सात दिवसात स्वतःला पूर्णपणे बदला… या पाच टिप्सच्या मदतीने? 7 days challenge to cheng your life ..!!

Uncategorized

मित्रांनो, आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप काही साध्य करायचे असते. परंतु काही वेळा ते आपल्याकडून घडतच नाही. ते करण्यासाठी आपल्याला योग्य मार्गच मिळत नाही आणि स्वतःमध्ये असलेला वाईट सवयींमुळे आपण आपला जीवनामध्ये काही सुद्धा साध्य करू शकत नाही. आळस मुळे आपल्याला कामांमध्ये कोणता मार्ग योग्य किंवा कोणता मार्ग आयोग्य हे सुद्धा कळत नाही.

 

म्हणूनच आज आपण काही अशा पाच टिप्स पाहणार आहोत ज्या आपल्याला पूर्णपणे बदलवतील. ते पण फक्त सात दिवसात. जर आपण या पाच टिप्स दररोज सलग सात दिवस आपल्या वापरात आणल्या तर नक्कीच आपल्या संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. पूर्ण पणे बदलून जाईल. या पाच टिप्स कोणत्या आहेत? याची संपूर्ण माहिती आजच्या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत.

 

काही वेळेला असेच घडते की आपल्याला जे काही साध्य करायचे असते ते आपल्याला करणे होत नाही. त्या मागचे कारण म्हणजे आपल्यात असलेले वाईट सवय. आपण काही साध्य करू शकत नाही. यामुळे आपण स्वतःमध्ये हरवून जातो. आपल्याला खूप लो फील होते. आपला सेल्फ रिस्पेक्ट आपण गणवू लागतो. व इतरांमध्ये देखील आपल्याला कोणतेही स्थान मिळत नाही. अशा अनेक गोष्टी आपल्या सोबत होत असतात. म्हणूनच आज आपण स्वतःला बदलायचे कसे याबद्दलची पाच टिप्स आपण जाणून घेणार आहोत .

 

त्यातील पहिली टिप्स म्हणजे no phone no screen on mood. हे एक जर आपण केले तर पुढचे चार टिप्स आपल्या ला सहज करता येते. तुम्हाला तर माहीतच असेल की आपल्याकडे सकाळी उठल्या उठल्या आणि संध्याकाळी झोपताना जी गोष्ट हातामध्ये असते ती म्हणजे मोबाईल. आपण आपला दिवसातील बराचसा किमती वेळ हा मोबाईलची स्क्रीन बघण्यात वाया घालवत असतो आणि त्यामुळे आपल्याला आपल्या कोणत्याच कामामध्ये लक्ष लागत नाही. मनापासून करावेसे वाटत नाही. जर आपण या मोबाईलचा वापर कमी करून इतर गोष्टींमध्ये लक्ष द्यायला लागलो तर आपण खूप कॉन्फिडंट फील करू शकतो.

 

आपल्याला अनेक गोष्टी शक्य करता येतात. जीवनामध्ये आपण अनेक गोष्टी साध्य करू शकतो. मोबाईलचा वापर करावा परंतु तो गरजेपुरता करावा. गरज नसताना वेळ जात नाही म्हणून आपण मोबाईलचा वापर करू नये. त्यामुळे आपण आपला वेळ वाया घालवून आपल्याला वाईट सवयी लावून घेऊ शकतो. म्हणून पुढचा सात दिवसात या मोबाईलचा वापर लिमिटेड करा. जेणेकरून तुम्ही जीवनामध्ये कोणत्याही गोष्टी साध्य करू शकता व स्वतःला बदलू शकता.

 

दुसरी टिप्स म्हणजे practice no fap. प्रत्येक गोष्ट ही आपल्याला आपला कंट्रोलमध्ये असने खूप गरजेचे आहे. अनेक वेळा काही मुले फोनवर एखादी मॉडेल बघितली किंवा एखाद्या स्त्रीचे सौंदर्य बघितले की तिला भारावून जातात व आपले भान विसरून जातात. यामुळे ते चुकीच्या मार्गाला लागू शकतात. म्हणूनच आपला कंट्रोल आपला ताब्यात असणे खूप गरजेचे आहे.

