महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा व सोडावा हे तीन पदार्थ चुकूनही खाऊ नका उपवास हाच पदार्थ खाऊन सोडा तरच व्रताचे फळ मिळेल ?

वास्तु शाश्त्र

लोक महाशिवरात्रीचा उपवास जवळपास सर्वजण करतात आणि महादेवांच्या भक्तांसाठी तर महाशिवरात्रीचा उपवास अत्यंत महत्त्वपूर्ण असतो आणि महाशिवरात्रीचा उपवास करण्याची प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असली तरी सर्वसाधारणपणे इतर उपवासाप्रमाणेच या दिवशीही उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात पण त्यामधले असे काय काय उपवास असतात की त्यामध्ये एखादा पदार्थ खाल्ला जात नाही तो वर्ज केला जातो तर अगदी त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये सुद्धा असे कोणते तीन पदार्थ खायचे नाहीत हे मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला त्या व्रताचा संपूर्ण फळ मिळेल .

 

मी तुम्हाला महाशिवरात्रीचा उपवास कधी धरायचा कधी सोडायचा त्याबरोबर कोणते पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत आणि उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडायचा म्हणजे आपल्याला व्रताचं संपूर्ण फळ मिळेल तर अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे माग कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते यावर्षी शुक्रवार दिनांक 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्रीचे व्रत केले जाणार आहे या दिवशी भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून व्रत केले जाते.

 

महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात अपारसुख आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी बऱ्याच ठिकाणी म्हणजे सर्वत्र महाशिवरात्रीला उपवास केला जातो पण शरीरशुद्धीकरणासाठी खरे तर उपवास केले जातात तर महाशिवरात्रीचा उपवास हा एकादशी प्रमाणे पूर्ण 24 तासासाठी केला जातो म्हणजे आठ मार्चला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून शक्य असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकावं आणि त्या शुद्ध पाण्याने स्नान करून रोजची देवाची पूजा करून तुम्ही शिवलिंगाची सुद्धा विधिवत अशी पूजा करायची आहे .

 

व्रताला सुरुवात करायची हा उपवास दिवसभर करायचा रात्रभर करायचा आणि नऊ मार्चला सकाळी आपल्याला हा उपवास सोडायचा आहे म्हणजे तुम्ही आठ तारखेला सकाळी उपवास केला तर तो रात्री सोडायचा नाही रात्री सुद्धा तुम्ही उपवासाचे पदार्थ खायचे आहेत मात्र नऊ तारखेला तुम्ही सकाळी हा उपवास सोडू शकता फक्त जास्त स्त्रियांना मासिक धर्म आहे त्या स्त्रिया मात्र पूजा करू शकत नाही पण तुम्ही उपवास मात्र नक्की करू शकता आणि मनातल्या मनात महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र जपावा त्यामुळे सुद्धा तुम्हाला व्रताचा संपूर्ण फळ मिळू शकतं कारण असं म्हणतात की भोलेनाथ भोले बाबा आहेत अगदी साध्या सुद्धा पूजेने सुद्धा ते आपल्या वरती प्रसन्न होतात त्यामुळे अगदी साधी जरी पूजा तुम्ही मनापासून केली तरी त्याचा फळ तुम्हाला नक्की मिळेल .

 

त्याचबरोबर जी बालके आहेत लहान मुले आहेत वृद्ध म्हाताऱ्या व्यक्ती आहेत किंवा जे आजारी आहेत वारंवार जे आजारी असतात किंवा गर्भवती स्त्रियांनी कोणत्याही प्रकारचा उपवास किंवा कोणत्याही नियमांचे पालन करण्याची आवश्यकता नाही फक्त त्यांनी केवळ भगवान शिवशंकरांचं महादेवांचे नामस्मरण करावं मनातल्या मनात किंवा मंत्र जप करावा एवढे जरी मनापासून केलं तरी त्यांना पुण्याची प्राप्ती होते आणि महाशिवरात्रीच्या व्रताचं फळ सुद्धा त्यांना मिळतं आता हे व्रत कसं केलं जातं तर हे व्रत तीन प्रकारे केलं जातं.

 

एक म्हणजे निर्जळी म्हणजे कडक उपवास ते दिवसभर पाण्याचा थेंबही घेत नाहीत असा उपवास म्हणजे निर्जळी उपवास पण हा उपवास ज्यांना शक्य आहे त्यांनीच हे करावं अन्यथा एवढं कडक करण्याची काही आवश्यकता नाही आणि दुसरं म्हणजे फलाहारी व्रत म्हणजे बरेच जण या व्रतामध्ये या उपवासामध्ये दूध आणि फळांचा समावेश करतात शेंगदाणे तळलेले चिप्स उपवासाचे पदार्थ असे पदार्थ खाऊन सुद्धा हा उपवास केला जातो आणि असं सांगितलं आहे की या उपवासाला शक्यतो मिठाचा सेवन करू नये म्हणजे जे आपलं समुद्री मीठ असतं ते उपवासाला चालत नाही.

