महिन्यात फक्त दोन वेळा तुळशीला अर्पण करा ही एक वस्तू ; घरामध्ये येत राहील धन, दौलत, संपत्ती, आणि पैसाच पैसा ….!!

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, हिंदू धर्मात तुळशीचे खूप महत्व आहे तुळशीला आपण देवी मानतो. श्रीहरी विष्णू यांना तुळस अतिप्रिय आहे तुळस अर्पण न केल्यास त्यांचे पूजन अपूर्ण मानले जाते. तसेच श्रीहरी विष्णूंना नैवेद्य अर्पण करतानाही सर्वात आधी तुळशीचे पान त्या नैवेद्यात टाकले जाते. तुळस मातेच्या दर्शनाने आपली सर्व पापे आणि दोष नष्ट होतात. रोज सकाळी तुळशीचे पूजन करून पाणी अर्पण करावे व संध्याकाळी तुळशीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी व सकारात्मक ऊर्जा येते. दाराच्या दोन्ही बाजूला तुळशीची रोपे लावल्यास आपल्या घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.

घरातील सकारात्मक ऊर्जेमुळे श्रीहरी विष्णू व देवी लक्ष्मी घरात स्थायी रुपात वास करतात. जर मुले हट्टीपणा करत असतील, आपले म्हणने ऐकत नसतील तर घराच्या पूर्व दिशेला तुळस लावावी व त्या तुळशीचे पूजन मुलांना करायला सांगावे. तुळशीसमोर मुलांना दिवा लावायला सांगावे यामुळे मुले तुमचे म्हणणे ऐकू लागतील. रोज दोन तीन तुळशीचे पाने मुलांना खाऊ घातल्याने त्यांचे मन शांत होते व स्वभावही बदलतो आणि सोबतच त्यांचे मन एकाग्र होऊन अभ्यासात लक्ष लागते. पूर्वीच्या वेळेस सर्वांच्या घरात तुळस असायची. पण आता फ्लॅट मुले हे शक्य नाही तरीही फ्लॅटमध्ये, बाल्कनी मध्ये किंवा शक्य त्या ठिकाणी तुळस नक्की असावी. ज्यांच्या घरात तुळस असते त्यांच्या घरात समृद्धी नांदते.

ज्यांच्या घरातील तुळस हिरवीगार,व टवटवीत असते त्यांनाही सुखसमृद्धी व घरात नेहमी भरभराट असते. अशा घरांवर नेहमी श्रीहरी विष्णू व देवी लक्ष्मीची कृपा बरसत असते. तर आपण आज असा उपाय बघणार आहोत. ज्यामुळे साक्षात देवी लक्ष्मीची व श्रीहरी विष्णूची कृपा आपल्यावर असते. जर आपल्या घरात काही संकटे असतील ,नेहमी वाद होत असतील,काही बाधा असतील तर हा उपाय करा हा उपाय तुम्हाला महिन्यातून फक्त दोन वेळा करायचा आहे. उपाय अगदी साधा व सरळ आहे. पण मनोभावे व श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय आपल्याला एकादशीच्या दिवशी करायचा आहे.

प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात एक शुक्लपक्षात आणि दुसरी कृष्णपक्षात. बहुतेक व्यक्तींचा या दिवशी उपवास असतो. एकादशीचे व्रत असतील तर खूपच चांगले. पण व्रत नसले तरीही आपण हा उपाय करू शकतो. परंतु एकादशीच्या दिवशी सात्विक भोजन करावे. संध्याकाळी तुळशीचे पूजन करून तुळशीसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. मित्रांनो एकादशीच्या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये. चला तर आता आपण जाणून घेऊया की, एकादशीच्या दिवशी तुळशीचे पूजन कसे करावे ते. तुळसमातेसमोर सर्वात आधी शुद्ध तुपाचा दिवा लावावा त्यानंतर पूजनाचा आरंभ करावा.

