एक आल्याचा तुकडा असा वापरा आणि बघा, वांग, काळे डाग, यांचा खात्मा फक्त तीन दिवसात तेही मुळापासून होईल? डॉ ; स्वागत तोडकर टिप्स …!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, सुंदर दिसावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळे अनेक प्रकारचे उपाय, क्रीम्स वापरणे भरपूर प्रमाणात वाढले आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला पाहिले असेल किंवा कदाचित तुम्ही स्वत: या गोष्टीचे बळी असाल. अनेक लोक चेहर्‍यावरील काळे डाग व वांग अशा गोष्टीमुळे त्रासलेले असतात. अत्यंत चांगले व्यक्तिमत्व, चेहरा सुद्धा आकर्षक अशा वेळी आपल्या चेहर्‍यावरील काळे डाग चांगले वाटत नसतील तर त्यात काहीही गैर नाही. कारण प्रत्येकालाच असे वाटत असते की आपण चांगले दिसावे. परंतु चेहऱ्यावर असणाऱ्या या डागामुळे आपला चेहरा विद्रूप दिसायला लागतो आणि कोणत्याही कार्यक्रमात जाण्यासाठी आपण घाबरतो.

 

आजकाल बाजारात अनेक क्रीम्स मिळतात. जे असा दावा करतात की, त्या तुम्हाला खूप सुंदर बनवू शकतात. पण जर तुम्ही त्या प्रॉडक्टमधील घटक चेक केले तर तुमच्या लक्षात येईल की, त्यात अनेक हानिकारक रसायने असतात. तात्पुरत्या काळासाठी जरी त्यांनी तुम्हाला सुंदर बनवले असेल तरी लांबचा विचार करता या गोष्टींनी तुमच्या सौंदर्याची हानीच होत असते. आज आपण अगदी घरगुती पद्धतीने पाहू की तुमचे सौंदर्य कसे वाढेल.

 

यासाठी तुम्हाला आले, मध, अल्मोंड तेल आणि कोरफड हवी आहे. कोरफड जर लावलेली असेल तर त्याचे पान चिरून त्यातला आतला गर घ्यावा. नसेल उपलब्ध होत तर तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीची फक्त कोरफड जेलसुद्धा वापरू शकता. नैसर्गिक फेस पॅक बनवण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी लागणार आहेत.

 

सगळ्यात आधी आल्याची साल काढून टाकावी. मग त्या आल्याला किसणीने किसून घ्यावे. जर किसणी नसेल तर आल्याचे छोटे छोटे तुकडे करून त्यांना मिक्सरमध्ये टाकून चांगली बारीक पेस्ट करून घ्यावी. साधारपणे आपल्याला ही दोन ते अडीच चमचे पेस्ट हवी आहे. या पेस्टला गाळणीने अथवा कापडाने गाळून त्यातून साधारपणे दोन चमचे रस आपल्याला घ्यायचा आहे. निघालेल्या रसामध्ये एक चमचा शुद्ध मध आणि नंतर दोन थेंब अल्मोंड ऑइल म्हणजेच बदाम तेल टाकावे.

 

बनवलेल्या या मिश्रणाला चांगल्या प्रकारे हलवावे आणि मग यामध्ये कोरपडीचा गर अथवा बाजारमधून तुम्ही आणलेले प्यूर कोरफड जेल टाकावे. बाजारात मिळणार्‍या कोणत्याही जेलपेक्षा कोरफडीचा काढलेला गर खूप जास्त परिणाम कारक आहे. एका अभ्यासानुसार कोरफडीचा हा गर त्वचेच्या सात लेयर्सला नरीश करतो. त्यामुळे तोंडाला हा गर लावलेला खूप चांगला आणि आल्हाददायक असतो. मिश्रण एकजीव होईपर्यंत हलवत राहावे.

 

एकदा मिश्रण तयार झाले की, ज्या ठिकाणी काळे डाग किंवा वांग आहेत तिथे हळुवारपणे या मिश्रणाने मसाज करावा. मसाज करताना हळुवारपणे गोलाकार घड्याळाच्या कट्याच्या विरुद्ध दिशेने हात फिरवत मसाज करावा. चेहर्‍यावर खालून वर अशी त्याची दिशा असावी. साधारणपणे दिवसातून दोन वेळा तुम्हाला असा मसाज करायचा आहे.

 

साधारणपणे मसाज झाल्यावर अर्ध्या तासाने गार पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा आणि कापडाच्या साह्याने कोरडा करावा. अनेकदा आपण चेहरा खूप जोरात पुसतो. त्यामुळे देखील चेहर्‍यावर ओरखडे पडण्याची शक्यता आसते. कापडाचा दाब देऊन चेहरा स्वच्छ करणे ही सर्वोत्तम चेहरा पुसण्याची पद्धत आहे. या पद्धतीचा नियमित वापर केल्यास तुम्हाला खूप जास्त फायदा होऊ शकतो.

 

तर मित्रांनो तुम्हाला देखील चेहऱ्यावर काळे डाग, वांग जर असतील तर त्यावेळेस तुम्ही अवश्य हा घरगुती उपाय करून पहा. तुमच्या चेहऱ्यावरील सर्व काळे डाग, वांग पूर्णपणे निघून जातील. तर हा उपाय नक्की करून बघा.

 

मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.