देवघरातील टाक कसे असावे?किती असावे? मृत व्यक्तीचे टाक पुजावे का?टाक झोपवू नये… कुलदैवत टाक महत्त्वाचे…

वास्तु शाश्त्र

मित्रांनो, भारतीय परंपरेनुसार आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर हे असते. देवघरामध्ये आपण आपल्या कुलदैवत, देवीचे मूर्ती किंवा टाक यांचे पूजन करत असतो. मूर्ती पेक्षा टाकायचे पूजन करणे खूप चांगले असते समजले जाते. त्याचबरोबर इतर देवकी असतात. तसेच या देवघरामध्ये काही जण मृत व्यक्तींचे टाक देखील पुजत असतात.

 

हे आपण पाहत असतो. परंतु आज आपण देवघरातील या टाकांबद्दल काही माहिती पाहणार आहोत की, ज्यामध्ये देवघरातील टाक कसे असावे? ते किती असावे? मृत व्यक्तींचे टाक पूजावे की पूजू नये? तसेच टाप हे कोणत्या धातूचे असावे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या लेखातून आपण जाणून घेणार आहोत.

 

प्रथम आपण पाहूया की टाक कसे असावे? तर आपण जे देवीचे देवतांचे टाक घरामध्ये पूजत असतो हे टाक चांदीचे असावेत. कारण चांदी हे शुद्धतेचे प्रतिक असते. व चांदीचा पांढरा रंग हा प्रकाशाचे प्रतीक असते. टाक घेताना नेहमी पंचकोनी घ्यावा. कारण पंचकोण हे पंचतत्वाचे प्रतीक आहे. अशाप्रकारे हे देव घरातील टाक चांदीचे व पंचकोणी असावेत व त्यावर असणारा देवी देवतांची प्रतिमाही ठळक असावी. जेणेकरून ते आपल्याला व्यवस्थित दिसतील.

 

तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की, टाक आपल्या देवघरांमध्ये का पुजावे? तर पूर्वीच्या काळी लोक लोकांना आपल्या कुलदैवत, कुलस्वामी, कुलदैवता यांच्याकडे रोज जाता येत नाही म्हणून ते असे हे टाक बनवून त्यांची दररोज पूजा करत होते. तुम्ही करून त्यांची सेवा आपल्या हातून रोज घडेल. तेव्हापासून हे टाक आपल्या देवघरांमध्ये पुजले जातात व त्या मुळेच आपल्या कुलदेवतेची सेवा आपल्याला करायला मिळते.

 

 

आपल्या देवघरातील टाकांची संख्या नेहमी विषम असावी. त्यामध्ये महत्त्वाचे म्हणले तर, आपला कुलदैवत व कुलस्वामिनीचे टाक असावे. त्याचबरोबर आपल्या ग्रामदैवतचे व इतर कोणते टाक तुम्हाला करायचं असतील तर तुम्ही करू शकता. परंतु फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा की, हे टाकांची संख्या ही विषम असावी. त्याचबरोबर या देवांच्या टाक हे कधीही देवारा मध्ये झोपू नये. ते नेहमी उभे राहतील अशा ठकाणीं ठेवावे.

 

मृत व्यक्तींचे टाक कधीही देवारा मध्ये पुजू नये. मृत व्यक्तींचे टाक हे केले जातात पण ते देवारांमध्ये कधीही पूजन करू नये. कारण यामुळे आपल्या घरामध्ये त्रास निर्माण होऊ शकतो. या मृत व्यक्तींचे टाक हे त्यांच्या वर्षश्राद्धला किंवा माळ महिन्यात, पितृपक्षामध्ये या व्यक्तींच्या टाक्यांचे पूजन करावे. इतर दिवशी हे टाक आपल्या देवघरामध्ये नसावेत. ते कोणत्यातरी एका ठिकाणी ठेवून द्यावे. हे देखील टाक चांदीचे किंवा तांब्याचे असावेत.

 

अशाप्रकारे देवघरातील टाक हे नेहमी उभे राहते असे ठेवावे. त्याचबरोबर देवांच्या टाकची संख्या ही नेहमी विषम ठेवावी व मृत व्यक्तींचे टाक कधीही पुजू नयेत.

Leave a Reply

Your email address will not be published.