 

आपण आपला कंट्रोल आपला ताब्यात ठेवला तर नक्कीच आपण इतर गोष्टी करण्यात आपला वेळ खर्च करू शकतो व आपल्या जीवनात आपण खूप काही साध्य करू शकतो. म्हणून सात दिवस आपल्याला कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ बघायचे नाहीत. की जेणेकरून आपण आपला कंट्रोल गमावू शकेल.

 

तिसरी टिप्स म्हणजे master your time. प्रत्येक जण म्हणत असतो ‘अरे नाही माझा टाईमच खराब झालेला आहे! त्यामुळे माझ्यावर ही वेळ आली!’ टाईम हा कधी खराब नसतो. तो प्रत्येकांसाठी समान असतो. त्यात वेळेचे आपण योग्य वापर करणे खूप गरजेचे आहे. जर आपण प्रत्येक दिवस आपल्याला त्या दिवशी काय काय करायचं आहे हे ठरून याप्रमाणे आपण काम करत गेलो तर नक्कीच आपण जीवनात खूप काही साध्य करू शकतो.

 

प्रत्येक गोष्टीला आपण योग्य वेळ दिला तर आपल्याला नक्कीच आपण स्वतः बदलू शकतो. म्हणून मनाचा ऐकण्यापेक्षा आपला डोक्यात आहे ते करणे कधीही चांगलं. प्रत्येक दिवसाचे वेळापत्रक बनवा की त्या दिवसांमध्ये आपल्याला काय काय करायचे आहे आणि किती वेळात करायचा आहे. जेणेकरून त्या दिवसातील सर्व कामे पूर्ण होतील व आपण आपला जीवनात नक्कीच बदलून जाऊ.

 

चौथी टीप म्हणजे don’t think just do. प्रत्येक व्यक्तीच्या मनात हे वाईट विचार येत असतात आणि ते वाईट विचार इतके येत असतात ते आपण त्यांचा विचार खूप करत असतो आणि त्यामुळे आपल्याला त्याच्या खूप त्रास होतो. एखादी गोष्ट जर आपण जितका वेळ पकडून ठेवू तितका वेळ ते आपल्याला त्रासदायक होत जाते. म्हणून कधीही कोणत्याही विचारांना जास्त वेळ किंवा त्याचा जास्त विचार करू नये.

 

कारण त्यामुळे आपण खूप डिफरन्समध्ये जाण्याची शक्यता असते. म्हणून असले विचार येऊ लागले तर ते विचार करण्याऐवजी आपण दुसरा कामांमध्ये आपला वेळ घालवावा आणि विचार करत बसण्यापेक्षा आपण कृती करण्यात आपला वेळ घालवावा. जेणेकरून आपण स्वतः खूप बदलून जाईल व आपण जीवनामध्ये खूप काही करू शकतो.

 

पाचवी टीप म्हणजे become thoughtless. जसा आपण चौथा टीप मध्ये पाहिले की आपण वाईट विचारांपासून दूर राहायचं आहे व विचार करण्यापेक्षा कृती करायची आहे. त्याप्रमाणे आपण हे करण्यासाठी विविध आसन करू शकतो. की ज्यामुळे आपल्या कोणत्याही वाईट विचार येणार नाही आणि वाईट विचार जर आपल्या मनामध्ये नाही आले तर नक्कीच आपण आपले विचारांमध्ये वेळ न घालवता कृतीमध्ये वेळ घालवण्यास समर्थ ठरू.

 

अशाप्रकारे हे काही टिप्स आहेत. जी आपल्याला 7 दिवसांमध्ये पूर्णपणे बदलून टाकतात. तुम्ही देखील नक्कीच फक्त साथ दिवस या टिप्स फॉलो करा. नक्कीच तुमच्या आयुष्य बदलून जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published.