मित्रांनो तुळस मातेला लाल रंगाचे फुल अर्पण करावे. गुलाबाचे फुल असेल तर अधिक चांगले असते. देवीला लाल व पिवळ्या रंगाचे फुल अतिप्रिय आहे. त्यामुळे दोन्ही फुले असतील तर दोन्ही अर्पण करावीत. आणि सौभाग्याचे दागिने अर्पण करावे. पूजन करत असताना ओम नमो भागवते वासू देवाय नमः तसेच ओम तुलसीदेवाय नमः याचे उच्चारन करावे. लाल रंगाचे ओढणी देवीला अर्पण करावी. मनोभावे देवीला नमस्कार करावा. पूजन करताना आपली जी काही मनोकामना किंवा इच्छा असेल ते देविमातेला सांगावे. व ती पूर्ण करण्यासाठी देवीमातेकडे विनंती करायची आहे.

आपण देवी मातेचे पूजन करताना जी काही इच्छा, अपेक्षा करतो ती नक्की पूर्ण होते. कारण श्रीहरी विष्णूंना तुळस अति प्रिय आहे. आपण जी काही मनोकामना तुळशीला करतो ती मनोकामना तुळस श्रीहरी विष्णू पर्यंत पोहचवते व श्रीहरी विष्णू ती इच्चा लवकरात लवकर पूर्ण करतात. म्हणून तुळस मातेची पूजा करताना आपली जी काही अडचण किंवा इच्चा असेल ती व्यक्त करावी. त्यानंतर तुळसमातेला पांढरी मिठाई किंवा दुधात साखर टाकून तो नैवेद्य अर्पण करावा. मग तुळशी मातेचे पूजन करावे व तेथेच बसून ओम तुळशीमातेय नमः या मंत्राचा १०८ वेळा म्हणजेच १ माळ जप करावा.

तसेच ओम नमो भागवते वासू देवाय नमः या मंत्राचा सुद्धा १०८ वेळा जप करावा. व त्यानंतर तुळस मातेला ११ प्रदक्षिणा घालाव्या व श्रीहरी विष्णू व देवी लक्ष्मीला नमस्कार करावा. आपण जे सौभाग्य अलंकार म्हणजेच जोडवी, लाल बांगड्या,साडी ,लिपस्टिक अर्पण केले आहे ते सर्व रात्रभर तसेच तुळशीसमोर राहू द्यावे. दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ करून ते सर्व वस्तू एखाद्या गरीब किंवा गरजू स्त्री ला देऊन टाकाव्या. म्हणजे ती स्त्री त्या वस्तू वापरेल. शक्यतो कोणालाही कोणतीही वस्तू देताना त्या व्यक्तीला त्या वस्तूची खरोखर गरज आहे का हे बघावे. भरलेल्या घरात कोणतीही वस्तू देऊन त्याचा काहीही उपयोग नाही. कारण आधीपासूनच त्यांच्याकडे या सर्व वस्तू असल्याने त्यांना या गोष्टींचे अप्रुपही नसते व गरजही नसते. त्यामुळे त्या वस्तू त्यांच्याकडे तश्याच पडलेल्या असतात.

त्यापेक्षा गरीब व्यक्तीला अश्या वस्तू दिल्यास ते त्या वस्तूचा लगेचच वापर करतात व आपल्याला त्याचे फळ लगेचच मिळते. या उपायाने तुमची कोणतीही मनोकामना असेल किंवा कोणतीही इच्छा असेल तर ती श्री हरी विष्णूच्या आशीर्वादाने लवकरच पूर्ण होईल. आपल्याला हा उपाय प्रत्येक महिन्याच्या एकादशीला करायचा आहे. जोपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपल्याला हा उपाय करत राहायचा आहे. कमीत कमी दोन किंवा सात एकादशीपर्यंत आपली ती मनोकामना पूर्ण होऊ शकते व आपण कोणत्याही संकटातून मुक्त होऊ शकतो. मित्रांनो उपाय अगदी साधा सरळ आहे तर प्रत्येक एकादशीला हा उपाय करा आणि श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा व मनोकामना यांची पूर्ती करा. आपले जीवन सुखी समृद्ध बनवा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.