मित्रांनो डायबिटीस म्हणजेच मधुमेह हा गंभीर आजार असून त्यावर कायमस्वरूपी इलाज नाही. निरोगी जीवनशैली आणि आहाराद्वारेच यावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळेच शुगरच्या रुग्णांनी खाण्यापिण्याबाबत खूप काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की आपण जे अन्न खातो त्याचा थेट परिणाम रक्तातील साखरेच्या पातळीवर होऊ शकतो. जेव्हा एखाद्या रुग्णाला मधुमेह असतो, तेव्हा रुग्णाच्या रक्तातील साखरेमध्ये सतत चढ-उतार होत असतो आणि त्यामुळे दीर्घकाळापर्यंत त्यांना आरोग्याच्या अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते आणि तहान वाढणे, लघवी होणे, वजन कमी होणे, थकवा येणे आणि दृष्टी कमी होणे ही मधुमेहाची लक्षणे आहेत.
आणि मित्रांनो रक्तातील साखर कशी नियंत्रित करावी? फॅट टू स्लिमच्या डायरेक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट अँड डाइटिशियन शिखा अग्रवाल शर्मा असं म्हणतात की, मधुमेहाच्या रुग्णांनी कमी ग्लायसेमिक इंडेक्स पातळी असलेलेच पदार्थ खावेत. रोज खाल्ल्या जाणाऱ्या काही गोष्टी रक्तातील साखर झपाट्याने वाढवतात आणि तुम्ही त्यांचे सेवन टाळले पाहिजे. मित्रांनो यामधील सर्वात पहिला जो पदार्थ आहे तो म्हणजे चहा कॉफी किंवा कोल्ड्रिंक्स, अनेकांना रोज सकाळी कॉफी किंवा चहा पिण्याची आवड असते. हे लक्षात ठेवा की यामुळे तुमची रक्तातील साखर वाढू शकते. त्याऐवजी तुम्ही ब्लॅक टी किंवा ग्रीन टी घेऊ शकता. जरी कॅफिनचा वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होत असला तरीही तुम्हाला डायबिटीज असेल तर तुम्ही कॅफिनचे सेवन मर्यादित केले पाहिजे.
आणि त्यानंतर मित्रांनो दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे तांदूळ मित्रांनो आपल्याला मधुमेहाचा त्रास असेल तर अशावेळी मित्रांनो तांदळाचेही सेवन आपल्याला योग्य प्रमाणात त करावे लागते, आणि त्याचबरोबर मित्रांनो तांदळापासून बनवलेले जे पदार्थ असतात त्यांचीही सेवन आपल्याला या काळामध्ये करण आपल्याला टाळायचा आहे व्हाईट ब्रेड आणि अगदी पांढऱ्या तांदळात सुद्धा साधे कार्बोहायड्रेट्स असतात जे शरीराद्वारे सहजपणे तुटतात आणि ग्लुकोजमध्ये बदलतात. शिवाय, त्यात थोडे फायबर असते आणि फायबर खरोखर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. हेच पांढर्या ब्रेडसाठी आहे ज्यात फक्त मैदाच असतो. शिवाय पास्ता आणि नूडल्समध्ये देखील मैद्याचे प्रमाण जास्त असते.
आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला बाहेरचे फास्ट फूड खाणे देखील टाळायचे आहे मित्रांनो जर आपल्याला मधुमेह असेल तर आणि आपण जर या बाहेरच्या पदार्थांचे म्हणजेच फास्ट पुढचे सेवन केले त्यामुळे आपल्याला त्याचा खूप त्रास होऊ शकतो कारण मित्रांनो बाहेरच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉल असते आणि ज्या व्यक्तीला मधुमेहाचा त्रास आहे त्या व्यक्तीला कोलेस्ट्रॉल पासून दूर राहिले पाहिजे, आणि त्याचबरोबर दुसरा जो पदार्थ आहे तो म्हणजे मध मित्रांनो इतर व्यक्तींना मध हे आरोग्यासाठी गुणकारी आणि फायदेशीर असलं तरी मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी चुकूनही याचे सेवन करू नये कारण याच्या मध्येही साखरेचे प्रमाण जास्त असते.
आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला जर मधुमेह असेल तर अशावेळी आपण ज्या फळांमध्ये जास्त प्रमाणात साखर असते किंवा जास्त गोड फळे असतात त्यांचे सेवन हे करणे टाळायचे आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला एखाद्या ज्यूस प्यायचा असेल तर तुम्ही लिंबू पाणी प्या. मित्रांनो फळांमध्ये जे मीठ किंवा शुगर असते तीही मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी खूप घातक आहे म्हणून आपण त्याचे सेवन करणे टाळायचे आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो पुढचा जो पदार्थ आहे तो म्हणजे बटाटा मित्रांनो बटाट्याचे ही सेवन आपण जर मधुमेह असेल तर कमी ठेवायचे आहे आणि जर शक्य असेल तर करायचेच नाही त्याचे ऐवजी तुम्ही रताळे खाऊ शकता. तर मित्रांनो हे काही पदार्थ आहेत यांचे सेवन तुम्हाला जर डायबिटीज असेल तर करणे टाळायचा आहे.
मित्रांनो वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टर-वैद्याचा सल्ला घ्या. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.