 

असं पण अनेकांना हे जमत नाही म्हणजे बिना मिठाचे पदार्थ खायला तर त्यांनी शक्यतो सेंधव मिठाचा वापर करावा ते थोडसं गुलाबीसर रंगाचं असतं ते मीठ तुम्ही उपवासाला खाल्लं तरीही चालू शकतं उपवास करताना आपण मात्र शरीर श्रुतीसाठी उपवास करतो पण आपलं मन ही त्या दिवशी तेवढाच स्वच्छ असणं चांगले विचार आपल्यामध्ये असणे गरजेचे आहे म्हणजे या दिवशी आपला आचरणही चांगलं असावं कोणाशीही वादविवाद शिव्या अशा गोष्टी करू नये कोणाशीही भांडण करू नये या दिवशी सर्वांशी प्रेमाने वागावे गोड बोलावे उलट या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त वेळ शिवाच्या ध्यान मध्ये घालावा .

 

 

मंत्र जप करण्यात घालवावा असं केल्याने महादेव तुमच्यावरती लवकर प्रसन्न होतील उपवासाच्या दिवशी आपल्याला नेहमीपेक्षा थोडं आणि सात्विकच खायचं आहे कारण काही उपवास असेहे नाही खाल्लं पाहिजे किंवा हे व्रत करत असताना हा पदार्थ चालत नाही असा आपण प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ऐकतो आणि बऱ्याच जणांना हे माहिती सुद्धा असेल की महाशिवरात्रीच्या उपवासाला वरई म्हणजेच बऱ्याच ठिकाणी याला भगर असं सुद्धा म्हणतात तर ही आमच्या भागामध्ये तरी खाल्ली जात नाही म्हणून मी तुम्हाला सांगते म्हणजे आमच्या भागामध्ये शक्यतो महादेवाचा उपवास असतो.

 

श्रावण महिन्यामधला सोमवार असेल किंवा महाशिवरात्री असेल तर या महादेवाच्या उपवासाला आमच्या इकडे भगर खाल्ली जात नाही म्हणजे वरईचे पदार्थ वरई खाल्ली जात नाही जर तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही नक्की खाऊ शकतात पण ज्या व्यक्ती पहिल्यांदाच हे व्रत करणार असेल तर त्यांनी शक्यतो भगर किंवा भगरीचे पदार्थ सोडून इतर सर्व उपवासाचे पदार्थ खाऊ शकता तसेच या दिवशी आपल्याला चुकून सुद्धा मांसाहार करायचा नाही कांदा लसूण सुद्धा आपल्याला पूर्णपणे वर्ज करायचा आहे .

 

या दिवशी चुकून सुद्धा मटन मासे अंडे किंवा कोणीही कोणतही व्यसन करू नका बघा आपण श्रावण महिन्यामध्ये सुद्धा संपूर्ण महिनाभर मांसाहार वर्ग करत असतो तर अगदी त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला सुद्धा आपल्याला या पदार्थांचे सेवन चुकून सुद्धा करायचं नाही कारण आपण म्हणतो की शंकर भोळे आहेत पण तेवढे ते क्रोधित सुद्धा आहेत म्हणजे त्यांना लगेच राग येतो त्यामुळे अशा या पवित्र दिवशी जर तुम्ही अशा काही पदार्थांचे सेवन केले तर आपल्याला या व्रताचं फळ मिळणार नाही या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त आपण भगवान शंकराचे ध्यान करायचे आहे .

 

सोप्यात सोपा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा कारण असे म्हणले आहे की महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा याने व्रताचे अधिक पुण्य आपल्याला मिळेल शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्त्व सांगितले आहे त्यामुळे जमेल तेवढी जास्तीत जास्त तुम्ही महादेवांची सेवा करा तर मी तुम्हाला सांगितलं की उपवास कसा करायचा दिवसभर करायचा रात्रीही करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा महिलांनी केस वगैरे देऊ शकता काहीही अडचण नाही कारण त्या दिवशी शुक्रवार आहे उपवासाला तुम्ही वरई म्हणजे भगर सोडून इतर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता

 

 

आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा आता बऱ्याच ठिकाणी उपवास हा दहीभात खाऊन सोडला जातो म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर उपवास सोडताना सुद्धा आपल्याला सात्विकच अन्नग्रहण करायचा आहे म्हणजे आपल्याला दिवसभर केलेल्या उपवासाचा संपूर्ण फळ मिळेल म्हणजे उपवास सोडताना तुम्ही कोणत्याही प्रकारचा माणूस आहार किंवा मसालेदार पदार्थांचा सेवन करणे जरूर टाळा शक्य झालं तर एखादा गोडाचा पदार्थ खाऊन किंवा दहीभात खाऊन किंवा मग तुम्ही जे जेवण बनवलं असेल साधा सात्विक वरण भात भाजी पोळी चपाती तर असा जेवण करून सुद्धा तुम्ही उपवास सोडू शकता .

 

अनेक ठिकाणी बघा जेवताना कांदा खातात तर शक्यतो उपवास सोडताना तुम्ही कच्चा कांदा खाऊ नका साधू आणि सात्विक अन्नग्रहण करूनच तुम्ही उपवास सोडा जेणेकरून तुम्हाला केलेल्या व्रता उपवासाचा संपूर्ण फळ मिळेल कारण हे व्रत अतिशय प्रभावी मानले जाते असे म्हणतात की कुमारिकांना चांगला नवरा मिळावा म्हणून उपवास करावा तर विवाहितांनी सुखी संसारासाठी हा उपवास करावा.

Leave a Reply

Your email address will not be published.