८ वर्षापासून काम करणाऱ्या या मुलाला सिंधुदुर्ग मध्ये विटांच्या ढीगखाली सापडली स्वामींची मूर्ती आणि पुढे या मुलासोबत जे घडलं ते वाचून अंगावर काटा येईल ..!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे भक्त सेवेकरी आहेत आणि प्रत्येक जण हे आपापल्या परीने स्वामींची सेवा करण्यामध्ये मग्न राहतात. म्हणजेच स्वामींच्या अनेक सेवा आहेत म्हणजेच प्रत्येक संकटांवरती अनेक वेगवेगळ्या सेवा आहेत. स्वामींचे अनेक अनुभव प्रचिती बऱ्याच जणांना आलेले आहेत. तर असाच आज आपण एक सिंधुदुर्ग मधील एका ताईंचा अनुभव पाहणार आहोत. या ताई सिंधुदुर्ग मध्ये राहतात आणि त्यांचे नाव जानकी आहे. तर आपण त्यांच्या शब्दांमध्ये त्यांना आलेला अनुभव जाणून घेऊयात.

 

नमस्कार मित्रांनो मी जानकी मी सिंधुदुर्ग मध्ये राहते. आम्ही वीट भट्टीमध्ये कामाला जात होतो. मी, माझे पती हे दोघे आम्ही दोघेजण वीटभट्टीमध्ये कामाला जात होतो. आमचे परिस्थिती खूपच हलाखीची ची होती. कारण माहेरी पण आमचे खूपच बिकट परिस्थिती होती आणि सासरी देखील खूपच बिकट परिस्थिती असल्यामुळे आम्ही दोघेजण वीट भट्टीला जात होतो.

 

माझे मिस्टर खूपच दारू प्यायचे आणि खूप पैसा देखील ते खर्च करीत होते. माझा मोठा मुलगा पहिलीत शिकत होता परंतु आर्थिक अडचणीमुळे त्याने देखील पहिलीतून शाळा सोडली आणि तो देखील आमच्याबरोबर वीट भट्टीमध्ये कामाला येऊ लागला. छोटा मुलगा मतिमंद असल्यामुळे त्याच्या दवाखान्यासाठी आमचा खूप सारा पैसा देखील खर्च होत होता. मी स्वामींवर पहिल्यापासूनच खूपच श्रद्धा ठेवत होते.

 

परंतु परिस्थितीमुळे मला स्वामींची सेवा करणे जमत नव्हते. तेव्हा विधिवतपणे कोणतीच पूजा वगैरे करणे जमत नव्हते त्यामुळे मी फक्त स्वामींना मनापासून दररोज नमस्कार करत असे. तर असेच एक दिवस आम्ही वीटभट्टीला कामाला गेलो होतो. मी, माझे पती आणि माझा मोठा मुलगा. त्यावेळेस अचानकपणे एका विटांच्या धिगाखली काहीतरी चमकत आहे असे माझ्या मोठ्या मुलाला दिसले आणि त्याने तिथे जाऊन पाहिले आणि ते ढीगऱ्याखालील वस्तू घेतली आणि ती चमकत होती.

 

नंतर ती वस्तू त्यांनी माझ्याजवळ आणून दिली. मी घरात येऊन ती तशीच माझ्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवली आणि त्याला झाकण लावलं. नंतर काही दोन दिवसांनी माझ्या मुलाच्या स्वप्नांमध्ये स्वामी आले आणि एकदमच माझ्या मोठ्या मुलाचा श्वास घेण्यास प्रॉब्लेम होऊ लागला आणि त्याला स्वप्नामध्ये दिसलं की स्वामी त्याला सांगताहेत की, मला असे कोंडून का ठेवले आहे? मला बाहेर काढा. असे माझ्या मुलाने त्याला पडलेले स्वप्न मला देखील सांगितले.

 

नंतर मी ती मूर्ती म्हणजे जी मी तांदळामध्ये वस्तू ठेवलेली होती ती वस्तू घेतली आणि माझ्या शेजारच्या बाईकडे गेले आणि त्यांना ती वस्तू दाखवली. त्यावेळेस ती बाई म्हणाली की तुम्ही कितीही पैसे घ्या परंतु मलाही मूर्ती द्या. ही मूर्ती स्वामींची आहे साक्षात स्वामी आहेत. त्यावेळेस मला कळाले की जी मी मूर्ती डब्यामध्ये ठेवलेली आहे ते आपले स्वामीच आहेत आणि त्यामुळेच माझ्या मोठ्या मुलाला स्वप्न मध्ये स्वामी सांगत होते की मला असे कोंडून का ठेवलेले आहे माझा जीव गुदमरतो आहे.

 

नंतर मग मी मूर्ती घरामध्ये आणून त्याची विधिवतपणे पूजा करू लागले. नंतर आमची हळूहळू दिवस बदलत गेले आणि वीट भट्टीमधून आणि एक दुकान छोटेसे टाकले. असे करत करत आम्ही दोन-तीन दुकाने टाकले. नंतर आता आमचे ५० लाखापर्यंतचे दुकान आहे सिंधुदुर्ग मध्ये आणि आमचे खूपच परिस्थिती व्यवस्थित आहे.

 

माझा छोटा मुलगा देखील बरा झालेला आहे. त्यामुळे आता आर्थिक अडचण कोणतीही नसून एकदम आमचा संसार खूपच सुखाचा चालू आहे. माझ्या पतीने देखील दारू पिणे सोडून दिले. तर असा हा स्वामींचा अनुभव मी कधीही न विसरणारे आहे आणि मी आजही न विसरता न चुकता स्वामींची पूजा सेवा करते.

Leave a Reply

Your email address will not be published.