वास्तुशास्त्रानुसार घरात या दिशेला लावा घड्याळ नशिबाचे दार उघडेल, घरामध्ये पैश्यात होईल वाढ …!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो वास्तुशास्त्राचे खूप महत्त्व आहे जर दिशा चुकली तर पूर्ण घराला त्रास हा सहन करावा लागत असतो कारण जर आपण एखादी वस्तू जर चुकीच्या ठिकाणी ठेवली तर त्याचे अशूभ परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतात त्याचबरोबर मित्रांनो आज आपण घड्याळाच्या बाबतीमध्ये जाणून घेणार आहोत घड्याळ लावण्याची योग्य दिशा कोणती हे आज आपण जाणून घेणार आहोत घरामधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला आहे त्याजागेवरती ठेवायचे आहेत.

 

मित्रांनो घड्याळ हे आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं कार्य पार पाडत असते कारण आपल्याला कुठेतरी वेळेवर पोहोचायचं असेल तर आपल्याला घड्याळ हे आवश्यक लागत त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये घड्याळ असतेच आणि ते नेहमी योग्य दिशेला लावणे खूपच गरजेचे असते आणि आपलं जीवन देखील निश्चित वेळेमध्ये दिलेला आहे आणि आपल्या घरामध्ये लावलेल्या घड्याळा नुसार आपले जीवन चालत असतं. जर आपण घड्याळ नकारात्मक दिशेला लावले तर आपल्याला त्याचे वाईट परिणाम भोगायला लागणार आहेत.

 

अनेक जणांच्या जीवनामध्ये आपल्याला नेहमी दुर्भाग्यच पाहायला मिळत असतो कोणतीही काम ती व्यक्ती करायला गेली तरी त्या कामांमध्ये नेहमी अपयश प्राप्त होत असते कितीही मेहनत केली तरी हवा तेवढा पैसा प्राप्त होत नाही यालाच आपण दुर्भाग्य म्हणत असतो मित्रांनो तुमचे हे दुर्भाग्य तुमच्या घरातील घड्याळानुसार जोडलेले असते काहीजणांच्या आयुष्यामध्ये खूप अडथळे निर्माण होत असतात .

 

कुटुंबामध्ये भांडणे निर्माण होत असतात घरातील व्यक्ती एकमेकांशी वैरभावाने वागत असतात मित्रांनो याचा देखील संबंध चुकीच्या ठिकाणी लावलेल्या घड्याळामुळेच येत असतो मित्रांनो चला तर मग आता आपण जाणून घेऊया की वास्तुशास्त्रानुसार नेमके कोणत्या ठिकाणी आपण घेणार लावायचे आहे आणि घड्याळ संबंधाचे अत्यंत महत्त्वाचे नियम देखील आज आपण जाणून घेणार आहोत.

 

मित्रांनो सर्वात प्रथम येते ती म्हणजे दक्षिण दिशा दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा म्हणून ओळखली जाते दक्षिण दिशा ही मृत्यूची देवता यमराज यांची दिशा आहे म्हणून मित्रांनो आपण चुकूनही दक्षिण दिशेला घरामध्ये घड्याळ लावायचे नाही यामुळे आपल्या घरामध्ये यमदेवाचा प्रभाव वाढवू शकतो घरामध्ये अकस्मित मृत्यू देखील होत असतात. कारण ही मृत्यूची दिशा म्हणूनच ओळखले जाते.

 

आपण कितीही प्रगती केली तरी आपली प्रगती पुढे चालू राहत नाही व आपले नुकसानच खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आपल्या वाटचालीमध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतात कामांमध्ये खूप सारा अडचणी देखील निर्माण होत असतात. म्हणूनच प्रत्येक कामामध्ये अपयश प्राप्त होत असते दक्षिण दिशेला जर आपण घड्याळ लावले तर आपल्या घराची प्रगती पूर्णपणे थांबून जाते.

 

आपल्या घरातील जो करता व्यक्ती असतो ती स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे तरी कर्त्या व्यक्तीसाठी दक्षिण दिशेवरती लावलेले घड्याळ हे अत्यंत हानिकारक ठरू शकते याकरता व्यक्तीच आरोग्य वारंवार बिघडू शकते आणि म्हणूनच चुकूनही आपण दक्षिण दिशेला कधीही घड्याळ लावायचे नाही.

 

मित्रांनो दुसरी जी दिशा आहे ती म्हणजे पश्चिम दिशा मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार देखील असे सांगण्यात आले आहे की पश्चिम दिशेला देखील आपण घड्याळ लावणे अशुभ मानले जाते पश्चिम दिशा ही सूर्यास्ताची दिशा म्हणून ओळखली जाते ज्या दिशेला सूर्य मावळतो ती दिशा म्हणजे पश्चिम दिशा मित्रांनो सूर्य मावळणे म्हणजेच की त्या वेळेमध्ये सूर्य बुडत असतो आणि त्याच प्रमाणे जर आपण पश्चिम दिशेला घड्याळ लावले तर त्यामुळे आपला काळ आपली वेळ बिघडू शकते.

 

वैवाहिक जीवनामध्ये देखील अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ शकतात मित्रांनो पश्चिम दिशा ही काळाची दिशा म्हणून ओळखली जाते म्हणूनच या दिशेला आपण चुकूनही घड्याळ लावायचे नाही काही जणांच्या घरांमध्ये तर बंद पडलेली घड्याळ असतात एकापेक्षा जास्त घड्याळ घरामध्ये असतात घड्याळ हे चालू स्थितीमध्येच ठेवायचे आहे बंद पडलेले घड्याळ आपल्याला तुरंत रिपेअर तर करायचा आहे.

 

नाहीतर घराबाहेर तरी काढायचे आहे घरामध्ये जितकी घड्याळे आहेत ते सर्व चालू असलेलेच ठेवायचे आहेत आणि एक सारखी वेळ दर्शवणारी असायला पाहिजे एक घड्याळ पुढे तर दुसरी घड्याळ पाठीमागे असे कधीही लावायचे नाही जर असं करत असाल तर तुमच्या कुटुंबामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रेस वाढणार आहे ताणतणाव वाढणार आहे. यामुळे घरामध्ये नकारात्मक गोष्टी वाढू लागतात.

 

मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाच्या पाठीमागे देखील आपण घड्याळ लावायचे नाही हा दरवाजा आपण नेहमी उघडत असतो आणि बंद करत असतो आणि जी वस्तू नेहमी चालू किंवा बंद होत असते अशा वस्तूंच्या पाठीमागे घड्याळ लावल्याने आपल्या प्रगतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चढ उतार निर्माण होत असतात परिणामी कुटुंबातील सदस्यांचे मानसिक स्वास्थ देखील बिघडू लागतो.

Leave a Reply

Your email address will not be published.