रात्री भिजवून ठेवा आणि सकाळी प्या वजन इतके फास्ट कमी होईल की स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असा घरगुती उपाय ….!!

आरोग्य टिप्स

मित्रांनो, आजकाल प्रत्येकालाच वजन वाढण्याची समस्या खूपच सतावत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. वजन कमी करण्यासाठी प्रत्येक माणसाचे प्रयत्न सुरू असतात. म्हणजेच प्रत्येक जण हा डॉक्टरांचा सल्ला घेतो तर काहीजण मॉर्निंग वॉकचा देखील अवलंब करीत असतात. तसेच बरेच जण आपल्यापैकी डायट देखील करताना दिसत आहेत. तर या वजन वाढल्यामुळे आपणाला अनेक प्रकारच्या आजारांचा देखील सामना करावा लागू शकतो. अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या औषधे देखील डॉक्टर देत असतात तरी देखील आपले वजन हे कमी होत नाही. त्यामुळे आपण खूपच निराश होतो.

तर मित्रांनो तुमची देखील जर अतिरिक्त चरबी वाढलेली असेल तसेच जर तुमचे वजन वाढलेले असेल तर वजन कमी करण्यासाठीचा एक घरगुती उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. असे काही तुम्ही घरगुती उपाय जर केले तर यामुळे तुमचे वजन हे नक्कीच कमी होणार आहे. चला तर मग हा घरगुती उपाय नेमका कोणता आहे जाणून घेऊयात.

तर मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपणाला जो पदार्थ लागणार आहे तो आहे जिरे. जिरे हे आपल्या त्वचेसाठी, स्किन साठी तसेच केसांसाठी देखील खूपच फायदेशीर असते. जिऱ्या मध्ये विटामिन इ, विटामिन सी तसेच पोटॅशियम, कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न आढळतात आणि हे घटक आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरतात.

मित्रांनो आपल्या शरीरातील रक्ताची पातळी तसेच हिमोग्लोबिनचे प्रमाण देखील कमी असेल तर जिरे खूपच फायदेशीर ठरते. तसेच मित्रांनो आपले केसांपासून ते तळ पायापर्यंत जे काही फंगल इन्फेक्शन असेल याच्यापासून देखील जिरे सुटका आपली करतात. तर हे जिरे आपल्यासाठी खूपच फायदेशीर आहे.

तर मित्रांनो आपणाला या उपायासाठी दोन लिटर पाणी घेऊन ते गरम करायला ठेवायचे आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला दोन चमचे जिरे टाकायचे आहे. या पाण्यामध्ये एक छोटासा चमचा भरून आपल्याला दालचिनी पावडर टाकायची आहे. दालचिनी पावडर आपल्या शरीरावरील जी अतिरिक्त चरबी आहे ती चरबी घालवण्याचे काम करते.

तसेच वजन कमी करण्यासाठी देखील दालचिनी खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे एक छोटासा चमचा आपणाला दालचिनी पावडर त्यामुळे टाकायचे आहे आणि या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि झाकण लावून ते तसेच ठेवायचे आहे.

रात्रभर हे पाणी आपल्याला तसेच ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचे आहेत आणि जेव्हा कधी आपण दिवसभरात पाणी पिणार असेल त्यावेळेस आपल्याला हे पाणी प्यायचे आहे. तुम्ही जर ऑफिस करता बाहेर जाणार असाल तर त्यावेळेस तुम्ही हे पाणी एका थर्मास मध्ये भरून घेऊन जाऊ शकता.

पण दिवसभरात मित्रांनो तुम्ही ज्या वेळेस हे पाणी पिणार आहात त्यावेळेस तुम्ही थोडेफार कोमट करणे गरजेचे आहे.
तर मित्रांनो तुम्ही हे पाणी पंधरा दिवस पिले तर यामुळे तुमचे तीन ते चार किलो वजन नक्कीच कमी होईल. म्हणजेच तुम्हाला दोन लिटर पाणी दिवसभरात हे संपवायचे आहे.

यामुळे मित्रांनो खरंच नक्कीच तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. तर तुम्ही ज्या वेळेस दिवसभरात पाणी पिता तेव्हा तुम्हाला हे पाणी प्यायचे आहे. म्हणजेच तुम्ही सकाळी पासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही हे पाणी पिऊ शकता. यानंतर तुम्ही नॉर्मल पाणी थोडेसे कोमट करून पिले तरीही चालते.

जेव्हा तुम्ही हे पाणी रात्री तयार करता त्यावेळेस तुम्ही एका दिवसासाठीच फक्त पाणी तयार करून घ्यायचे आहे. दुसऱ्या दिवसासाठी परत दुसऱ्या दिवशी रात्री करून ठेवायचे आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही हा उपाय घरच्या घरी करू शकता.

या उपायाबरोबरच तुम्ही तेलकट, तुपकट पदार्थ अजिबात सेवन करू नका. तसेच आपल्या व्यायामाकडे देखील लक्ष द्या. यामुळे मित्रांनो तुमचे नक्कीच वजन कमी होईल. तर असा हा घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून पहा.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.