फक्त एक चमचा कॉफी अशी वापरा आणि चेहरा गोरा करा आणि पहा तुमच्या सौंदर्या पुढे चंद्रही फिका पडेल ? डॉ ; स्वागत तोडकर यांचा खास घरगुती आयुर्वेदिक उपाय

आरोग्य टिप्स

मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला सुंदर दिसावे असे वाटते. बऱ्याच स्त्रिया आणि पुरुष पार्लर मध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करतात. परंतु प्रत्येकालाच असे पैसे खर्च करणे शक्य नसते किंवा एखाद्या वेळेस पैसे असूनही पार्लरमध्ये वेळेअभावी जाता येत नाही. पार्लरमध्ये जाऊन बऱ्याच प्रकारच्या 1 ट्रीटमेंट घेतात आणि चेहरा सुंदर गोरा मुलायम करण्याचा प्रयत्न करतात. यासाठी मित्रांनो खिसा मात्र रिकामा करावा लागतो. परंतु आज आम्ही घरीच करता येणारा साधा सोपा उपाय सांगणार आहोत या उपायाने तुमचा चेहरा सुंदर, मुलायम, गोरा आणि सतेज दिसेल. चारचौघात तुम्ही उठून दिसाल. यासाठी हजारो रुपये खर्च करण्याची अजिबात आवश्यकता नाही.

मैत्रिणींनो आम्ही जो फेशियल पॅक सांगणार आहोत तो चेहऱ्यासाठी खास असून यामुळे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग धब्बे, वांगाचे डाग हे सर्व कमी होणार आहे आणि हा जो फेशियल पॅक आहे महिलांसाठी एकदम इफेक्टिव आहे. पण पुरुशानही तेवढ्याच प्रमाणात फायदेशीर ठरतो. त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे हा फेशियल पॅक ब्युटी पार्लर प्रमाणे थ्री स्टेप आहे.

मैत्रिणींनो आपल्या स्पेशल पॅक मधली पहिली स्टेप आहे क्लींजिंग. क्लींजिंग म्हणजे चेहरा स्वच्छ करणे. कारण चेहऱ्यावरती कुठलाही मेकअप लावायचा असेल तर त्या अगोदर चेहरा स्वच्छ करणे गरजेचे असते.

चेहरा स्वच्छ करण्यासाठी आपल्याला कॉफी आणि दुध लागणार आहे. एका बाऊलमधे एक चमचा कॉफी घ्या आणि त्यात दोन चमचे दूध घाला. दोन्ही पदार्थ चमच्याने एकजीव करून घ्या. हा झाला चेहरा स्वच्छ करणाऱा क्लींजिंग पॅक. तयार झालेला क्लींजिंग पॅक चेहर्‍यावर चोळून चोळून लावा. हा पॅक आपल्या पूर्ण चेहऱ्यावरती सर्क्युलार मोशन मध्ये एक ते दोन मिनिट हळुवारपणे मसाज करून लावायचा आहे. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे. क्लींजिंग ही आपल्या फेशियल मधली महत्वाची स्टेप असून यामुळे चेह-यावरील धूळ, माती प्रदूषण सर्व निघून जाते आणि चेहरा नितळ चमकदार होतो.

मित्रांनो या उउपायासाठी तुम्ही कॉफी कोणत्याही ब्रँडची वापरू शकता. कॉफीमध्ये अँटिऑक्सिडंट असतात आणि त्यामुळे चेहऱ्यावरील रक्तप्रवाह वाढतो. चेहरा नितळ व गोरा स्वच्छ होतो. चेहऱ्यावरील वांगाचे डाग, काळे धब्बे निघून जाण्यासाठी कॉफी जादूई काम करते.

यानंतर दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला एक चमचा कॉफी, कोरफड जेल किंवा गर दोन चमचे आणि चिमूटभर हळद या गोष्टी सांगितलेल्या प्रमाणात एका बाऊलमध्ये घ्या आणि चमच्याने एकजीव करून घ्या. हा तयार झालेला मसाज पॅक आपल्या संपूर्ण चेहर्‍यावर आपल्याला सर्क्युलर मोशन मध्ये साधारणत दहा मिनिट मसाज करायचे आहे. यामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळे, पिंपल्स, काळे डाग निघून जाण्यास मदत होणार आहे. चेहरा तेजस्वी दिसू लागेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की, चेहऱ्याला जोरात घासायचं नाही म्हणजे रगडायचं नाही. तर हळुवार मसाज करायचा आहे. दहा मिनिटे मसाज केल्यानंतर मात्र आपला चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे. आपला चेहरा स्वच्छ होईल.

आता सर्वात महत्त्वाचे आणि तिसरी स्टेप फेसपॅक कसा तयार करायचा ? हा फेसपॅक सर्वांसाठी सोपा आणि कमी किंमतीत होणार आहे. यासाठी आपल्याला कॉफी, बेसन पीठ, दही, बटाट्याचा रस लागणार आहे.

मित्रांनो एका बाऊल मध्ये तीन चमचे कॉफी आणि दोन चमचे बेसन पीठ घ्या. यानंतर यात एक चमचा दही आणि चिमुट्भर हळद टाकायची आहे. पुढचा घटक म्हणजे बटाट्याचा रस टाकायचा आहे. बटाट्याचा रस त्वचा मुलायम बनवतो. त्याचप्रमाणे सुरकुत्या कमी करतो व चेहऱ्यावर एक प्रकारचा ग्लो येण्यासाठी मदत करतो. हे चारही पदार्थ एकजीव करा चांगले मिक्स करून घ्या आणि मिक्स केल्यानंतर फेसपॅक तयार होईल.

मित्रांनो तयार झालेला हा फेसपॅक चेहऱ्यावर सर्क्युलर मोशन मध्ये हळुवार लावुन घ्यायचा आहे आणि अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे. यानंतर कुठलीही क्रीम लावायची नाही किंवा कुठल्याही प्रकारचं मॉईश्चरायझर लावायचा नाही. आम्ही सांगितल्याप्रमाणे हा फेसपॅक आठवड्यातून एक दिवस चेहऱ्यासाठी वापरला तर तुमचा चेहरा उजळ, गोरा होईल. त्याचप्रमाणे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग धब्बे, वांगाचे डाग कमी होतील. याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही.

आम्ही सांगितल्याप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीस तिन्ही स्टेप करणे शक्य नाही तर यातील सर्वात शेवटची स्टेप त्यांनी करायची आहे. ही तिसरी स्टेप जरी केली तरी तुमचा चेहरा सतेज नितळ गोरा आणि चमकदार दिसेल.

वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.