या पाच प्रसंगी बोलू नका… फक्त शांत रहा तुमची किंमत बोलून कमी करू नका ?

Uncategorized

मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये अशा काही घटना होत असतात की ज्यामध्ये आपण काहीतरी बोलले तर ती घटना खूपच वाईट होऊन जाते आणि लोक आपल्याला बोलू लागतात, तो असेच का बोललास? तू हेच का बोललास! तुझ्यामुळेच हे झालं! आपल्याला काही घटनांमध्ये न बोललेलेच बरे असते. आजच्या लेखांमध्ये आपण काही अशाच प्रसंगांविषयी माहिती जाणून घेणार आहोत की असा कोणता प्रसंगांमध्ये आपण न बोललेले बरे असते. याची माहिती जाणून घेणार आहोत.

 

आपला नातेसंबंधांमध्ये किंवा आपला कुटुंबामध्ये किंवा आपल्या रिलेशनशिपमध्ये असे काही प्रसंग येतात की ज्यामध्ये खूप भांडणे होऊ लागतात आणि ती भांडणे इतकी मोठी होतात की त्यामध्ये कोणीही ऐकण्यास तयार नसते. अशा वेळी आपण न बोललेलेच बरे असते. कारण समोरचा व्यक्ती हा आपल्या ऐकून घेण्यास तयारच नसतो. तो आपलाच रागामध्ये असतो. आपण कितीही त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, समजावण्याचा प्रयत्न केला किंवा भांडण्याचा देखील प्रयत्न केला तरी तो आपला मुद्दा हा खरा यावर ठाम असतो. अशावेळी आपण न बोललेलेच बरे असत.

 

दुसरा प्रसंग म्हणजे कधी कधी काही गोष्टींमुळे आपल्याला समोरच्या व्यक्तींचा खूप राग येत असतो. आपण किती जरी कंट्रोल केलं तरी तो राग आपल्यामध्ये वाढतच जावे लागते आणि कारण नसताना आपण त्याच्याशी भांडू लागतो. आणि हे भांडण इतके होते की काही गोष्टी आपण त्याला असे बोलू लागतो की त्या भांडणाचा आणि त्या गोष्टीचा काहीही एक संबंध नसतो.

 

त्यामुळे आपल्याला जेव्हा केव्हा एखाद्या व्यक्तीवर राग खूप येऊ लागला तर आपण तो राग कमी करण्याचा प्रयत्न करावा व त्याला काहीही बोलू नये. अशा वेळी आपण न बोलणेच बरे असते. कारण यामुळे आपला नात्यांमध्ये फूट पडण्याचे शक्यता असते व नंतर आपण रागाच्या भरात जे काही बोलून जातो. त्याचा प्रस्तावा आपल्याला होऊ लागतो. म्हणून अशावेळी आपण काहीही बोलू नये.

 

तिसरा प्रसंग म्हणजे अशा ठिकाणी तुम्ही काहीच बोलू नये ज्या ठिकाणी तुमची किंमत केली जात नाही. तुम्हाला कोणताही प्रतिसाद दिला जात नाही. तुम्ही असल्याने किंवा नसल्याने तेथील व्यक्तींना काहीच फरक पडत नसेल. अशा ठिकाणी आपण काहीही बोलू नये. जर आपण अशा ठिकाणी बोलायला लागलो तर त्यामुळे आपण आपलीच किंमत अजून कमी करून घेत असतो. म्हणून अशा ठिकाणी आपण शांत रहाणे बरे असते.

 

चौथा प्रसंग म्हणजे आपल्या आजूबाजूला काही अशा व्यक्ती असतात की जे स्वतःला खूप ज्ञानी समजत असतात. ते इतरांचे बोलणे ऐकूनच घेत नसतात. ते स्वतःलाच खूप ज्ञान आहे असे समजत असतात. अशा व्यक्तींसोबत आपण काहीही बोलू नये. कारण जर आपण काही बोलण्यास गेलो तर ते आपल्या ऐकून घेण्यास काही एक ऐकत नसतात. ते आपल्याला जे वाटत असतं ते किती खराब आहे हेच सांगत असतात. व ते जे त्यांना वाटते तेच करत असतात. म्हणून आपण यांच्यापुढे आपले मत मांडून आपली व्हॅल्यू कमी करून घेऊ नये व आपण शांतच रहावे.

 

पाचवा प्रसंग म्हणजे आपला रिलेशनशिपमध्ये आपला पार्टनर व आपल्यामध्ये काही वेळेस काही गोष्टी बी नसलेल्या असतात की त्यामुळे आपल्यात भांडणे झालेल्या असतात किंवा त्याची चूक असते. काही वेळेला आपली चूक असते. अशा वेळेत जर आपण त्याच्यासोबत भांडायला गेलो तर तो आपल्या ऐकून घेण्यास तयारच नसतो. त्याने आधीच ठरवलेले असते की आपली काहीच चूक नाही. मी याचे काही ऐकून घेणार नाही. तर अशावेळी आपण काही बोलू नये. जर आपण बोलायला गेलो तर तो ऐकून तर घेणारच नाही. त्यावर तो खूप एडिटेड होईल व यामुळे आपला खूप भांडणे होण्याचे शक्यता होत असते. म्हणून अशावेळी आपण काहीच बोलू नये.

 

अशाप्रकारे हे काही पाच प्रसंग आहेत. त्यावेळी आपण काहीही बोलू नये. तेच आपल्यासाठी चांगले असते.

Leave a Reply

Your email address will not be published.