायचे नाही. जेवण पूर्ण झाल्यानंतर अर्ध्या तासाने आपल्याला पाणी प्यायचे आहे. त्यासोबतच रात्री झोपण्याआधी एक तास आपल्याला पाणी प्यायचे आहे. असे केल्याने आपल्या शरीरावर अनावश्यक चरबी साठवून राहणार नाही त्यासोबत वजन देखील वाढणार नाही हा उपाय साधा आणि सोपा आहे. हा उपाय शरीरावर वाढलेली चरबी कमी होणार आहे.

 

मित्रांनो ही माहिती विविध स्त्रोतांचे आधारे एकत्रित केलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. अशाच प्रकारच्या आरोग्यविषयक लेखांची माहिती घेण्यासाठी आत्ताच आमच्या पेजला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.