मित्रांनो, प्रत्येकाला सुंदर दिसणे आवडते. आपले सुंदर दिसावे यासाठी प्रत्येक जण काही ना काही उपाय काही क्रीम्सचा वापर करीत असतात. तसेच डॉक्टरांचा सल्ला देखील घेत असतात. परंतु कितीही उपाय करून देखील आपल्या चेहऱ्यावर जर वांग, काळे डाग दिसत असतील तर आपणाला आपला चेहरा विद्रूप वाटायला लागतो. त्यामुळे आपण कोणत्याही कार्यक्रमास जाणे टाळत असतो. आपल्या चेहऱ्यावर काळे डाग असतील किंवा वांग असतील तर ह्यावर आजच्या लेखात आपण एक आयुर्वेदिक उपाय पाहणार आहोत जो कि कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट नसणारा आहे. घरगुती उपाय आहे ह्यासाठी लागणार आहेत आपल्याला घरातीलच सहज उपलब्ध होणाऱ्या ३ वस्तू. त्या वस्तू कोणत्या आहेत आणि त्याचा वापर कसा करायचा ते आपण आज जाणून घेऊयात.
मित्रांनी लेझर ट्रीटमेंट घेऊन सुद्धा चेहऱ्यावरचे काळे डाग जात नाहीत. या उपायाने आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग, वांग हे पूर्णपणे निघून जातील. आपला चेहरा उजळेल. यासाठी आपणाला कोणताही खर्चही करावा लागणार नाही. घरच्या घरी करता येणारा हा स्वागत तोडकर यांचा आयुर्वेदिक उपाय तुम्ही नक्की करून पहा.
मित्रांनो काळे डाग येतात का कारण कि आपल्या शरीरातील हार्मोन्सच संतुलन योग्य प्रकारे नसते. आणखी करणे देखील असतात जसे कि फँगल संक्रमण असेल, गर्भावस्था असेल किंवा उन्हात जास्त काळ फिरणे, चेहऱ्यवार पिंपल्स येणे, विशिष्ट वयात पीपल्स आल्यनंतर ते फोडणे त्यानंतर असे काळे डाग राहतात.
असे काळे डाग आपल्या सौंदर्यात बाधा निर्माण करते. आणि मित्रांनो कोणाला सुंदर चेहरा नको आहे. हा उपाय नक्की करा तुमच्या चेहऱ्यावरील सर्व डाग निघून जातील. सर्व वांग निघून जातील. तसेच चेहरा तजेलदार व मुलायम होईल.
मित्रांनो आपण या उपायासाठी पहिला पदार्थ वापरणार आहोत तो म्हणजे हळद. कारण यात अँटिऑक्सिजन, अँटीबॅक्टरीअल प्रॉपर्टीस आहेत. ह्याचे सर्व गुणधर्म आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहेत. हळद आपण आरोग्याच्या इतर समस्यांसाठी वापरत असतो ह्या उपायासाठी देखील आपण हळद वापरणार आहोत.
मित्रांनो दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे बेसन पीठ. यामध्ये देखील व्हिटॅमिन बी, बी ६, पोटॅशिअम, आयर्न, कॅलसिम, झिंक इत्यादी घटक असतात जे आपल्या त्वचेच्या आरोग्यसाठी फायदेशीर ठरतात.
मित्रांनो यानंतर आपण तिसरा पदार्थ आपण वापरणार आहोत ते म्हणजे अर्धा चमचा लिंबाचा रस. लिंबू त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. व्हिटॅमिनसि जे कि आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असते. त्वचेमध्ये कोलॅजिन नावाचा घटक जो आहे तो निर्माण करण्यास मदत करत असते. यात अँटिऑक्सिडेन्ट गुणधर्म असतो.
मित्रांनो एक बाउल घ्या. यात आपण २ चमचे बेसन पीठ घ्यायच आहे. त्यानंतर यात एक चमचा हळद घ्यालायची आहे. सर्वात शेवटी अर्धा चमचा लिंबाचा रस घाला. सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. मिश्रण कोरडे वाटत असेल तर थोडेसे जास्त लिंबू घेतले तरी चालते.
मित्रांनो हि मिश्रण जी पेस्ट तयार झालेली आहे ती आपण आपल्या चेहऱ्यावर ज्या ठिकाणी वांग किंवा काळे डाग आहेत त्या ठिकाणी लावायची आहे. मात्र एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण चेहऱ्यावर हि पेस्ट लावण्याआधी आपला चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे व नंतर हि पेस्ट लावायची आहे. हि पेस्ट लावताना बोटांच्या सहाय्याने सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करत लावायची आहे. थोड्या वेळाने आपण ती काढून टाकायची आहे व चेहरा स्वच्छ धुवायचा आहे.
मित्रांनो हा उपाय आपण सलग एक आठवडा करा तुम्हाला नक्की फरक दिसून येईल तुमच्या चेहऱयावरील सर्व डाग निघून जातील चेहरा मऊ तजेलदार दिसेल.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.