मित्रांनो, आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा अगदी मनोभावे श्रद्धेने करीत असतो. म्हणजेच स्वामी हे आपल्या प्रत्येक अडचणीतून आपल्याला मार्ग दाखवतील. तसेच आपल्या जीवनामध्ये कोणतीही संकटे आली तर ही संकटे ते पहिल्यांदा आपल्याकडे ओढवून घेतात. म्हणजेच त्या संकटातून आपली सुटका करीत असतात. तर मित्रांनो स्वामी महाराजांनी आपल्याला अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत या गोष्टींवरून तुम्ही तुमचे जीवन आनंदी करता येईल. म्हणजेच तुम्ही आपला प्रत्येक दिवस हा आनंदामध्ये घालवाल.
स्वामींनी आपल्याला असे अनेक काही आदेश दिलेले आहेत. म्हणजेच त्याप्रमाणे तुमचे वागणे तुम्ही ठेवायला हवे. तर आज मी तुम्हाला या स्वामींच्या गोष्टींबद्दल काही सांगणार आहे जेणेकरून तुमचा दुःखाचा डोंगर हा कमी होईल. तसेच सर्व दुःखे, संकटे तुमच्या जीवनातून नष्ट होतील. तर स्वामी महाराज म्हणतात की, जर तुम्ही एखाद्याचे कोणाचे वाईट केलेले असेल तर त्याचा विचार तुम्ही परत परत करू नका. कारण असा जर विचार तुम्ही करत राहिला तर त्यामुळे त्रास होणार आहे.
तसेच तुम्ही इतरांचे वाईट कधीच साधायचे नाही. म्हणजेच त्या दुसऱ्या व्यक्तीसाठी आपण काही वाईट चिंतेत असाल तर स्वामी महाराज हे सर्व काही पाहत असतात. त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांचे वाईट कधीच चींतू नये. कायम त्यांच्या आनंदामध्ये आपण सामील व्हावे. प्रत्येक माणूस हा आपल्या आनंदाचा विचार करत असतो. तर आपण दुसऱ्या माणसाची जर स्तुती केली किंवा त्याच्या आनंदाविषयी तुम्ही काही केले तर मात्र तो समोरचा माणूस खूपच आनंदित राहतो. हे लक्षात ठेवा. त्यामुळे कोणाबद्दलही तुम्ही आपल्या मनामध्ये वाईट अजिबात विचार आणायचे नाही.
तसेच आपली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण आनंदी राहायला समाधानी राहिला शिकायचे आहे. आपल्यापैकी बरेच जण असे असतात की माझ्याकडे हे नाही माझ्याकडे ते नाही असे सतत काही ना काही कटकट करत असतात. तर असे न करता आपल्याला आहे त्या परिस्थितीमध्ये आपण समाधानी राहणे हे स्वामींना खूपच आवडते आणि अशी जी माणसं आहेत या माणसांवर स्वामी महाराज नक्कीच आपली कृपा करीत असतात.
मित्रांनो प्रत्येकाला काही ना काहीह संकटे येत असतात. म्हणजेच जर तुम्ही वाईट काळामध्ये वावरत असाल तर त्यावेळेस तुम्ही कोणताही विचार न करता तुम्ही त्या वाईट काळात देखील आनंदी राहण्याचा समाधानी राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण एकदा हा वाईट काळ संपून जाईल आणि चांगले दिवस तुम्हाला नक्कीच येतील असा विचार तुम्ही करायचा आहे.
मित्रांनो एक गरीब माणूस होता. म्हणजेच तो व्यक्ती आपल्या कुटुंबीयांच्या गरजा भागवण्यासाठी तसेच मुलांचे आपण काहीच घरच्यांचा आनंद भागवत नाही अशी सतत त्याच्या मनाला एक खंत होती. त्यामुळे तो खूपच निराश असायचा. आपल्या कुटुंबीयांसाठी आपल्याला काहीतरी करायला हवे असे त्याला वाटत होते. एके दिवशी तो जंगलात असलेल्या एका तपस्वींकडे गेला आणि तिथे तो म्हणाला की, मी माझ्या कुटुंबीयांच्या काहीच गरजा भागू शकत नाही म्हणजेच दोन वेळचे जेवण आणि कोणत्याही गरजा देखील भागवण्या इतपत मी त्यांच्यासाठी योग्य नाही. तर या संकटातून वाईट काळातून मला काहीतरी मार्ग दाखवा.
जेणेकरून मी माझ्या कुटुंबीयांना देखील आनंद देईन. या वाईट मार्गातून मला नक्की बाहेर काढा व त्यावेळेस तपस्वी म्हणतात की मी तुझ्या वाईट मार्गातून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला मार्ग सांगेन परंतु तुला एक माझे काम करायचे आहे आणि त्या व्यक्तीला सांगतो की या नदीच्या पलीकडे खूपच पक्षांची घरटी आहेत आणि या पक्षांच्या किलबिला ठाणे आम्हाला तपश्चर्यामध्ये खूपच अडचण होते. तर तू त्या पक्षांची जी घरटी आहे ती घरटी मोडायची आहेत.
त्यावेळेस तो व्यक्ती हो म्हणाला आणि हे काम त्या व्यक्तीला सात दिवस करायचे होते. नंतर तो व्यक्ती नदीच्या पलीकडे गेला आणि तिथे त्याने पाहिले की झाडावरती खूप सारी घरटी होती व त्याने लगेच घरटे मोडण्यास सुरुवात केली. पक्षी हे एक एक छोटा छोटा कण आणून घरटी बनवत होते. तरी देखील तो व्यक्ती त्या पक्षांची घरटी मोडणेत सफल झाला आणि नंतर तो घरी परतला.
त्यावेळेस त्याला संध्याकाळी विचार चक्र येत होते की मी आज पक्षांची घरटी मोडली आहेत. नंतर दुसऱ्या दिवशी परत तो त्याचे काम करण्यासाठी नदीच्या पलीकडे गेला आणि त्याने पाहिले तर पक्षी ही आपली नवीन घरटी बनवण्यामध्ये व्यस्त होते. म्हणजेच ते आपले नवीन घर बनवत होते. हे पाहून थोडेफार दुःख त्या व्यक्तीला झाले आणि परत त्याने ती घरटी मोडण्यास सुरुवात केली आणि संपूर्ण घरटी त्यांनी मोडून काढली आणि परत तो आपल्या घरी परतला.
त्यावेळेस त्याला अतिशय दुःख झाले की पक्षांनी परत घरटी बनवून देखील मी त्यांची घरटी मोडलेली आहेत आणि मी हे वाईट काम तरी करत नाही ना असे विचार चक्र त्याच्या संध्याकाळी डोक्यात येतच होते. नंतर तिसऱ्या दिवशी त्यांने परत आपले काम करण्यास सुरुवात केले. त्यावेळेस देखील पक्षी हार न मानता नवीन घरटे बनवण्यासाठी सुरुवात करत होते आणि त्यावेळेस मात्र घरटी मोडावी का नाही असा विचार त्या व्यक्तीच्या मनात येऊ लागला. परंतु तपस्वीनी सांगितले होते की, सात दिवस जर तू घरटी मोडलीस तरच तुला वाईट संकटातून मी मार्ग सांगेन व त्यावेळेस त्या व्यक्तीने परत ती घरटी मोडली देखील.
आणि त्यावेळेस मात्र त्या दिवशी त्याला खूपच वाईट वाटले की एवढी पक्षी मेहनत घेऊन मी त्यांची घरटी मोडली आहेत. तो तपस्वी जो सांगतो आहे तो खरे तर आहे का? तपस्वी याला कोणती धार्मिक शक्ती प्राप्त तर झाली नाही ना? असे विचार अनेक गोष्टी त्याच्या मनामध्ये घर करून गेल्या होत्या. नंतर चौथ्या दिवशी उठून तो नदीपलीकडे गेला तर त्यावेळेस त्याला घरटी दिसले नाहीत आणि नदीपार करून तो येणार तितक्यात त्याला एका झाडावरती पक्षांनी आपली जागा बदलून एका झाडावरती घरटी देखील बांधलेली होती.
त्यावेळेस त्या व्यक्तीने ती घरटी मोडली आणि ती मोडत असताना त्याच्या हातून काही पक्षी देखील मारले गेले. त्यावेळेस त्याला अतिशय दुःख झाले आणि पाचव्या दिवशी सकाळी उठून मात्र तो तपस्वीकडे गेला आणि तो म्हणाला, मी तुमचे काम पूर्ण केलेले नाही आणि त्यामुळे तुम्ही मला कोणताही मार्ग सांगणार नाही. जेणेकरून माझी वाईट परिस्थिती बदलेल आणि मी आता तुमचे काही ऐकणार नाही आणि मी माझ्या घरी जाणार असे त्यांनी सांगितले.
त्यावेळेस तपस्वी म्हणाला की, तू अगोदर तुझे तोंड वगैरे स्वच्छ धुऊन घे मी तुला त्या पक्षांची घरटी मोडण्यास सांगितलेले होते. परंतु त्यातून काहीतरी शिकण्यास देखील पाठवलेले होते. म्हणजेच तू देखील तुझ्या वाईट काळामध्ये हार मानू नकोस. पक्षी ज्याप्रमाणे अगदी जोमाने नवीन घरटे बनवत होते. तर तू देखील तुझ्या वाईट काळामध्ये प्रत्येक संकटांचा सामना करायचा आहे आणि नवीन यातून काहीतरी शिकायचे आहे.
म्हणजेच वाईट परिस्थिती बदलून नवीन चांगले दिवस कसे येतील याचा विचार करायचा आहे. म्हणजेच वाईट काळामध्ये अजिबात हार माणायचे नाही. तर मित्रांनो स्वामिनी देखील आपल्याला हे सांगितलेले आहे की, कोणत्याही संकटामध्ये किंवा अडचणीमध्ये आपण न हार मानता आपले यश आपल्याला कसे प्राप्त होईल याकडे आपण पुरेपूर लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या आहे त्या परिस्थितीमध्ये सुखी समाधानी राहणे हे आपल्यासाठी देखील खूपच चांगले असते. म्हणजेच वाईट काळ कधी ना कधी बदलणार हे मात्र नक्की. त्यामुळे अगदी निष्ठेने मनोभावे श्रद्धेने कोणतेही काम करीत राहा. स्वामींची सेवा करीत रहा तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.